Jump to content

दालन:महाराष्ट्र पर्यटन/जुने पान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दालन पानावरील जुन्या माहितीचे स्वरूप विश्वकोश निकषात सामावणारे नव्हते, खरेतर वगळणे जरूरी आहे पण बऱ्याच सदस्यांनी यावर काम केले असल्यामुळे तात्पुरते स्थानांतरीत केले आहे, हा प्रकल्प सुरळीत झाल्या नंतर हे पान वगळले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.


महाराष्ट्र हे राज्य भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, व्यापारी अशा सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासाच्या दृष्टीने चांगले लोहमार्ग, पक्क्या सडका, चांगली आणि स्वस्त क्षुधाशांतिगृहे, धर्मशाळा यांची इथे रेलचेल आहे.

जिल्हा

[संपादन]

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पर्यटनस्थळे खालील प्रमाणे:

चिखलदरा तालुक्यातील मेळघाट हा भाग वनश्रीने नटलेला आहे. महाराष्ट्राच्या मोजक्या अभयारण्यापैकी १५०० चौ.किलोमीटरपक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या मेळघाट अभयारण्यातील व्याघ्र प्रकल्प अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने आखलेला आहे. सेमाडोह ह्या जवळच्या गावी राहण्याची सोय वनखात्या तर्फे केली जाते, त्यासाठी पूर्वकल्पना देऊन आरक्षण करावे लागते.जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था असून जंगलातले वातावरण पूर्णपणे अनुभवायला हे एक उत्तम ठिकाण आहे. वन्य प्राण्यांशी संबंधित वस्तुसंग्रहालय तेथे असून रात्री व्याघ्र-जीवनावरचा लघुपट पडद्यावर दाखवला जातो (उपलब्ध असल्यास). चिखलदऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या सेमाडोहला जाण्यासाठी स्वतःचे वाहन असणे नेहमी चांगले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवाराच आहे. वाहन शक्यतो चारचाकी असल्यास आत खोलवर जंगलात जाता येते. वन्यजीव निरीक्षणाचा सर्वांत उत्कृष्ट काळ म्हणजे एप्रिल व जुन महिना (वन्य-जीव अनुभवा करीता). ह्या काळात पाण्याची वानवा असल्याने वनखाते संरक्षित जीवांसाठी कृत्रिम पाणवठे उपलब्ध करतात. तेथे थोडी प्रतीक्षा केल्यावरच अनेक वन्यजीव बघता येतात. जागोजागी मचाणे बांधून पर्यटकांची सोय करण्यात आलेली आहे. त्याच् बरोबर् जुलै ते डिसेंबर निसर्ग व वन्य-जीव अनुभवा करीता. तडस, नीलगाय सारखे काही प्राणीच हिवाळ्यात बघायला मिळतात पण आप्रतिम निसर्गाचा अनुभव आपणास लूटायाला मिळेल. चिखलदरा येथेही राहण्याची उत्कृष्ट सोय आहे. चिखलदरा ह्या थंड हवेच्या ठिकाणी वन्यप्राणिविषयक वस्तुसंग्रहालय खास बघण्यालायक आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या (MTDC) अतिथीगृहासाठी उत्कृष्ट ठिकाण निवडलेले असून पक्षी निरीक्षणाचा आनंद उपभोगता येतो.

श्रीकृष्णाचे रुक्मीणीहरण' या ऐतिहासिक व पौराणिक प्रसंगाला ज्या मंदिरांचा अथवा परिसराचा संदर्भ दिला जातो, ती जागा अमरावतीचे अंबा व एकविरादेवीचे मंदिर असल्याच्या कथा आहेत. आजची ही प्रदक्षिणा याच मंदिरांची. इतिहासकार वा संशोधक या संदर्भाचे शोध वा बारकाव्याचे तपशील काळाच्या कसोटीवर अभ्यासत आहेत. पण विदर्भाचे ऐतिहासिक वैभव म्हणूनच या मंदिरांची ओळख आहे. महाराष्ट्रातील अनेक लेखक, कवी इतिहासकार, कलावंत आणि क्रीडापटूंसह अनेक राजकीय धुरिणांची कारकिर्द या मंदिराच्या प्रदक्षिणेने सुरू होते.

'विदर्भाची सांस्कृतिक राजधानी' असा ज्या शहराचा उल्लेख होतो, त्या अमरावतीमध्ये एकविरा व अंबादेवी या नावाने देवींची दोन मंदिरे आहेत. साधारणत: ही मंदिरे तीन-साडेतीनशे वर्षांपूर्वीची अस� जगाच्या पाठीवर पोहेचली आहे. आता असलेली ही मंदिरे नव्या बांधणीची असली तरी साधारणत: वीसेक वर्षपूर्वी या मंदिराचा चेहरामोहरा पुरातन वाटावा असाच होता. अंबादेवी मंदिराची पुरातन वास्तू लाकडी खांबावर चितारली होती. अजूनही काही भाग याचपद्धतीचा आहे. मंदिरातील प्रवेश मोठमोठ्या काळ्या पायऱ्यांवरुन होतो.

सभामंडपात शिरण्यापूर्वी मोठा पितळी दरवाजा आहे. तो पार करून आत प्रवेश केल्यावर थेट देवीचे दर्शन घडते. मात्र तत्पूर्वी मंदिर परिसर लक्ष वेधून घेतो. सभामंडपाचे दोन्ही भाग लाकडी बांधणीचे आहे. प्रदक्षिणामार्ग काळ्या चकत्या दगडांचा होता. आता तो फरशींचा बनला. आता मात्र या मंदिरात प्रवेश घेतल्याक्षणापासून नव्या बदलाची जाणीव होते. अंबादेवी मंदिराच्या मूळ गाभार्‍याबाहेरील भाग नक्षीदार काचांनी सुभोषित केला आहे. कैकदा वाटू लागते की आपले प्रतिबिंब या काचांमध्ये पडले आहे. तिथे असणारी अंबादेवीची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे.

मूर्तीच्या स्थापनेचा ऐतिहासिक उल्लेख असणारे दस्तावेज नाही. 'तांदळास्वरुपाची ध्यानस्थ मूर्ती' असे या मूर्तीचे वैशिष्ट्य. या मूर्तीला अमावस्या व पौर्णिमा तसेच मंगळवारी सुवर्णालंकार चढविले जातात. दहा तोळ्यांचा सोन्याचा मुलामा चढविलेला मुखवटा मूर्तीला लावला जातो. बिंदीपासून कंबरपट्ट्यापर्यंत अगणीत दागिन्यांनी ही मूर्ती जेव्हा सजते तेव्हा डोळे दिपतात. वेशभूषेचे खास नियमही आहेत, ते म्हणजे मूर्तीला फक्त नऊवारी साडी परिधान केली जाते. मूर्तीच्या आजूबाजूला शंकर, गणपती, कालभैरव, नंदी आदीच्या मूर्ती आहेत. उंदीर आणि कासवही देखणा आहे. मंदिराला परकोटीची बांधणी आहे. त्याला दोन मोठी दारं आणि ती बंद करण्यासाठी अवजड किल्लेदारी पद्धतीची तटबंदी आहे.

अंबादेवी मंदिराच्या बाजुला एकविरा देवीचे मंदिर आहे. आहुत्यांनी माखलेल्या होमकुंडातून येणारा धुपचंदनाचा मिश्रगंध, फुलांच्या दरवळणारा सुगंध मन वेधून घेतो. नवरात्रौत्सवातील हे चित्र कायम स्मरणात राहते पण नेहमीच अनुभवाला येईल, असे नाही. या मंदिराचे सध्या नुतनीकरण सुरू आहे. या मंदिराच्या नविनीकरणामध्ये स्वत: लक्ष घालणार्‍या महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती झाल्यानंतर अमरावतीच्या या दोन्ही देवस्थानांचे दर्शन घेतले.

एकविरादेवी मंदिराचा जीर्णोद्धार योगाचार्य जनार्दनस्वामींनी केला होता. त्याला आता चारशे वर्षे होऊन गेली. या मंदिराचे मूळ स्वरुप दुमजली लाकडी बांधणीचे होते तर देवीचा गाभारा काळ्या दगडांचा होता. घुमटावर चारही वेदांची नावे कोरली होती. ती दुरुनच दिसायची. आता सुरू असलेले बांधकाम राजस्थानी गुलाबी दगडांचे कोरीव आहे. मंदिराचा विस्तारही करण्यात आला आहे. जनार्दनस्वामी समाधीभाग खोलगट भागात असल्याने मंदिराचे पुरातन वैशिष्ट्य जपले त्याचबरोबर विस्तार झाल्याने मंदिर हवेशीर आणि प्रशस्त झाले आहे. सद्या या मंदिराला तीन बाजुंनी बाहेर जाण्याचे मार्ग आहेत. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन उत्तम पद्धतीने करणे या ठिकाणी शक्य होते.


औरंगाबादला मुक्काम करून वेरूळ, अजिंठा-वेरूळची लेणी, बीबी का मकबरा, दौलताबादचा किल्ला तसेच घृष्णेश्वर मंदिर, पैठणचे एकनाथ महाराजांचे मंदिर, पैठण धरण , वृंदावन उद्यानाच्या धर्तीवर बनवलेले पैठण येथील नाथ उद्यान. तसेच जवळच असलेले आणि हळूहळू प्रसिद्ध होत असलेले म्हैसमाळचे हिलस्टेशन आणि तेथील बालाजीचे मंदिर.

बीड कनकालेश्वर् मन्दिर   परळी वैजनाथ-बारा ज्योतिर्लिन्गापैकि यक्

तालुके १३ ०१. बुलढाणा ०२. खामगाव् ०३. मेहेकर् ०४. मलकापुर् ०५. लोनार् ०६. देउलगाव् राजा ०७. सिन्द्खेद् राजा ०८. मोताला ०९. जलगाव् जामोद् १०. सन्ग्रामपुर् ११. शेगाव् १२. चिखलि १३. नान्दुरा

शेगाव येथे संत श्री गजानन महाराज समाधि आहे. सिंदखेडराजा येथे छत्रपति शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाउचा जन्म झाला. लोणार येथे उल्कापातामुळे तयार झालेले जगप्रसिद्ध सरोवर आहे.

चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर, अंचलेश्वर आणि गोंड राजांचे समाधिस्थळ ही प्रसिद्ध स्थळे. एक अप्रसिद्ध परंतु अतिशय सुंदर शिल्पकलेने नटलेले लहानसे शिवमंदिर बाजाराजवळ एका गल्लीत आहे. येथे तुम्हाला ह्या स्थळांची छायाचित्रे बघता येतील.ह्याशिवाय चंद्रपुरातील एक अप्रसिद्ध परंतु आवर्जून बघण्यासारखे स्थळ म्हणजे रायप्पा कोमटी ह्यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बांधकाम सुरू केलेले पण अपूर्ण राहिलेले मंदिरस्थळ. येथे महाकाय मूर्ती ऊन्ह, धूळ आणि पावसाचा मारा सहन करीत उघड्यावर पडून आहेत. जवळपास तीस फूट उंचीच्या नवमुखी दुर्गेच्या मूर्तीला रावण समजून दसर्‍याच्या दिवशी लोक दगड मारीत. त्यामुळे मूर्तीला क्षती पोचली आहे. ह्याशिवाय महाकाय आकारच्या गणपती, वराह, मत्स्य आणि इतर मूर्ती तिथे आहेत.

येथून २० कि.मी. अंतरावर औंढा तालुकयामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग "नागनाथ" हे पांडवकालीन मंदिर आहे. हे मंदिर सुमारे ५५०० वर्षांपूर्वीचे असून औरंगजेब राजाने हल्ला करून याची बरीच नासधूस केली होती. शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

नांदेड हे मराठवाड्यातले क्र. २ चे शहर गोदावरीनदीच्या तीरावर वसले आहे.शीख पंथाचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंग, यांचा शेवट नांदेड शहरी झाला. म्हणून येथील गुरुद्वाराला विषेश महत्त्व आहे. शीख पंथातील चार मुख्य अमृतसर, ग्वाल्हेर,नांदेड हे आणि अजून एक (?) यांपैकी हे गुरूद्वार आहे.

उस्नम===}}==उस्मानाबाद== उस्मनाबाद जिल्ह्यात तुळजापुर येथे श्रि आई तुळजा भवानि चे मन्दिर आहे.तेर येथे सन्त्‌ गोरोबा काका चे मन्दिर आहे.परान्डा व नळदुर्ग येथे भुईकोट किल्ले आहेत.

पुण्यापासून अंदाजे ३०-३५ कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला नावाप्रमाणेच भक्कम आहे. तानाजी मालुसरे यांच्या सिंहासारख्या कामगिरीमुळे मूळच्या कोंडाणा किल्ल्याचे नाव 'सिंहगड' झाले. गडावरील देव टाके थंड आणि गोड पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. गडावर राजाराम महाराज यांची समाधी आणि तानाजी मालुसरे यांचे स्मारक आहे. शिवाय मुंबई-दूरदर्शनचा मनोरा, लो. टिळक आणि ग.दि माडगुळकर यांचे बंगलेसुद्धा आहेत.

पुण्यापासून अंदाजे ५० कि.मी. वर भुलेश्वर हे देवस्थान आहे. हे बहुधा पांडवकालीन असावे. मूर्तिकाम पाहण्यासारखे आहे. लढायांच्या धामधुमीत बर्‍यायाच मूर्तींची तोडफोड झालेली दिसते. गणपतीची स्त्री रूपातील भारतातील कदाचित एकुलती मूर्ती या मंदिरात आहे. गाभार्‍यात शिवलिंग आहे. मात्र फक्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. [लढाईचाच परिणाम] पिंडीवरील खोलगट भागात मिठाई किंवा पेढा ठेवल्यास तो खाल्ल्याचा आवाज ऐकू येतो. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. पुरन्दर तलुक्यातील माळशिरस गावाच्या ह्द्दीत मंदिर आहे. यादव राजांच्या काळातील हे बांधकाम आहे. श्रावण महिन्यात दर् सोमावारी यात्रा भरते. मन्दिराची माहिती असलेले यादवकालीन् भुलेश्वर् हे दशरथ् यादव याचे पुस्तक् आहे.

पुण्यापासून अंदाजे ४० किलोमीटरवर वर कार्ल्याची प्रसिद्ध लेणी आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकातील आहेत. ही बौद्ध लेणी म्हणजे स्थापत्यशास्त्राचे एक अप्रतिम उदाहरण आहे. तेथेच एकविरा देवीचे मंदिरही आहे. देवीची मूर्ती अतिशय कोरीव असून डोळे अगदी जिवंत वाटतात.

कार्ल्याच्या अगदी विरुद्ध दिशेला लोहमार्गाच्या पलीकडे ही भाजा लेणी आहेत.

कार्ल्याच्या दक्षिणेस अंदाजे १० कि.मी. अंतरावर, कामशेत रेल्वे स्टेशनजवळ, बेडसे हे छोटे गाव आहे. तेथील लेणी आकाराने छोटी आहेत मात्र आकर्षक आहेत.

पुण्यापासून अगदी, ३५ - ४० किमी.(?) अंतर असेल. अहमदनगर रस्त्यावर, वाघोली नंतर एक फाटा डाव्या हाताला वळतो. काही अंतरावरच तुळापूर आहे. अगदी निसर्गरम्य ठिकाण आहे. श्री. संभाजी महाराजांची समाधी आणि सुमारे १२०० वर्षांचे जुने शिवमंदिर बघण्यासारखे आहे. शिवाय, नावेतून फिरतासुद्धा येते. ३ नद्यांचा संगम आहे.

चाकण पासून उजव्या बाजूला जाणारा रस्ता भंडारा डोंगराला जातो... महान संत तुकाराम यांनी आपले लिखाण याच ठिकाणी केले... सोबत तुकाराम मंदिर - गाथा मंदिर असे बरेच काही पाहण्यासारखे आहे.

पुण्यापासून अंदाजे १ तासाच्या अंतरावर श्री कानिफनाथ मंदिर आहे. मुख्य समाधिठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे. बापदेव घाट पार करून वरती मंदिरापर्यंत जाता येते. रविवारी सकाळी आरती व प्रसाद वाटप होते. मंदिराच्या गाभार्‍यायामध्ये फक्त पुरुषांनाच अंगरखा/सदरा उतरवून अंदाजे २/२ मापाच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश करावा येतो.

वानवडीमध्ये महादजी शिंदे याची ही राजवाडावजा इमारत आजही मोठ्या डोलात उभी आहे. मंदिराच्या बांधकामामध्ये राजस्थानी कला दिसून येते. रविवार वजा(?) आठवडाभर येथे भेट देता येते. मंदिराच्या आतमध्ये शिंदे घराण्याच्या आजपर्यंतच्या पिढ्यांची छायाचित्रे पहायला मिळतात.

लोहगडाच्या पाठीमागे, पायथ्याशी प्रति पंढरपूर साकारत आहे. 'आधुनिक तुकाराम' म्हणून प्रसिद्ध श्री बाबा महाराज सातारकर यांच्या प्रेरणेतून हे बांधकाम होत आहे.

शेकरूंसाठीचे अभयारण्य भीमाशंकर

[संपादन]

निसर्गाचा वरदहस्त लाभलेले भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील एक अद्वितीय ठिकाण आहे. अतिप्राचीन काळापासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर महामूर पाऊस पडतो आहे. भीमाशंकर हे सह्यकण्यावरच वसलेले वृक्ष-वेली-प्राणी-पक्षी-किडे-अभयचर-सरपटणारे अशा जैविक विविधतेने संपन्न असलेले भीमा नदीचं उगमस्थान आहे. जे महत्त्व हिंदुस्थानात गंगा-यमुना-ब्रह्मपुत्रेला तेच महत्त्व महाराष्ट्रात गोदावरी-भीमा-कृष्णा- वैनगंगेला! इथली रमणीयता, उंची आणि पुणे-मुंबई-नाशिकला जवळ असल्याने कोणी कोणी इथे महाबळेश्‍वरसा(?)-- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने इथे येणाऱ्या भाविकांना इथले पुजारी आग्रहाने सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्‍न करतात. पुण्यापासून अवघ्या १२० किलोमीटर अंतरावर असणारे भीमाशंकर एसटी बससेवेने पुणे शहराला थेट जोडलेले आहे.

चासकमान

[संपादन]

पुणे-नाशिक रस्त्यावरील राजगुरुनगर मार्गे चास या गावी जाता येतं. राजगुरुनगर ते चास सहा आसनी रिक्षा किंवा जीप उपलब्ध असतात. या गावात तटबुरुजांसह एक ऐतिहासिक वाडा आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची सासुरवाडी असणाऱ्या जोशी यांची ही गढी. जोशी यांच्या घरातील लाडूबाई ऊर्फ ताईसाहेब यांचा विवाह बाजीराव यांच्याशी झाला. सकलसौभाग्यसंपन्न काशीबाईसाहेब बनून त्या पेशवे कुटुंबात सामील झाल्या. त्याच जोशींचे विद्यमान वंशज या वाड्यात राहतात. अनेक ऐतिहासिक वस्तू त्यांच्याकडे आहेत. ...... चास गावात उजव्या सोंडेच्या गणपतीचे पाठक यांचे मंदिर, पाटणकरांचे लक्ष्मी-विष्णू मंदिर, लघाटे यांचे गणेश मंदिर आणि डौलदार दीपमाळ असलेलं श्री सोमेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये दगडी दीपमाळा आहेत. पण या सोमेश्‍वर महादेवाच्या देवळातील डौलदार दीपमाळ केवळ त्या सम तीच. त्रिपुरी पौर्णिमेला इथे दीपोत्सव होतो. तेव्हा तर दीपवैभव पाहण्यासारखेच असते.

किकलीचे श्री भैरवनाथ मंदिर

[संपादन]

पुणे-सातारा या राष्ट्रीय हमरस्त्याने वाई-महाबळेश्‍वरकडे जाताना खंबाटकी घाट उतरल्यावर भुईंज हे गाव लागते. तिथेच डावीकडे चंदन-वंदन किल्ल्यांची जोडी नजरेस पडते. या दोन किल्ल्यांच्या मध्ये एक रुंद खिंड आहे. दोन्ही गडमाथ्यांकडून उतरत आलेले तीन टप्पे पायऱ्यांसारखे दिसतात. किकली गावात देखण्या प्रवेशद्वाराचे, दीपमाळा असणारे, चिरेबंदी बांधणीचे एक शिवमंदिर आहे. त्याला श्री भैरवनाथ मंदिर म्हणतात. खूप कलाकुसर असणारे हे ठिकाण.

निघोजचे रांजणखळगे

[संपादन]
  • काळघुगे गणेश ( देविबभोयरे )

ऐन उन्हाळ्यातपण आवर्जून पहावे असे एक ठिकाण पुण्याच्या अगदी जवळच आहे. पुणे-नगर रस्त्यावरील शिरूर ओलांडले, की घोडनदीवरचा पूल लागतो. तिथे पुणे जिल्हा संपतो. पुलापलीकडे नगर जिल्हा आहे. पुलानंतर एखाद-दीड किलोमीटर गेले, की डावीकडे एक रस्ता फुटतो. तेथील फलकावर "निघोज २४ किलोमीटर' असं लिहिलेले आहे. पुणे-निघोज एसटी बस इथूनच जाते. या निवांत रस्त्याने जाताना बाजूची शेते, डेरेदार वृक्ष पाहून मन प्रसन्न होते. थोडे पुढे गेल्यावर आशिया खंडातील बहुधा एकमेव असे बॅसॉल्ट जातीच्या खडकांमधील सर्वांत मोठे रांजण खळगे आहेत. पण अगदी जवळ जाईपर्यंत हे असे इथे काही तरी वैशिष्ट्यपूर्ण आहे याची कल्पनाच येत नाही. नदीकाठाशी पोचले, की रांजणाच्या आकाराचे असंख्य लहान- मोठे खळगे आणि तळाशी पाण्याचा प्रवाह दिसतो. निघोज येथिल पर्यटन स्थळाचा महा. मध्ये तिसरा क्रमांक् लागतो.

श्री पांडेश्‍वर मंदिर

[संपादन]

जेजुरी- मोरगाव परिसरातील मुद्दाम भेट देण्याजोगे एक ठिकाण म्हणजे जेजुरीपासून दहा किलोमीटरवरील श्री पांडेश्‍वर. मोरगावकडे जाणाऱ्या एसटी बस इथे येण्यासाठी उपयुक्त ठरतात. कर्‍हा नदीच्या काठी हे मंदिर आहे. या मंदिराची बांधणी खूप मोठ्या विटांनी केलेली आहे. त्यावर जाड गिलाव्याचा थर आहे. सातवाहनकालीन विटांप्रमाणे या विटा वाटतात. मात्र देवळासमोरचा दगडी मुखमंडप नंतरचा असला तरी तोही सात-आठशे वर्षांपूर्वीचा असावा. या मुखमंडपात २४ देवकोष्टे (कोनाडे) आहेत. त्यातील मूर्ती मात्र गायब आहेत. मंदिराच्या गाभार्‍यासमोर गजपृष्ठाकृती सभामंडप आहे. या सभामंडपाच्या भिंती आणि छत यावर भौमितिक रंगीत नक्षी असून त्यातच काही चित्रे व लेख आहेत. मात्र हे सारे फारच पुसट झाले आहे. भारत इतिहास संशोधक मंडळातील डॉ. गणेश गंगाधर मुजुमदार आणि डॉ. कमल चव्हाण यांनी १९७२-७३ च्या सुमारास या भित्तिचित्रांचा अभ्यास केला होता. अतिशय दुर्मीळ अशा या पुरातन भित्तीचित्रांचा निगुतीने सांभाळ करण्याची नितांत आवश्‍यकता आहे. महाभारत, रामायण, कृष्णलीला, शिवलीला, दशावतार हे चित्रविषय तर त्यात आहेतच. पण काही युद्धदृश्‍ये, शिकारीला निघालेला राजपुरुष, दोन राजपुरुषांची भेट, नृत्यसभा, प्रेमीयुगुल यांचीही चित्रे त्यात आहेत. हत्ती, घोडे, हरीण, उंट, कुत्रा, गाय, असे प्राणी, मोर, पोपट आदी पक्षी यांचेही चित्रण त्यात आहे.

सातवाहनांच्या स्मृती जपणारा नाणेघाट

[संपादन]

पुण्यातून शंभर किलोमीटरवरचे जुन्नर गाठायचे आणि तेथून घाटघर किंवा अजनावळे गावी जाणारी बस पकडायची. आता जीपची सोयही उपलब्ध आहे. जुन्नर-आपटाळे-चावंड मार्गे घाटघर हा प्रवास जवळचा पण रस्ता अतिशय खराब. त्यामुळे जुन्नर-माणिकडोह मार्गे घाटघर हा लांबचा पण चांगल्या रस्त्याचा पर्याय अधिक स्वीकारार्ह. जुन्नरपासून ३२ किलोमीटर आणि ठाणे जिल्ह्यातील कल्याणपासून ६४ किलोमीटर अंतरावर नाणे घाटाचा अनुक्रमे माथा व पायथा आहे. नाणेघाट हा पायऱ्या-पायऱ्यांचा घाट सुमारे पाच किलोमीटर लांबीचा आहे.

सरदार पानसे यांची सोनोरी

[संपादन]

आपल्या परिसरात वेळ काढून जाण्यासारखी अशी किती तरी ठिकाणे असतात. तिथे घडलेला इतिहास, त्या ठिकाणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व या गोष्टी विचारात घेऊन अशा ठिकाणी गेले तर आपल्या भेटीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. ........ ..... पुण्याहून सासवडपर्यंत पीएमटी बससेवा तर आहेच, पण दिवे घाटातून सासवडकडे जाणाऱ्या सोनोरी फाट्याशी उतरवणार्‍या एसटी बसही उपयुक्त ठरतात. सासवडहून रिक्षा किंवा एसटी बसनेही सोनोरीला येता येते. थोडे पायी चालायची तयारी असेल तर सोनोरी फाटा ते सोनोरी आणि सासवड ते सोनोरी असे चालतही जाता येते.

लोणी भापकरचे वराहमंदिर

[संपादन]

भगवान विष्णूचे दशावतार सर्वांनाच परिचयाचे आहेत. त्यांपैकी श्रीराम व श्रीकृष्णाची मंदिरे भारतभर आहेत. वराहमूर्तीचे देवालय फारच क्वचित आढळते. चाकणच्या चक्रेश्‍वरापाशी एक भग्न वराहमूर्ती आहे. रामटेक (नागपूरजवळ) आणि खजुराहो (मध्य प्रदेश) येथेही वराह देवालये आहेत. श्री विष्णुमूर्तींमध्ये प्रभावळीत दशावतार कोरलेले असतील, तर त्यातही वराहशिल्प आढळते. मानवी शरीर आणि वराहमुख अशा नृवराहाच्या मूर्ती असतात किंवा वराह हा पशुरूपातही दाखविलेला आढळतो, त्याला ""यज्ञ वराह म्हणतात. ....... अष्टविनायकांमधील प्रसिद्ध अशा मोरगावच्या मयूरेश्‍वराचे दर्शन घेऊन, जवळच्या आठ-दहा किलोमीटर अंतरावरील लोणी भापकर या गावी जाता येते. गावातील लोकांना दत्तमंदिराची वाट विचारावयाची आणि या भागात यायचे. इथे एक विस्तीर्ण आणि सुबक बांधणीचे कुंड आहे. या कुंडाची उत्तर बाजू इतर बाजूंपेक्षा वेगळी आहे. तिथे वराहमंडप आहे. या आटोपशीर मंडपात पूर्वी वराहमूर्ती होती. केव्हा तरी ती स्थानभ्रष्ट झाली. सध्या ही भग्न मूर्ती याच देवळाच्या पाठीमागील शेतात पडलेली दिसते.

रायगड

[संपादन]

किल्ले रायगड

[संपादन]

किल्ले रायगड मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये एक खास ओळख धरून आहे. शिवाजीराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून १४व्या शतकातल्या रायरी नावाच्या या किल्ल्याला आपल्या साम्राजाची राजधानी बनवले. महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला.

महाराजांच्या पश्चात सुमारे सहा वर्षे रायगड हीच राजधानी होती. गडावर जाण्यसाठी एकच मार्ग आहे. दुसऱ्याया मार्गाने गडावरून उतरणार्‍या 'हिरकणीची' कथा अगदी प्रसिद्ध आहे. गडावर जाण्यासाठी सध्या रस्सी-मार्गा[रोपवे]ची सोय आहे.

रायगडावरील अश्‍मयुगीन गुहा

[संपादन]

पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाडगावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोपवेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या बाराशे पायऱ्या चढून गेले, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असं म्हणू लागले आहेत. ...... जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आलं, की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारं दृश्‍य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव, पाचाड ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.

या गुहेत सतत वाहणारा थंडगार वारा, एकापाठोपाठ येणाऱ्या थंड वार्‍याच्या झुळुका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्‍मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचं एखादे नैसर्गिक ठिकाण निश्‍चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्ग यात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्‍मयुगीन मानवाचे जुने वसतिस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा याचे आकर्षण इथे भेट देणार्‍याला पडतेच पडते.

रायगड म्हणजे दुर्गदुर्गेश्‍वर. महाराष्ट्राचा सर्वांत वैभवशाली किल्ला. शाळा- महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर येतात. काही जण दोरवाटेने पाळण्यात बसून जातात, तर काही हजार-बाराशे पायऱ्या चढून रायगडावर पोचतात. त्या सर्वांनी हे वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा अवश्‍य पाहिली पाहिजे.


गणपतीपुळेतिरकी अक्षरे

अग्रशीर्ष मजकुर

[संपादन]

येथील स्वयम्भू गणेश, देखणे मन्दिर आणि रम्य समुद्रकिनारा पूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकाना आकर्षित करतो.

ह्र्णे

सांगली शहराचे आद्य दैवत असलेले गणपती मंदिर येथील एक श्रद्धास्थान आहे. सांगलीचे संस्थानिक पटवर्धन राजे यांनी बांधलेल्या या मंदिराचे बांधकाम पंचायत पद्धतीचे आहे. या मंदिराच्या सभोवती आणखी ४ मंदिरे आहेत--सूर्यनारायण, चिंतामणि...आणखी इतर दोन. मंदिरातील 'बबलू' नावाचा हत्ती प्रसिद्धच आहे. त्याच्यासाठी खास दूरदर्शनची सोय आहे. बबलूच्या 'डिस्कव्हरी' व 'ऍनिमल प्लॅनेट' या आवडत्या वाहिन्या आहेत. लहान तसाच मोठ्यांचाही बबलू आवडता आहे. मंदिराच्या प्रबंधक समितीने केलेल्या सुधारणांमुळे मंदिराचा परिसर नयनरम्य आहे. बबलू हत्तीच्या राहण्याच्या ठिकाणाजवळ 'केंगणेश्वरी' देवीचे मंदिर आहे, सांगलीतील बऱ्याच कुळांची ही कुलदेवता आहे. मंदिराच्या मालकीचे उंट, घोडे, ससे इ. प्राणीही येथे आहेत. एक प्रेक्षणीय स्थळ...

सांगलीपासून जवळच 'बागेचा गणपती' म्हणून आणखी एक गणपती मंदिर आहे. हे खरे संस्थानिकांचे पूर्वीपासूनचे दैवत. येथूनच पुढे हरिपूर नावाचे छोटे गाव आहे. येथिल शिवमंदिर प्रसिद्ध आहे. श्रावण मासात दर सोमवारी येथे जत्रा भरते. वरील तीनही स्थळे कृष्णेच्या काठी आहेत.

नृसिंह वाडी, श्रीक्षेत्र औदुंबर (श्री दत्त देवस्थान ), आष्टा (श्रीरामांनी दंडकारण्यातील वास्तव्यात स्थापन केलेली आठ शिवलिंगे येथे आहेत - शिवलिंगाच्या साळुंकीवर धनुष्य-बाण कोरलेले आहेत)


रेवणसिद्ध मंदीर, रेणावी

[संपादन]

विटयापासून ९ किलोमीटर अंतरावर रेणावीच्या डोंगरावर अतिशय सुंदर आणि भव्य असे रेवणसिद्धाचे मंदीर आहे. रेवणनाथ हे नवनाथांपैकी एक नाथ आहेत. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.

सिन्धुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. नितान्तसुन्दर समुद्रकिनारे ही या जिल्हयाची ओळख आहे.

वडगाव (पोतनीस)

[संपादन]

ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळ व भव्य मंदिरे पाहावयास मिळणारे वडगाव (पोतनीस) हे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्‍यात आहे. पुण्यापासून ५० किलोमीटरवर बंगळूर- सातारा रस्त्यावर हे गाव आहे. शिरवळ महाविद्यालयापासून लोहोम-मांढरदेवकडे जाणाऱ्या रस्त्यावर नायगावच्या पुढे ते येते. आजूबाजूस डोंगरकपारी आहेत. ....... म्हैसूरचे टिपू सुलतान व पेशवे यांच्या सैन्यांत श्रीरंगपट्टण येथे झालेल्या लढाईत पोतनीस यांचे काही जवान कामी आले; तसेच राक्षस भुवन येथील निजामाशी झालेल्या लढाईत पोतनीस यांचे युवक शहीद झाले. या दोन्ही लढायांत पेशव्यांना विजय मिळाला. त्या वेळी श्रीमंत माधवराव पेशव्यांनी वडगाव व आसपासच्या पाच गावांतील जमिनी इनाम वतनी दिल्या; तसेच पुणे आणि वडगावचे वाडे, मंदिरे बांधण्यास पोतनीस यांच्या पूर्वजांना मदत केली, असा इतिहास आहे.

वाईजवळील निसर्गरम्य धोम

[संपादन]

पुण्याहून वाई अवघे पाऊणशे किलोमीटर. वाई शहर, मेणवली, पांडवगड, पाचगणी अशी अनेक ठिकाणं वाईजवळ आहेत. वाईपासून धोम गावापर्यंत एसटी बससेवा तर आहेच; पण सहा आसनी रिक्षा आणि टॅक्‍सीही मिळू शकतात. ....... महाबळेश्‍वरला उगम पावलेल्या कृष्णा नदीवर बलकवडी आणि धोम ही दोन धरणे बांधली गेली; त्यामुळे वाईच्या कृष्णा नदीकिनारीच्या घाटांची रयाच गेली. धोम गावी आवर्जून जाऊन पाहावे असं एक मंदिर संकुल आहे. श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर आणि शेजारचे शिवमंदिर हा समूह भेट देण्याजोगा. इथं कृष्णेच्या तीरावर वाळुंज म्हणजे सॅलिक्‍स टेट्रास्पर्माची झाडी आहे. पूर्वी या वृक्षाच्या सालींपासून सॅलिसिलिक ऍसिड काढले जाई. त्याचा उपयोग डोकेदुखी थांबविण्यासाठी केला जाई. आता हे वेदनाशामक औषधी द्रव्य कृत्रिमरीत्या कारखान्यात तयार करतात.

कृष्णाकोयना या नद्यांच्या प्रितीसंगमावर वसलेले महाराष्ट्रराज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे हे गाव तालुक्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.

अक्कलकोट स्वामी समर्थ भक्तांसाठी प्रसिद्ध आहे. अक्कलकोटला स्वामींचे भव्य मंदिर, त्यांचा गावातील मठ प्रसिद्ध आहे. मंदिराच्या अन्नछत्रामध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे ४/५ सहस्र भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. मंदिराची धर्मशाळा अप्रतिम आहे.अक्कलकोटचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील आशियाखंडातील सर्वांत मोठे(?) असलेले शस्त्रागृह. इथे सर्व जुने परंपरागत शस्त्रांचा साठा येथील भोसले राजगृहाने प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे. वेगवेगळे खड्ग, ढाली, बर्च्या, भाले, दांडपट्टे, कुर्‍हाडी, बंदुका, खंजीर इत्यादी इत्यादींचे वैविध्याने नटलेले प्रदर्शन पाहून मन हरखून जाते.

येथील राजकन्येचा लहान मुलांच्या खेळण्यातील गाड्यांचा संग्रह मनाला मोहवितो. राजपुरुषांची सुंदर आणि रंगीत छायाचित्रे मनाला भुरळ पाडतात. त्यानंतर शिवपुरीचे दर्शन मनाला वेगळीच दिशा देते. तेथे हवन, यज्ञ आणि सकाळ-सांयकाळी पौरोहित्याचे महत्त्व पटवण्यात येते.

अक्कलकोटमध्ये दोन मोठे भक्तनिवास आहेत. एक देवस्थानचा आणि एक अन्नछत्र मंडळाचा. सोयींच्या बाबतीत देवस्थानच्या भक्तनिवास थोडा उउवा आहे असे म्हणता येईल. तेथे तुमच्या गाडीच्या चालकासाठीसुद्धा सोय होते. छोटेसे उपाहारगृह, प्रशस्त खोल्या, स्वामींचे जीवनदर्शन घडवणारे छोटेसे कायमस्वरूपी संग्रहालय या गोष्टी आहेत.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


thane sharat kalyan jawalil chikanghar gavat shree mahasoba devache chan ashe mandir hai shree mahasoba dev ha navsala pavnara dev hai.shree mahasoba devachi yatra hi mahavir janti la sappan hote yatrala maharashtratun hajaro bhavik yetat devache mandir he prati shani shignapur sarkhe hai.

mahasoba dev ha gavache rashan karto mahasoba dev ha gurecharnarychya rupat darshan deto.devala kombadya bakraycha man dela jato.tethil vatavarn agadi prassan hai.devsthan he purna gramasth mandal chikenghar sambalte.

ek da eka chorane devlatil ghanta chornychya prayatna kela tya chorala devane gavache vesh hi olandun deli nhai.ashi akhyika prasidhha hai

महाराष्ट्रातील वर्ध्याजवळ सेवाग्रामचे महत्त्व काही वेगळेच आहे. महात्मा गांधींनी सेवाग्राम येथे दांडीयात्रेनंतर आपला मुक्काम जवळपास १० वर्षे होता.(१९३२ ते १९४२). देशाच्या मध्यभागी असलेले भौगोलिक स्थान, त्यामुळे देशातील सर्वच कार्यकर्त्यांना भेटणे सोईचे होईल हा त्यामागील उद्देश होता. येथे त्यांचा रम्य असा आश्रम आहे. बापूंची कुटी, बा की कुटी, त्यांचे सचिव महादेवभाई यांची कुटी, आश्रमातील रुग्णासाठी असलेली जागा, इतरत्र असलेली प्रशस्त जागा, मोठाले वृक्ष आणि रम्य असा परिसर एकदा तरी पहावा असाच आहे. जवळच पवनार येथे विनोबांनी स्थापन केलेला ब्रह्मविद्या आश्रम आहे. तेथील वैशिष्ट्य म्हणजे हा आश्रम पूर्णपणे स्त्रियाच चालवतात. स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांनी ब्रह्मविद्येचा अभ्यास करावा असे विनोबाजींचे मत होते. तेथे राहण्याचीसुद्धा सोय आहे. विनोबा आणि गांधीविचाराचे सर्व साहित्य येथे मिळते. गांधींनी आपले पाचवे मानलेले पुत्र श्री. जमनादासजी बजाज यांचे वस्तुसंग्रहालय पाहतांना स्वातंत्र्य चळवळीशी आपले नाते वेगळ्याच पातळीवर जाऊन ठेपते. मगनवाडी येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांचे निवासस्थान आहे. तेथे सरहद्द गांधी वगैरे नेते मुक्काम करीत असत. तेथे जुनी फोर्ड गाडी ठेवलेली आहे. तिला बैल जोडून त्यावेळच्या नेत्यांना नेण्याआणण्यासाठी वापरत. सरदार पटेल तिला थट्टेने ऑक्स-फोर्ड असे म्हणत. गीताई मंदिर. विनोबाजींची गीताई मोठ्या शिलाखंडावर कोरलेली आहे. त्याची रचनाही पाहण्यासारखी आहे. आकाशातून पाहिले तर त्या शिलाखंडाचा आकार चरख्याप्रमाणे अथवा बसलेल्या गायीप्रमाणे वाटतो. जवळच बुद्धाची एक मोठी बसलेल्या अवस्थेतील मूर्तीही दिसते. तेथे अनेक परकीय पर्यटक भेट देत असतात. एका दिवसाची सेवाग्राम भेट एक आगळे वेगळे समाधान देते.

बाह्यदुवे

[संपादन]