ऋतुसंहार
Appearance
महाकवी कालिदासाचे प्रसिद्ध संस्कृत काव्य | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | साहित्यिक कार्य | ||
|---|---|---|---|
| गट-प्रकार |
| ||
| लेखक | |||
| |||
ऋतुसंहार हे संस्कृत लेखक , कवी कालिदासलिखित काव्य आहे.[१]
आशय
[संपादन]ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, आणि वसंत या सहा ऋतूंचे वर्णन या काव्यात आहे. वेगवेगळ्या वृत्तात बांधलेले १४४ श्लोक या काव्यात समाविष्ट आहेत.[२]प्रत्येक ऋतूच्या वर्णनात त्या ऋतूचा वृक्ष, वेली व पशुपक्षी यांच्यावर होणारा परिणाम यात उत्तम प्रकारे दाखविला आहे. प्रेमात मग्न असणाऱ्यांच्या वृत्तीत त्या त्या ऋतूत होणारा बदलही कालिदास नोंदवितो. साधी परंतु अनुप्रासयुक्त भाषा हे या काव्याचे वैशिष्ट्य मानले जाते.[३] ‘ऋतुसंहार’ चा शब्दशः अर्थ आहे — ऋतूंचा संहार किंवा समूह. कवींनी ऋतुचक्राचे वर्णन ग्रीष्म पासून आरंभ करून वर्षा, शरद,हेमंत आणि शिशिर या ऋतूंचे क्रमशः दिग्दर्शन घडवून, निसर्गाच्या सर्वव्यापी सौंदर्य, माधुर्य आणि वैभवाने संपन्न अशा वसंत ऋतूसह या कृतिचा समारोप केला आहे.
संस्कृत टीका
[संपादन]- संवत १८१४ रोजी उपलब्ध मणिराम यांची टीका
- अमरकीर्ति यांची टीका [२]
ऋतुसंहारचे मराठी/हिंदी अनुवादक
[संपादन]- ज्ञानेश्वर कुलकर्णी (मराठी)
- मूलचन्द्र पाठक (हिंदी)
- डॉ. हरेकृष्ण मेहेर (उडिया)
- Ritusamhara or the Pageant of the Seasons (इंग्रजी लेखक - एम.एस. पंडित)
- Méghaduta et le ritusamhara de kalidasa,le (फ्रेंच)
- The Ritusamhara of Kalidasa: With the Commentary, the Chandrika, of Manirama (टीका- १८६७)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ जोशी, महादेवशास्त्री. भारतीय संस्कृती कोश खंड १.
- ^ a b Kālidāsa (1986). The Rtusamhara of Kalidasa (हिंदी भाषेत). Motilal Banarsidass Publishe. ISBN 9788120800311.
- ^ तिवारी, सियाराम (2015). Bhartiya Sahitya Ki Pahchan (हिंदी भाषेत). Vani Prakashan. ISBN 9789350729922.