Jump to content

इंद्रजित सिंह बिंद्रा स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान
मैदान माहिती
स्थान मोहाली
स्थापना १९९३
आसनक्षमता २६,०००
मालक पंजाब क्रिकेट असोसिएशन
यजमान भारत क्रिकेट संघ (१९९३-सद्य)
पंजाब क्रिकेट संघ (१९९३-सद्य)
किंग्स XI पंजाब (२००८-सद्य)

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. १० - १४ डिसेंबर १९९४:
भारत  वि. वेस्ट इंडीज
अंतिम क.सा. २६ - ३० नोव्हेंबर २०१६:
भारत  वि. इंग्लंड
प्रथम ए.सा. २२ नोव्हेंबर १९९३:
भारत वि. वेस्ट इंडीज
अंतिम ए.सा. २२ सप्टेंबर २०२३ २०२३:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम २०-२० १२ डिसेंबर २००९:
भारत वि. श्रीलंका
अंतिम २०-२० २७ मार्च २०१६:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१६
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

पंजाब क्रिकेट असोसिएशन आय.एस. बिंद्रा मैदान हे चंदिगढ जवळ मोहाली येथे वसलेले एक क्रिकेट मैदान आहे. ते बहुतेकदा मोहाली स्टेडियम म्हणून ओळखले जाते. सदर मैदान हे पंजाब क्रिकेट संघाचे होम ग्राऊंड आहे. मैदानाच्या बांधकामासाठी अंदाजे रुपये २५ कोटी इतका खर्च आला आणि पूर्ण होण्यास ३ वर्षांचा कालावधी लागला.[] मैदानाची अधिकृत प्रेक्षकक्षमता २६,९५० इतकी आहे.[]. मैदानाची रचना अरून लुंबा आणि असोशिएट, पंचकुला यांची असून बांधकाम आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनी, चंदिगढ यांनी केले आहे.[]

येथे प्रकाशझोताचे दिवे इतर क्रिकेट स्टेडियमच्या तुलनेत अपारंपरिक आहेत. जवळच्या चंदिगढ विमानतळावरून उड्डाण करण्याऱ्या विमानांच्या सुरक्षिततेसाठी येथील दिव्यांच्या खांबाची उंची फार कमी आहे. आणि त्यामुळे मैदानावर १६ फ्लडलाईट आहेत.

हे मैदान भारतातील १९ वे आणि नवीन कसोटी मैदानांपैकी एक आहे. मैदानाची खेळपट्टीचा एकदम जिवंत आणि तेज गोलंदाजांना मदत करणारी असा नावलौकिक आहे. परंतु अलिकडे (डिसेंबर २०११) ती काहीसी मंदावली असून फिरकी गोलंदाजांनाही मदत करु लागली आहे. २२ नोव्हेंबर १९९३ रोजी हिरो चषक स्पर्धेदरम्यान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्याने मैदानाचे उद्घाटन झाले.

त्यानंतरच्या मोसमात १० डिसेंबर १९९४ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान येथे पहिला कसोटी सामना सुरू झाला. ह्या मैदानावर झालेल्या चित्तथरारक सामन्यांपैकी एक होता ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज दरम्यान १४ मार्च १९९६ रोजी झालेला क्रिकेट विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना. क्रिकेट विश्वचषक, २०११ मध्ये पीसीए मैदानावर ३ सामने खेळवले गेले, त्यामधलाच एक खिळवून ठेवणारा सामना होता ३० मार्च २०११ रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा दुसरा उपांत्य सामना, ज्यात भारताने बाजी मारली. ह्या सामन्यास एकमेकांदरम्यानचे संबंध सुधारण्याचा एक भाग म्हणून भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे युसफ रझा गिलानी हे उपस्थित होते.

पीसीए मैदान हे आयपीएल फ्रँचायझी किंग्स XI पंजाबचे होम ग्राउंड आहे. परंतु त्यांचे मोहालीमधील प्रदर्शन अगदी साधारण असेच आहे.

मैदानाच्या सध्याच्या खेळपट्टीचे क्युरेटर दलजीत सिंग.[] आणि रचना सल्लागार Ar. सुफ्यां अहमद हे आहेत. भारतीय खेळपट्ट्यांपैकी ही एक सर्वात हिरवी खेळपट्टी आहे आणि बाकिचे मैदानसुद्धा हिरवेगार असल्याने, चेंडूची लकाकी जास्तवेळ राहते आणि तेज गोलंदाज त्याचा फायदा जास्तीत जास्त वेळ घेऊ शकतात. मोहालीची खेळपट्टी नंतर नंतर मंद होते आणि फलंदाजांसाठी नंदनवन ठरते.

स्वतंत्रता चषक किंवा फ्रिडम ट्रॉफी स्पर्धेची पहिली कसोटी मोहाली येथे खेळवली गेली. ह्या कसोटीमध्ये, भारतीय फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून खूप मदत मिळाली आणि भारताच्या गोलादाजांसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज चाचपडत खेळताना दिसले. तीन दिवसांत संपलेल्या ह्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०८ धावांनी दणदणीत पराभव केला. मोहाली मध्ये फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून इतकी मोठी मदत मिळण्याची ही पहिलीच वेळ होती.

महत्त्वाच्या नोंदी

[संपादन]

कसोटी मधील सर्वाधिक सांघिक धावसंख्या = न्यू झीलंड ६३०-६घो वि भारत, २००३-०४ मोसम.

कसोटी मधील सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या = भारत ८३ वि न्यू झीलंड, १९९९-०० मोसम.

एकदिवसीय सामन्यामधील सर्वाधिक सांघिक धावसंख्या = दक्षिण आफ्रिका ३५१-५ वि नेदरलँड्स, क्रिकेट विश्वचषक, २०११.

एकदिवसीय सामन्यामधील सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या = पाकिस्तान ८९ वि दक्षिण आफ्रिका २००६ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी.

आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामधील सर्वाधिक सांघिक धावसंख्या = भारत २११-४ वि श्रीलंका, २००९-१० मोसम.

आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामधील सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या = पाकिस्तान १५८-५ वि न्यू झीलंड, आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६.

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

[संपादन]

कसोटी

[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
१०-१४ डिसेंबर १९९४ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २४३ धावा धावफलक
१९-२३ नोव्हेंबर १९९७ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अनिर्णित धावफलक
१०-१४ ऑक्टोबर १९९९ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड अनिर्णित धावफलक
३-६ डिसेंबर २००१ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत १० गडी धावफलक
१६-२० ऑक्टोबर २००३ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड अनिर्णित धावफलक
८-१२ मार्च २००५ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अनिर्णित धावफलक
९-१३ मार्च २००६ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ९ गडी धावफलक
१७-२१ ऑक्टोबर २००८ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ३२० धावा धावफलक
१९-२३ डिसेंबर, २००८ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अनिर्णित धावफलक
१-५ ऑक्टोबर २०१० भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत १ wicket धावफलक
१४-१८ मार्च २०१३ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ६ गडी धावफलक
५-७ नोव्हेंबर २०१५ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत १०८ धावा धावफलक
२६-२९ नोव्हेंबर २०१६ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ८ गडी धावफलक

एकदिवसीय

[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२२ नोव्हेंबर १९९३ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत ४३ धावा धावफलक
१४ मार्च १९९६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ धावा धावफलक
९ नोव्हेंबर १९९६ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ५ धावा धावफलक
९ मे १९९७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २२ धावा धावफलक
२४ मे १९९७ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ११५ धावा धावफलक
१४ मे १९९८ भारतचा ध्वज भारत बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारतचा ध्वज भारत ५ गडी धावफलक
१ एप्रिल १९९९ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी धावफलक
१० मार्च २००२ भारतचा ध्वज भारत झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारतचा ध्वज भारत ६४ धावा धावफलक
२८ ऑक्टोबर २००५ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत ८ गडी धावफलक
७ ऑक्टोबर २००६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३७ धावा धावफलक
२५ ऑक्टोबर २००६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५१ धावा धावफलक
२७ ऑक्टोबर २००६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १२४ धावा धावफलक
२९ ऑक्टोबर २००६ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी धावफलक
१ नोव्हेंबर २००६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३४ धावा धावफलक
८ नोव्हेंबर २००७ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४ गडी धावफलक
२ नोव्हेंबर २००९ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २४ धावा धावफलक
३ मार्च २०११ Flag of the Netherlands नेदरलँड्स दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २३१ धावा धावफलक
११ मार्च २०११ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४४ धावा धावफलक
३० मार्च २०११ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत २९ धावा धावफलक
२० ऑक्टोबर २०११ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ५ गडी धावफलक
२३ जानेवारी २०१३ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ५ गडी धावफलक
१९ ऑक्टोबर २०१३ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी धावफलक
२३ ऑक्टोबर २०१६ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत ७ गडी धावफलक

टी२०

[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
१२ डिसेंबर २००९ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत ६ गडी धावफलक
२२ मार्च २०१६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २२ धावा धावफलक
२५ मार्च २०१६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २१ धावा धावफलक
२७ मार्च २०१६ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ६ गडी धावफलक
मैदानाचे संपूर्ण दृश्य

संदर्भ आणि नोंंदी

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2015-06-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-12-30 रोजी पाहिले.
  2. ^ "भारतीय प्रीमियर लीग २०१० मैदाने" (इंग्रजी भाषेत). 2010-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-12-30 रोजी पाहिले.
  3. ^ बसु, रिथ. "इडन पुनर्विकास". द टेलिग्राफ (इंग्रजी भाषेत). कोलकागा, भारत. २९ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान | भारत | क्रिकेट मैदाने | इएसपीएन क्रिकइन्फो. क्रिकइन्फो.कॉम. ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ / नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.