Jump to content

खो-खो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खो-खो हा एक पारंपरिक भारतीय मैदानी खेळ आहे. हा प्राचीन भारतातील सर्वात जुन्या मैदानी खेळांपैकी एक आहे. भारतीय उपखंडातील दोन सर्वात लोकप्रिय पारंपरिक टॅग खेळांमध्ये खो-खो आणि कबड्डीचा समावेश होतो.[१]

खो-खो दोन संघांद्वारे खेळला जातो, ज्यामध्ये पंधरापैकी बारा खेळाडू असतात. यातले नऊ खेळाडू गुडघ्यांवर बसून मैदानात प्रवेश करतात (चेझिंग टीम) ,आणि तीन अतिरिक्त (बचाव करणारा संघ) खेळाडू विरोधी संघाच्या सदस्यांचा स्पर्श टाळण्याचा प्रयत्न करतात.

खो-खो
खो-खो खेळताना मुली. चित्र: २०१३
माहिती
संघ सदस्य १२; पैकी ९ मैदानात, ३ राखीव
वर्गीकरण मैदानी
साधन नाही
मैदान खो खो मैदान
ऑलिंपिक नाही

  हा खेळ संपूर्ण दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांसारख्या दक्षिण आशियाच्या बाहेरील प्रदेशांमध्येही तो खेळला जातो. हा भारत आणि पाकिस्तानमधील शाळकरी मुलांद्वारे नेहमी खेळला जातो, हा एक स्पर्धात्मक खेळ आहे.[२] खो-खो असा खेळ आहे जो तग धरण्याची क्षमता वाढविण्यास मदत करतो आणि शालेय मुलांच्या सामाजिक आणि मानसिक विकासास मदत करतो.

हरियाणा येथील एका सरकारी शाळेत खो-खो खेळताना विद्यार्थी. दि. ऑक्टोबर २००९

*खेळाचे मैदान*[संपादन]

खो-खो खेळपट्टीचे रेखाटन. पांढऱ्या रेषा मार्कर आहेत, काळी वर्तुळे लाकडी खांब आहेत (~ 4 फूट उंच), पिवळे बाण टीम सदस्यांचा पाठलाग करत आहेत. तर हसरे चेहरे हे बचावकर्ते आहेत.
 • एकूण क्षेत्राची आवश्यकता 30m x 19m (सर्व बाजूंनी 1.5m रुंद असलेल्या लॉबीसह.)
 • दोन्ही ध्रुवांच्या मागे 1.5m x 16m मुक्त क्षेत्रासह खेळण्याचे क्षेत्र 27m x 16m.
 • ध्रुव अंतर 24m मध्यवर्ती लेन दोन ध्रुवांना जोडणारी 24m लांबी x 30cm रुंदी.
 • क्रॉस लेन 8 न. मध्यवर्ती लेनला छेदत आहे. प्रत्येक लेन 16m x 35m.
 • खांबाचा आकार - उंची (जमीन पातळीच्या वर - 120 सेमी ते 125 सेमी, व्यास 9-10 सेमी.)
 • या खेळामध्ये संघामध्ये प्रत्येकी 12 खेळाडू (आशियाई खो - खो फेडरेशनच्या नियमांनुसार प्रत्येकी 15 खेळाडू) असलेले दोन संघ आहेत तर प्रत्यक्षात फक्त 9 खेळाडू खेळत आहेत.
 • सामन्यात 4 वळणे आहेत ज्यात दोन बचाव आणि दोन चेस वळणे आहेत.
 • प्रत्येक वळण 9 मिनिटांचा असतो.
 • प्रत्येक पुट-आउट डिफेंडर पाठलाग करणाऱ्या संघासाठी एक गुण आणतो.
 • उच्च गुण मिळवणारा संघ विजेता म्हणून घोषित केला जातो.
 • गेममध्ये संरक्षण तसेच ट्रॅकिंग कौशल्ये असतात.
 • संरक्षण: सिंगल चेन, डबल चेन, रिंग गेम, डोजिंग आणि फेकिंग.
 • पाठलाग करणे: धावणे, पोल डायव्ह करणे, खांबावर फसवणे (निर्णय) खो, उशीर झालेला खो, क्रॉस लेनमध्ये जाणे इ.

व्युत्पत्ती[संपादन]

हे नाव मराठी भाषेतील खो-खो[३] वरून आले आहे. "खो" हा शब्द एक आवाज आहे, जो खेळत असताना वापरला जातो. याला "खो देणे" असे म्हणतात.[४]

खो - खो खेेेेळाचा इतिहास[संपादन]

खो-खो

खो-खोची सुरुवात नेमकी कधी झाली हे कळणे कठीण आहे. खो खो या खेळाचा उगम महाराष्ट्राच्या या मातीतच खऱ्या अर्थाने झाला. पकडापकडीच्या खेळातून उत्क्रांती होत ह्या खेळाचा जन्म झाला असावा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या खेळात सुसूत्रता आणण्यास सुरुवात झाली. १९१४ साली पुणे जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली. १९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली प्रसिद्ध केली. १९५९-६० साली भारत सरकारने आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे खो-खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली. खो-खोच्या प्रतिभावंत खेळाडूंना भारत सरकारकडून पुढील पुरस्कार मिळतात.

खेळाचे नियम[संपादन]

खो-खोमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात. परंतु एका वेळेस ९ खेळाडू खेळतात. खेळ दोन भागांमध्ये विभागला जातो. दोन भागांमध्ये ५ मिनिटे विश्रांतीचा कालावधी असतो. प्रत्येक भागात पुन्हा दोन उपभाग असतात. त्यातील पहिल्या उपभागात पहिला संघ पाठलाग करतो व दुसरा संघ बचाव करतो. दुसऱ्या उपभागात पहिला संघ बचाव करतो तर दुसरा पाठलाग करतो. दोन्ही उपभगांमध्ये २ मिनिटे विश्रांतीचा काळ असतो. थोडक्यात, संपूर्ण खेळ साधारणतः ३७ मिनिटे (७+२+७+५+७+२+७) चालतो.

खेळाच्या सुरुवातीला पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमधील आठ चौकोनांत आळीपाळीने विरुद्ध दिशांना तोंड करून बसतात. नववा खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा राहतो.बचाव करणाऱ्या संघाचे तीन खेळाडू मैदानात असतात. खेळ सुरू झाल्यावर पाठलाग करणाऱ्या सघाचा नववा खेळाडू बचाव करणाऱ्या संघाच्या तीन खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करतो. पाठलाग करणाऱ्या खेळाडूवर खालील बंधने असतात.

 • एकदा एका खांबाकडील दिशा पकडल्यावर तो आपली दिशा बदलू शकत नाही (खांबाला स्पर्श करून तो आपली दिशा बदलू शकतो)
 • तो दोन खांबाना जोडणारी रेषा ओलांडू शकत नाही पळण्याची दिशा बदलण्यासाठी पकडणारा खेळाडू इतर खेळाडूंना खो देऊ शकतो. खो देण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे घडते.
 • पळणारा खेळाडू मैदानाच्या ज्या बाजूस असेल, त्या बाजूस तोंड करून बसलेल्या खेळाडूलाच तो खो देऊ शकतो
 • खो देताना पळणारा खेळाडू खो दिल्या जाणाऱ्या खेळाडूच्या पाठीवर थाप मारून 'खो' असा आवाज करतो.
 • खो घेतलेला खेळाडू मग, त्याचे तोंड असलेल्या बाजूस उजव्या किंवा डाव्या दिशेस (पकडण्यासाठी) पळण्यास सुरुवात करतो.
 • ज्याने खो दिलेला आहे तो खेळाडु, खो घेतलेल्या खेळाडुची जागा घेतो.

वरील प्रकारे खो-खोची साखळी सुरू रहाते.

बचाव करणाऱ्या खेळाडूवर मैदानात पळताना कोणतेही निर्बंध नसतात. कोणताही बचाव करणारा खेळाडू खालील प्रकारांनी बाद होऊ शकतो

 • पकडणाऱ्या खेळाडूने (बचाव करणाऱ्या खेळाडूस) तळ्हाताने स्पर्श केल्यावर
 • बचाव करणारा खेळाडू मैदानाबाहेर गेल्यास
 • बचाव करणारा खेळाडूने मैदानात उशीरा प्रवेश केल्यास

बचाव करणाऱ्या संघाचे तीनही खेळाडू बाद झाल्यावर पुढचे तीन खेळाडू मैदानात प्रवेश करतात. नवीन खेळाडूंनी पुढचा खो देण्याआधी मैदानात उतरणे आवश्यक असते. अन्यथा त्यांना बाद धरण्यात येते.

बाद केलेल्या प्रत्येक खेळाडूया बदली प्रतिस्पर्धी संघाला एक गुण मिळतो. पहिल्या भागाच्या अखेरीस प्रत्येक संघाचे गुण बघितले जातात. ज्या संघाचे गुण जास्त, त्या संघाची विरुद्ध संघावर दोन्ही संघांमधील गुणांच्या फरकाइतकी आघाडी धरली जाते. दुसऱ्या भागाच्या अखेरीस, जो संघ आघाडी मिळवितो तो संघ त्या आघाडीने विरुद्ध संघावर मात करतो. हा खेळ चांगला आहे.

खो-खोच्या स्पर्धा[संपादन]

भारतामध्ये खो-खोच्या खालील स्पर्धा आयोजित केल्या जातात. काही भारतीय खो खो खेळाडू सतीश राय, सारिका काळे, पंकज मल्होत्रा, मंदाकिनी माझी, प्रवीण कुमार.

 • राष्ट्रीय स्पर्धा
 • राष्ट्रीय कुमार स्पर्धा
 • राष्ट्रीय निम्नस्तरीय कुमार स्पर्धा
 • आंतरशालेय (उच्च्माध्यमिक) स्पर्धा
 • आंतरशालेय (माध्यमिक) स्पर्धा
 • आंतरशालेय प्राथमिक स्पर्धा
 • राष्ट्रीय महिला स्पर्धा
 • आंतर्विद्यापीठ स्पर्धा

संदर्भयादी[संपादन]

 1. ^ Hastie, Peter A. (2010). Student-Designed Games: Strategies for Promoting Creativity, Cooperation, and Skill Development (इंग्रजी भाषेत). Human Kinetics 10%. ISBN 978-1-4504-0914-8.
 2. ^ "Trip down memory lane: The games we play..." The Express Tribune (इंग्रजी भाषेत). 2011-08-14. 2022-04-26 रोजी पाहिले.
 3. ^ साचा:OxfordDictionaries.com
 4. ^ साचा:साइट वेब

बाह्य दुवे[संपादन]