तुळापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.पूर्वीचे नाव 'नांगरवास'.

तुळापूर हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे. तुळापूर आळंदी पासून साधारण १४ किमी वर, तर पुण्यापासून अंदाजे ३० किमी वर आहे. येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.

तुळापूर येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.

इतिहास[संपादन]

शहाजी राजे आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नांगरवासगावी पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीची तुला करण्याची इच्छा झाली पण एवढा थोर बच्चा कसा जोखावा याची त्याला काही केल्या उकल होईना. मग शहाजीराजांनी पुढे होऊन त्याला तोड सांगितली. हत्तीचा बच्चा भीमा आणि इंद्रायणी यांच्या संगमातील डोहातल्या एका नावेत चढविण्यात आला. त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खूण करून घेतली. मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगडधोंडे नावेत चढविले आणि त्या दगडांच्या भाराइतके सोनेनाणे दान करण्यात आले. तेव्हापासून त्या 'नांगरवासास' 'तुळापूर' म्हणू लागले.