"ओडिशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २६: | ओळ २६: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''ओडिशा''' (मराठी नामभेद: '''ओरिसा''' ; [[रोमन लिपी]]: ''Odisha'') [[भारत]] देशाच्या २९ राज्यांपैकी एक राज्य आहे. ओडिशा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तरेला असून त्याच्या पूर्वेला [[बंगालचा उपसागर]], उत्तरेला [[पश्चिम बंगाल]] व [[झारखंड]], पश्चिमेला [[छत्तीसगढ]], नैर्ऋत्येला [[तेलंगण]] तर दक्षिणेला [[आंध्र प्रदेश]] ही राज्ये आहेत. [[भुवनेश्वर]] ही ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील ९व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. ओरिसाला ४८५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. |
'''ओडिशा''' (मराठी नामभेद: '''ओरिसा''' ; [[रोमन लिपी]]: ''Odisha'') [[भारत]] देशाच्या २९ राज्यांपैकी एक राज्य आहे. ओडिशा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तरेला असून त्याच्या पूर्वेला [[बंगालचा उपसागर]], उत्तरेला [[पश्चिम बंगाल]] व [[झारखंड]], पश्चिमेला [[छत्तीसगढ]], नैर्ऋत्येला [[तेलंगण]] तर दक्षिणेला [[आंध्र प्रदेश]] ही राज्ये आहेत. [[भुवनेश्वर]] ही ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.भुवनेश्वर आणि [[कटक]] ही जुळी शहरे आहेत. क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील ९व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. ओरिसाला ४८५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. |
||
ओरिसाची विविध नावे : उच्छल (बंगाली), उत्कल, उड्र देश, ओड्र, उडीशा, उडीसा, उड़़ीसा, ओडिसा, ओडिशा, ओढिया, ओदिशा, Odisha, Orissa |
ओरिसाची विविध नावे : उच्छल (बंगाली), उत्कल, उड्र देश, ओड्र, उडीशा, उडीसा, उड़़ीसा, ओडिसा, ओडिशा, ओढिया, ओदिशा, Odisha, Orissa |
||
[[पुरी, ओडिशा|पुरी]] येथील [[जगन्नाथ मंदिर]], [[कोणार्क]] येथील [[कोणार्क सूर्य मंदिर|सूर्य मंदिर]] इत्यादी जगप्रसिद्ध सांस्कृतिक स्थाने असलेल्या ओडिशामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचे अनेक ठसे आढळतात. |
[[पुरी, ओडिशा|पुरी]] येथील [[जगन्नाथ मंदिर]], [[कोणार्क]] येथील [[कोणार्क सूर्य मंदिर|सूर्य मंदिर]] इत्यादी जगप्रसिद्ध सांस्कृतिक स्थाने असलेल्या ओडिशामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचे अनेक ठसे आढळतात. कोणार्कच्या सूर्यमंदिराजवळ पुराणांत वर्णन केलेली चंद्रभागा नदी होती. आता तेथे चंद्रभागा बीच आहे. |
||
== इतिहास व प्राचीनत्व== |
== इतिहास व प्राचीनत्व== |
||
ओळ १००: | ओळ १००: | ||
|- |
|- |
||
|align="right"|10 |
|align="right"|10 |
||
|align=left|[[ |
|align=left|[[झारसुगुडा]] |
||
|align=left| [[ |
|align=left| [[झारसुगुडा जिल्हा]] |
||
|align="right"|97,730 |
|align="right"|97,730 |
||
|} |
|} |
||
== |
== औद्योगिकीकरण व सामाजिक विरोध == |
||
तत्कालीन ओडिशातील (आताच्या [[झारखंड]] मधील) [[जमशेदपूर]] येथे पहिला स्वदेशी पोलाद कारखाना स्थापन झाला, आणि या भागातील [[खनिज]] संपत्तीमुळे या प्रदेशांचे मोठ्या प्रमाणात |
तत्कालीन ओडिशातील (आताच्या [[झारखंड]] मधील) [[जमशेदपूर]] येथे पहिला स्वदेशी पोलाद कारखाना स्थापन झाला, आणि या भागातील [[खनिज]] संपत्तीमुळे या प्रदेशांचे मोठ्या प्रमाणात उद्योगीकरण झाले. मात्र गेल्या ६० वर्षांत विकास प्रकल्पांसाठी सुमारे ६ कोटी ग्रामस्थांनी आपली घरे, जमिनी गमावल्या. त्यापैकी वीस लक्ष ग्रामस्थ एकट्या ओडिशातील आहेत. विकास प्रकल्पांतून स्थानिकांना लाभ मिळत नसल्याचा अनुभव त्यांनी जवळपास सहा दशके घेतला आहे. त्यातून शहाणे झालेले स्थानिक आता येऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध करत आहेत. |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१८:०५, २५ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
ओडिशा ଓଡ଼ିଶା | |
भारताच्या नकाशावर ओडिशाचे स्थान | |
देश | भारत |
स्थापना | १ एप्रिल १९३६ |
राजधानी | भुवनेश्वर |
सर्वात मोठे शहर | भुवनेश्वर |
जिल्हे | ३० |
क्षेत्रफळ | १,५५,७०७ चौ. किमी (६०,११९ चौ. मैल) (९ वा) |
लोकसंख्या (२०११) - घनता |
४,१९,४७,३५८ (११वा) - २७० /चौ. किमी (७०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०) |
प्रशासन - राज्यपाल - मुख्यमंत्री - विधीमंडळ (जागा) - उच्च न्यायालय |
एस.सी. जमीर नवीन पटनायक ओडिशा विधानसभा (१४७) ओडिशा उच्च न्यायालय |
राज्यभाषा | उडिया |
आय.एस.ओ. कोड | IN-OR |
संकेतस्थळ: http://www.odisha.gov.in/ |
ओडिशा (मराठी नामभेद: ओरिसा ; रोमन लिपी: Odisha) भारत देशाच्या २९ राज्यांपैकी एक राज्य आहे. ओडिशा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तरेला असून त्याच्या पूर्वेला बंगालचा उपसागर, उत्तरेला पश्चिम बंगाल व झारखंड, पश्चिमेला छत्तीसगढ, नैर्ऋत्येला तेलंगण तर दक्षिणेला आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत. भुवनेश्वर ही ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.भुवनेश्वर आणि कटक ही जुळी शहरे आहेत. क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील ९व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. ओरिसाला ४८५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
ओरिसाची विविध नावे : उच्छल (बंगाली), उत्कल, उड्र देश, ओड्र, उडीशा, उडीसा, उड़़ीसा, ओडिसा, ओडिशा, ओढिया, ओदिशा, Odisha, Orissa
पुरी येथील जगन्नाथ मंदिर, कोणार्क येथील सूर्य मंदिर इत्यादी जगप्रसिद्ध सांस्कृतिक स्थाने असलेल्या ओडिशामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचे अनेक ठसे आढळतात. कोणार्कच्या सूर्यमंदिराजवळ पुराणांत वर्णन केलेली चंद्रभागा नदी होती. आता तेथे चंद्रभागा बीच आहे.
इतिहास व प्राचीनत्व
ऐतिहासिक काळात ओडिशा कलिंग साम्राज्याचा भाग होता. इ.स.पूर्व २६१ मध्ये सम्राट अशोकने कलिंगवर आक्रमण केले ज्याची परिणती कलिंगच्या युद्धात झाली.ऋग्वेदात उल्लेख आलेल्या कक्षीवान ऋषी हा कलिंग देशाच्या राणीच्या दासीचा पुत्र होता.महाभारतात याचे स्थान आर्यावर्ताच्या पूर्वेस असल्याचे सांगितले आहे.महाभारतातील अर्जुन कलिंगच्या तीर्थयात्रेला गेला होता.कर्णाने व कृष्णाने या प्रदेशावर स्वारी केली होती. परशुरामानेही कलिंग जिंकला होता.इतिहासावरून असे दिसते की मौर्य सामार्ज्याच्या स्थापनेपूर्वी हे एक प्रबल राज्य होते.
भूगोल
ओडिशा हे भरपूर खनिज संपत्ती असलेले राज्य आहे. छोटा नागपूरचे पठार व पूर्व घाट या राज्यात एकत्र येतात आणि या दोहोंतील खडकांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ओडिशामध्ये मोठय़ा प्रमाणावर खनिजे मिळतात
चतुःसीमा
ओडिशाच्या पूर्वेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस आंध्र प्रदेश, पश्चिमेस छत्तीसगढ तर उत्तरेस झारखंड ही राज्ये आहेत.
जिल्हे
यावरील विस्तृत लेख पहा - ओरिसामधील जिल्हे.
ओडिशा राज्यात ३० जिल्हे आहेत.
प्रमुख शहरे
क्रम | नाव | जिल्हा | लोकसंख्या (२०११) |
---|---|---|---|
1 | भुवनेश्वर | खोर्दा जिल्हा | 881,988 |
2 | कटक | कटक जिल्हा | 658,986 |
3 | रुरकेला | सुंदरगढ जिल्हा | 552,970 |
4 | ब्रह्मपूर | गंजम जिल्हा | 355,823 |
5 | संबलपूर | संबलपुर जिल्हा | 269,575 |
6 | पुरी | पुरी जिल्हा | 201,026 |
7 | बालेश्वर | बालेश्वर जिल्हा | 177,557 |
8 | भद्रक | भद्रक जिल्हा | 129,152 |
9 | बारीपाडा | मयूरभंज जिल्हा | 116,874 |
10 | झारसुगुडा | झारसुगुडा जिल्हा | 97,730 |
औद्योगिकीकरण व सामाजिक विरोध
तत्कालीन ओडिशातील (आताच्या झारखंड मधील) जमशेदपूर येथे पहिला स्वदेशी पोलाद कारखाना स्थापन झाला, आणि या भागातील खनिज संपत्तीमुळे या प्रदेशांचे मोठ्या प्रमाणात उद्योगीकरण झाले. मात्र गेल्या ६० वर्षांत विकास प्रकल्पांसाठी सुमारे ६ कोटी ग्रामस्थांनी आपली घरे, जमिनी गमावल्या. त्यापैकी वीस लक्ष ग्रामस्थ एकट्या ओडिशातील आहेत. विकास प्रकल्पांतून स्थानिकांना लाभ मिळत नसल्याचा अनुभव त्यांनी जवळपास सहा दशके घेतला आहे. त्यातून शहाणे झालेले स्थानिक आता येऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध करत आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |