क्रीडा म्हणजे सर्वमान्य नियमांद्वारे चालणारी व मनोरंजनाचे उद्दिष्ट असणारी कौशल्यपूर्ण शारीरिक क्रिया होय. स्पर्धेसाठी, विरंगुळ्यासाठी, श्रेष्ठता गाठण्यासाठी, कौशल्य विकसवण्यासाठी किंवा हे सर्व हेतू क्रीडेमध्ये समाविष्ट असू शकतात. क्रीडेच्या उद्देशांमधील फरक वा गुणदोष, हे यातील प्रत्येक व्यक्तिपरत्वे (किंवा संघापरत्वे) कुशलता किंवा हेतू मनात ठेवून करण्यामुळे उद्भवू शकतात.
स्पर्धेतील प्रत्येक संघाला सामने सुरू होण्याआधीच १० लक्ष अमेरिकन डॉलर देण्यात आले. साखळी सामन्यांनंतर बाहेर पडलेल्या संघांना प्रत्येकी ८० लाख डॉलर मिळाले. झाकुमी हा १५ वर्षे वयाचा मानवसदृश चित्ता २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी होता. अदिदास या कंपनीने तयार केलेला जबुलानी हा चेंडू स्पर्धेत वापरण्यात आला. इसिझुलू भाषेत जबुलानीचा अर्थ सगळ्यांना आनंदित करणारा असा होतो.
हॉकी, किंवा फिल्ड हॉकी, हा एक सांघिक खेळ आहे. ह्या खेळात खेळाडू स्टीकच्या मदतीने चेंडू विरूध्द संघाच्या गोल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. खेळाचे मान्यता प्राप्त नाव हॉकी असले तरी ज्या देशा हॉ़की नाव इतर हॉकी प्रकारांसाठी उदा. आईस हॉकी, वापरल्याजाते त्या देशात ह्या खेळाला फिल्ड हॉकी म्हणले जाते.
हॉकी मध्ये पुरूष व महिलांसाठी अनेक नियमीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. महत्वाच्या आंतररष्ट्रीय स्पर्धेत ऑलिंपिक, कॉमनवेल्थ खेळ, हॉकी विश्वचषक , चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक स्पर्धेंचा समावेश होतो.
आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन (एफ आय एच) हि खेळाची सर्वोच्च संघटना आहे. एफ आय एच हॉकी विश्वचषक व महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करते तसेच खेळांची नियमावळी ठरवते.
अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात फुटबॉल व क्रिकेट नंतर सर्वात जास्त खेळाडू असणारा हा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी सामने पुरूष आणि महिला खेळतात.
आपण खेळ क्रीडा विषयातील रसिक, खेळाडू , क्रिडा शिक्षक,क्रिडा संपादक,क्रिडा बातमीदार लेखक अथवा वाचक प्रेक्षक असल्यास आपले येथे स्वागत आहे. आपण नविन लेख तयार करू शकता तसेच विस्ताराच्या प्रतिक्षेत असलेल्या लेखांमध्ये आपण आपले योगदान देउ शकता.
नवीन सदस्यांना विनंती :कृपया मराठी विकिपीडियावर आपले सदस्य खाते उघडावे.आणि अधिक माहिती आणि मदती करिता विकिपीडिया:क्रीडा येथे भेट द्यावी.