अमोल रामसिंग कोल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डॉ. अमोल कोल्हे
जन्म डॉ. अमोल रामसिंग कोल्हे
१८ ऑक्टोबर १९८०
नारायणगाव पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ 2007-कार्यरत
भाषा मराठी
प्रमुख नाटके महानाटक शिवपुत्र शंभूराजे
प्रमुख टीव्ही कार्यक्रम राजा शिवछत्रपती
वडील श्री. रामसिंग कोल्हे
पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीवरील 'राजा शिव छत्रपती' या ऐतिहासिक मालिकेपासून ते प्रसिद्धीस आले. आता नवीन सुरु झालेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये हि त्यांनी संभाजी महाराज या पात्राची भूमिका करत आहेत. [१]

डॉ. अमोल कोल्हे हे एक प्रभावशाली वक्ते आहेत आणि ते सध्या शिवसेना या पक्षाचे सदस्य आहेत.[२]

सुरुवातीचे जीवन[संपादन]

डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आणि १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. [३] [४] [५]

डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्‍नी डॉक्टर अाश्विनी या वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहेत. [६]

अमोल कोल्हे यांची भूमिका असलेले चित्रपट[संपादन]

[७] [८]

शीर्षक वर्ष
अरे आवाज कुणाचा २०१४
आघात २०१०
ऑन ड्यूटी २४ तास २०१०
मराठी टायगर्स   २०१६
मुलगा २००९
रंगकर्मी २०१३
राजमाता जिजाऊ २०११
राम माधव २०१४
साहेब २०१२

दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम[७][९][संपादन]

}

अमोल कोल्हे यांची भूमिका असलेली नाटके[७][९][संपादन]

शीर्षक वाहिनी नोंद
अधुरी एक कहाणी झी मराठी मराठी मालिका
आमची शाखा कुठेही नाही मराठी कथाबाह्य कार्यक्रम (निवेदक)
ओळख स्टार प्रवाह मराठी मालिका
मंडळ भारी आहे स्टार प्रवाह मराठी कथाबाह्य कार्यक्रम (निवेदक)
या गोजिरवाण्या घरात ई टीव्ही मराठी मराठी मालिका
राजा शिवछत्रपती     स्टार प्रवाह मराठी मालिका (छत्रपती शिवाजी महाराज)
वंडर्स ऑफ महाराष्ट्र मराठी कथाबाह्य कार्यक्रम (निवेदक)
वीकेंड मेजवानी ई टीव्ही मराठी मराठी कथाबाह्य कार्यक्रम (निवेदक)
वीर शिवाजी   कलर्स हिंदी मालिका (छत्रपती शिवाजी महाराज)
सांगा उत्तर सांगा मराठी कथाबाह्य कार्यक्रम (निवेदक)
स्वराज्य रक्षक संभाजी झी मराठी मराठी मालिका (छत्रपती संभाजी महाराज)

{| class="wikitable"

!शीर्षक |- |प्रपोजल |- |भगवा - नृत्यनाट्य |- |महा नाटक शिवपुत्र शंभूराजे |- |सत्ताधीश |}

राजकीय कारकीर्द[संपादन]

डॉ. अमोल कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत. ते सध्या (२०१६ साली) पुण्याचे संपर्क प्रमुख आहेत. ते त्यांच्या आक्रमक भाषणशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते.[१०]

राजकारणात मिळालेली पदे[संपादन]

 • २०१४ पासून : उपनेते, शिवसेना[११]
 • २०१४ : शिवसेनेचे प्रचारक वक्ते[१२][१३]
 • २०१५ : पुणे जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख

संदर्भ[संपादन]

 1. ^ http://www.justmarathi.com/amol-kolhe/
 2. ^ http://dramolkolhe.blogspot.in/2008/10/amol-kolhe.html
 3. ^ http://dramolkolhe.blogspot.in/2008/10/amol-kolhe.html
 4. ^ http://www.marathi.tv/actors/amol-kolhe/
 5. ^ http://eci.nic.in/ECI_Main1/AE2014/StarCampMaharashtra_ShivSena.pdf
 6. ^ http://shivsena.org/m/admin-wing/#toggle-id-2
 7. a b c A b c d "Amol Kolhe Biography, Wife, Speech, Height, Photos". Marathi.TV. 2015-07-25. Retrieved 2016-07-13.
 8. ^ http://shivsena.org/m/admin-wing/#toggle-id-4
 9. a b http://marathimovieworld.com/profile/dr-amol-kolhe.php
 10. ^ http://eci.nic.in/ECI_Main1/AE2014/StarCampMaharashtra_ShivSena.pdf
 11. ^ http://shivsena.org/m/admin-wing/#toggle-id-2
 12. ^ http://www.dnaindia.com/india/report-shiv-sena-replaces-senior-spokespersons-sanjay-raut-manohar-joshi-by-five-new-faces-2037145
 13. ^ http://shivsena.org/m/admin-wing/#toggle-id-4