Jump to content

जड पाणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ड्युटेरियमचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू यांच्या संयोगातून जड पाणी तयार होते. जड पाणी हलक्या पाण्याच्या तुलनेत सुमारे साडेदहा टक्के जड किंवा वजनदार असते. त्याचा उत्कलन बिंदू पाण्यापेक्षा एका अंशाने जास्त असतो.

हायड्रोजन या मूलद्रव्याची एकूण तीन समस्थानिके आहेत. निसर्गातील अनेक संयुगांचा घटक असणाऱ्या नेहमीच्या हायड्रोजनच्या अणुकेंद्रात एक प्रोटॉन असून एक इलेक्ट्रॉन त्याच्याभोवती फिरत असतो.

हायड्रोजनच्या दुसऱ्या समस्थानिकाला ड्यूटेरिअम असे नाव आहे. ड्यूटेरिअमच्या अणुकेंद्रात एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन असे दोन कण असतात व एकच इलेक्ट्रॉन या अणुकेंद्राभोवती भ्रमण करतो.

हायड्रोजनच्या तिसऱ्या समस्थानिकमध्ये अणुकेंद्रामध्ये एकंदर तीन कण असतात, एक प्रोटॉन व दोन न्यूट्रॉन. या अणुकेंद्राभोवतीसुद्धा एकच इलेक्ट्रॉन फिरत असतो. हायड्रोजनचे हे दुसरे दोन प्रकार निसर्गात सापडत नाहीत.

उपयोग

[संपादन]

साधे पाणी न्यूट्रॉन्सना पुष्कळ जास्त प्रमाणात नष्ट करते, जड पाणी न्यूट्रॉन्सना पुष्कळ जास्त प्रमाणात नष्ट करत नाही. यामुळे अणुभट्टीतील आण्विक प्रक्रियांतील साखळी टिकवून ठेवण्यासाठी जड पाणी वापरले जाते. (न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी जड पाणी यांचा संचलक किंवा मंदक म्हणून वापर करतात.)