Jump to content

हंबीरराव मोहिते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हंसाजी मोहिते या पानावरून पुनर्निर्देशित)

औसाजी तथा हंबीरराव मोहिते (१६३०:तळबीड, महाराष्ट्र - १६८७:वाई, महाराष्ट्र) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. प्रतापराव गुजरांच्या मृत्यूनंतर सरसेनापतीपदी त्यांची नेमणूक इ.स. १६७४ साली झाली. []

बहलोलखानाशी लढताना तत्कालीन सरसेनापती प्रतापराव गुजरांनी २४ फेब्रुवारी, १६७४ रोजी वीरमरण पत्करल्यनांतर हंसाजी मोहिते यांची नेमणूक हंबीरराव या खिताबानिशी झाली. नेसरीच्या लढाईनंतर हंबीररावांनी आदिलशाही सेनेवर जबरदस्त उलटहल्ला केला आणि शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळून लावले.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोयराबाईंनी हंबीररावांना संभाजी महाराजांऐवजी स्वतःचे पुत्र राजाराम महाराजांना सिंहासनावर बसविण्याची सूचना केली परंतु हंबीररावांनी शिवाजी महाराजांनी केलेल्या वारसनाम्याचा आदर करीत स्वतःच्या बहिणीस डावलून संभाजीमहाराजांशी हातमिळवणी केली. यामुळे हे सत्तांतरण अधिक रक्तरंजित झाले नाही.

१६८७मध्ये झालेल्या वाईच्या लढाईत तोफेचा गोळा लागून हंबीरराव धारातीर्थी पडले. महाराजांच्या द्वितीय पत्‍नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीररावांच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्‍नी होत्या. या नात्याने हंबीररवा शिवाजीमहाराजांचे व्याही होत.

हंबीररावांविषयी पुस्तके

[संपादन]
  • सेनापती हंबीरराव मोहिते (चरित्र - लेखक डॉ. सदाशिव शिवदे)
  • जेधे शकावली, मराठा रियासत भाग १; डफ.) - केतकर ज्ञानकोशातील माहिती

चित्रपट

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Pratik Gupta (2014). Maratha Generals and Personalities. p. 43.
  2. ^ "आरं!!! ज्‍याची तरवार खंबीर त्यो ह्यो हंबीर...वाचा InfoMarathi » Info Marathi". Info Marathi (इंग्रजी भाषेत). 2019-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-08-11 रोजी पाहिले.