विरुपाक्ष मंदिर (हंपी)
विरुपाक्ष मंदिर (हंपी) | ||
नाव: | विरुपाक्ष मंदिर (हंपी) | |
---|---|---|
स्थान: | ||
स्थान: | Hampi (Pampa Kshetra) | |
निर्देशांक: | 15°20′07″N 76°27′31″E / 15.335165°N 76.458727°E | |
हिंदू धर्माशी निगडित लेख |
---|
हिंदू देवता
|
हिंदू तत्त्वज्ञान
|
प्रथा
|
विरुपाक्ष मंदिर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील विजयनगर जिल्ह्यातील हंपी येथे आहे. हे हंपी येथील स्मारकांच्या समूहाचा एक भाग आहे, युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केले आहे. हे मंदिर शिवाचे रूप असलेल्या श्री विरुपाक्षाला समर्पित आहे. हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या प्रौढ देवराया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शासक दुसऱ्या देवरायाच्या सरदार (नायक) लक्कन दंडेशाने बांधले होते. [१]
विजयनगर साम्राज्याची राजधानी असेलेले हंपी शहर तुंगभद्रा नदीच्या (पम्पा होल/पम्पा नदी) काठावर वसले आहे. विरुपाक्ष मंदिर हे येथील मुख्य तीर्थक्षेत्र आहे. या परिसराला अनेक शतके पवित्र अभयारण्य मानले गेले आहे. हंपीचे अवशेष आजही त्यामुळे अबाधित आहेत. येथील मंदिरांमधून अजूनही उपासना होते. तुंगभद्रा नदीशी संबंधित असलेल्या स्थानिक देवी पंपादेवीची पत्नीचे एक मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. त्याला विरुपाक्ष/पम्पा पाथी म्हणून ओळखले जाते. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील नालागामापल्ले नावाच्या गावात विरुपाक्षिणी अम्मा मंदिर (माता देवी) आहे.
या मंदिराला सुमारे ७व्या शतकापासून अखंड इतिहास आहे. विजयनगरच्या सम्राटांनी आपली राजधानी येथे हलविण्या आधीपासूनच विरुपाक्ष-पम्पा अभयारण्य अस्तित्वात होते. येथे ९व्या आणि १०व्या शतकातील शिवाचा संदर्भ देणारे शिलालेख आहेत. [२] विजयनगरच्या साम्राज्याच्या सुरुवातीस हे मंदिर स्थापन झाले व साम्राज्याबरोबर त्याची व्याप्ती वाढली. मंदिराच्या बहुतेक इमारती विजयनगर काळातील असल्या तरी मंदिराच्या चालुक्य आणि होयसाळ कालखंडात मंदिरात काही भर घालण्यात आली होती. विजयनगर साम्राज्याचा शासक दुसरा देवराया याच्या अधिपत्याखाली लक्काना दंडेश या सरदाराने भव्य मंदिराची इमारत बांधली होती. [१]
विरूपाक्ष मंदिराच्या छतावरील चित्रे चौदाव्या आणि सोळाव्या शतकातील आहेत. [३] १५६५मध्ये मुसलमानांच्या आक्रमणात शहराचा विनाश झाला परंतु विरुपाक्ष-पम्पाची ही मंदिरे अबाधित राहिली. १९व्या शतकाच्या सुरुवातीस यांची मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार झाले तसेच काही इमारतीही बांधल्या गेल्या. यांत उत्तर आणि पूर्व गोपुराच्या काही तुटलेल्या बुरुजांचा जीर्णोद्धार करणे समाविष्ट होते.
मंदिराची रचना
[संपादन]विरुपाक्षाच्या मुख्य मंदिरात एक गर्भगृह, तीन बाहेरचे कक्ष, एक खांब असलेला सभामंडप आणि एक खांब असलेला खुला सभामंडप आहे. या खांबांवर नाजूक नक्षीकाम केलेले आहे. याशिवाय मुख्य मंदिराच्या आसपास अजून एक खांब असलेला मंडप, प्रवेशद्वार, अंगण, लहान देवळे आणि इतर छोट्या इमारती आहेत. [४]
उत्तरेकडील कनकगिरी गोपुर नावाचे गोपुर एका छोट्या देवस्थान असलेल्या एका तटबंदीला लागून आहे. ही तटबंदी तुंगभद्रा नदीपर्यंत जाते. [५]
या मंदिराचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे ते बांधण्यासाठी आणि सजवण्यासाठी गणिती संकल्पनांचा केलेला वापर आहे. मंदिरामध्ये फ्रॅक्टल्सची संकल्पना अनेक ठिकाणी वापरलेली आहे. मंदिराचा मुख्य आकार त्रिकोणी असून मंदिराच्या वरच्या बाजूला पाहता नक्षिकाम विभाजित होउन त्यांची पुनरावृत्ती होते. हे निसर्गात स्नोफ्लेक आणि इतरत्रही दिसून येतात. [६]
उत्सव
[संपादन]डिसेंबरमध्ये विरूपाक्ष आणि पंपाच्या लग्नोत्सवासाठी येथे प्रचंड होते. तसेच येथे फेब्रुवारी महिन्यात रथोत्सव साजरा केला जातो.
चित्रदालन
[संपादन]-
मुख्य गोपुर
-
मंदिराचे विहंगम दृष्य
-
मंदिराची मुख्य हत्तीण लक्ष्मी
-
मंदिरात जाताना भाविक
-
उत्सवासाठी तयारीत असलेले कलाकार
-
गर्भगृहाकडे जायच्या पायऱ्या
संदर्भ
[संपादन]- ^ a b Restoring the glory of Virupaksha temple
- ^ "Vijayanagara Research Project, Virupaksha Temple". 2007-07-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 September 2006 रोजी पाहिले.
- ^ Ceiling Paintings in the Virupaksha Temple, Hampi A.L. Dallapiccola (2010), Pages 55-66, https://doi.org/10.1080/02666030.1997.9628525
- ^ Karkar, S.C. (2009). The Top Ten Temple Towns of India. Kolkota: Mark Age Publication. p. 118. ISBN 978-81-87952-12-1.
- ^ "Trip to Hampi, the ruins of the magnificent Vijayanagara". Trayaan. 2016-02-09. 2016-10-07 रोजी पाहिले.
- ^ "Virupaksha Temple of Hampi: A mathematical and architectural wonder". Blank Slate Chronicles.
बाह्य दुवे
[संपादन]- विरुपाक्ष मंदिराची छायाचित्रे, २०१३ Archived 2014-03-29 at the Wayback Machine.
- विरुपाक्ष मंदिर संपूर्ण माहिती