न्यू साउथ वेल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू साउथ वेल्स
New South Wales
ऑस्ट्रेलियाचे राज्य
Flag of New South Wales.svg
ध्वज
New South Wales coa.png
चिन्ह

ऑस्ट्रेलियाच्या नकाशात न्यू साउथ वेल्सचे स्थानऑस्ट्रेलियाच्या नकाशावर न्यू साउथ वेल्सचे स्थान
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राजधानी सिडनी
क्षेत्रफळ ८,०९,४४४ वर्ग किमी
लोकसंख्या ७२,७२,८००
घनता ९.१२ प्रति वर्ग किमी
वेबसाईट http://www.nsw.gov.au

न्यू साउथ वेल्स हे ऑस्ट्रेलिया देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. न्यू साउथ वेल्सच्या उत्तरेस क्वीन्सलंड, पश्चिमेस साउथ ऑस्ट्रेलिया, दक्षिणेस व्हिक्टोरिया तर पूर्वेस टास्मान समुद्र हा प्रशांत महासागराचा उपसमुद्र आहे. सिडनी ही न्यू साउथ वेल्सची राजधानी असून हे ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठे शहर आहे. मार्च २०१२ साली ७२.७२ लाख लोकसंख्या असलेल्या न्यू साउथ वेल्समध्ये एकूण ऑस्ट्रेलियाच्या ३४.५ टक्के लोक राहतात.

१७७० साली कॅप्टन जेम्स कूकने ऑस्ट्रेलियाचा शोध लावल्यानंतर १७८८ साली ब्रिटिशांनी येथे न्यू साउथ वेल्स ही वसाहत स्थापन केली. पुढील अनेक वर्षे बव्हंशी ऑस्ट्रेलियन भूभाग न्यू साउथ वेल्सच्याच अधिपत्याखाली येत असे. १९व्या शतकात हळूहळू इतर प्रदेश न्यू साउथ वेल्सपासून वेगळे केले गेले. ह्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये न्यू साउथ वेल्सचे वर्चस्व आजही कायम आहे. अर्थव्यवस्था, शिक्षण, कला, क्रीडा इत्यादी बाबतीत हे ऑस्ट्रेलियामधील आघाडीचे राज्य आहे.


मोठी शहरे[संपादन]

सिडनी व्यापार केंद्र
न्यूकॅसल
वूलँगगाँग
क्रम शहर/महानगर लोकसंख्या[१]
सिडनी 43,36,374
न्यूकॅसल 5,23,662
वूलँगगाँग 2,80,159

गॅलरी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ[संपादन]