राजा शिवछत्रपती (मालिका)
राजा शिवछत्रपती | |
---|---|
प्रकार | ऐतिहासिक |
दिग्दर्शक | हेमंत देवधर |
कथा | डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे |
निर्माता | * नितीन चंद्रकांत देसाई,
|
निर्मिती संस्था | चंद्रकांत प्रोडक्शन |
कलाकार | अमोल कोल्हे, मृणाल कुलकर्णी |
थीम संगीत संगीतकार | ऋषिराज |
शीर्षकगीत | अजय-अतुल |
संगीतकार | अशोक पत्की |
देश | भारत |
भाषा | मराठी |
निर्मिती माहिती | |
सह निर्माता | अतुल केतकर |
संकलन | प्रशांत खेडकर |
स्थळ | एन.डी. स्टुडिओ, कर्जत |
कॅमेरा | निर्मल जानी, योगेश जानी |
प्रसारणाची वेळ | २२ मिनिटे |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | डिझ्नी स्टार |
प्रथम प्रसारण | २४ नोव्हेंबर २००८ – २००९ |
राजा शिवछत्रपती ही एक मराठी दूरचित्रवाहिनी मालिका आहे. हे ऐतिहासिक नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. राजा शिवछत्रपती ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर २००८-०९ मध्ये प्रसारित झाली. २०२० टाळेबंदी दरम्यान प्रेक्षकांच्या मागणी मुळे राजा शिवछत्रपती मालिकेचे पुनःप्रसारण केले जात होते.[१]
निर्मिती
[संपादन]राजा शिवछत्रपती निर्मिती आणि चित्रीकरण 'एन. डी. स्टुडिओ' मध्ये झाले. हे स्टुडिओ कर्जत येथे आहे. हे नाटक हिंदी चित्रपट सृष्टीतील आर्ट डायरेक्टर नितिन चंद्रकांत देसाई यांनी केले. राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरेंच्या याच नावाच्या कादंबरी वरून बनवले गेले होते. नवखे कलाकार अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावली आणि मृणाल कुलकर्णी यांनी राजमाता जिजाबाईंची भूमिका निभावली.या कार्यक्रमाचं वेशभूषा व्यवस्थापन पूर्णिमा ओक यांनी केलं तर कार्तिक केंढे यानी सह दिग्दर्शक केल. प्रतीआभास दृश्यांची निर्मिती जितेंद्र वर्मा यानी केली. रंगभूषा अमोद दोषी आणी सुहास गवते यानी केली. ध्वनि कार्य विजय भोपे यांनी सांभाळले. राजा शिवछत्रपती कार्यक्रमातील वेशभुषा निता लुल्ला यानी बनवली होती. सर्व देखावे नितीन चंद्रकांत देसाई यानी बनवले होते. या कार्यक्रमाचं वेशभूषा व्यवस्थापन पूर्णिमा ओक यांनी केलं तर कार्तिक केंढे यानी सह दिग्दर्शक केल. प्रतीआभास दृश्यांची निर्मिती जितेंद्र वर्मा यानी केली. रंगभूषा अमोद दोषी आणी सुहास गवते यानी केली. ध्वनि कार्य विजय भोपे यांनी सांभाळले. राजा शिवछत्रपती कार्यक्रमातील वेशभुषा निता लुल्ला यानी बनवली होती. सर्व देखावे नितीन चंद्रकांत देसाई यानी बनवले होते. [२]
कलाकार
[संपादन]- अमोल कोल्हे - छत्रपती शिवाजी महाराज, मराठा साम्राज्य संस्थापक.
- मृणाल कुलकर्णी - राजमाता जिजाबाई.
- अविनाश नारकर - शहाजीराजे भोसले
- यतीन कार्येकर - औरंगजेब
टीआरपी
[संपादन]आठवडा | वर्ष | TAM TVT | क्रमांक | |
---|---|---|---|---|
महाराष्ट्र/गोवा | भारत | |||
आठवडा ४० | २००९ | ०.८५ | २ | ७८ |
संदर्भ
[संपादन]- ^ "लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहवर पुन्हा भेटीला येणार 'राजा शिवछत्रपती'". लोकसत्ता. १ एप्रिल २०२०. ११ एप्रिल २०२० रोजी पाहिले.
- ^ "Raja Shivchhatrapati". हॉट स्टार (इंग्रजी भाषेत). 2023-09-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.