शतानिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शतानिक तथा सुतसोम हा इंद्रप्रस्थाचा कुमार नकुल व राणी द्रौपदी यांचा पुत्र होता.

शतानिक युद्धविद्येत पारंगत होता आणि आपल्या मामा धृष्टद्युम्नाचा उपसेनापती होता.[१]

कुरुक्षेत्राच्या युद्धात शतानिकने भूतकर्मा आणि त्याच्या संपूर्ण सैन्याचा संहार केला.[२] युद्धाच्या सहाव्या दिवशी शतानिकने दुष्कर्णाचा पराभव केला परंतु ११व्या दिवशी त्याला कर्णपुत्र वृषसेनाने मात दिली.[३] त्याने जयत्सेन, चित्रसेन आणि श्रुतकर्मन सारख्या योद्ध्यांविरुद्ध जय मिळवला. युद्धाच्या १७व्या दिवशी शतानिकने कौरवसेनेचा धुव्वा उडवला होता.दुःशासनाशी झुंज घेतली.

युद्धाच्या शेवटच्या रात्री दुर्योधनाच्या मृत्यूनंतर अश्वत्थामाने कृतवर्मा आणि कृपाचार्य यांच्यासह पांडवांवर निर्वाणीचा हल्ला चढवला. अंधारात झालेल्या या लढाईत आपल्या चार सावत्र भावांसह शतानिक मृत्यू पावला.

  1. ^ Parmeshwaranand, Swami (2001). Encyclopaedic dictionary of Purāṇas (1st ed.). New Delhi: Sarup & Sons. ISBN 9788176252263.
  2. ^ Parmeshwaranand, Swami (2001). Encyclopaedic dictionary of Purāṇas (1st ed.). New Delhi: Sarup & Sons. ISBN 9788176252263.
  3. ^ "The Fifth and Sixth Days of the Great Battle [Chapter 6]". 9 January 2015.