अभिज्ञानशाकुन्तलम्

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अभिज्ञान्शाकुन्तालम हे महाकवी कालिदासाचे महाभारतातील शकुन्त्लोपाख्यान यावर आधारित आहे. या नाटकामध्ये एकूण सात अंक असून चौथा अंक ही पूर्णपणे कालिदासाची निर्मिती आहे. या नाटकाच्या मंगलाचरणामध्ये शंकराचे वर्णन केले आहे. दुष्यंत हा या नाटकाचा नायक असून शकुंतला ही या नाटकाची नायिका आहे. विश्वामित्र आणि मेनका यांची शकुंतला ही कन्या असली तरी तिचे पालनपोषण कण्व मुनींनी केले. हे नाटक म्हणजे दुष्यंत आणि शकुंतला यांची प्रणयकथा आहे. शृंगाररस हा या नाटकतील प्रधानरस असून करुण,अद्भूत,हास्य,इ. हे यातील दुय्यम रस आहेत.

शिकारीसाठी दुष्यंत गेला असता कण्व मुनींचा आश्रम जवळ असल्याने तो तेथे गेला असता शकुंतलेची भेट होते.त्यानंतर त्यांच्या मनात प्रेम निर्माण होते. प्रेम व्यक्त केल्यावर त्यांच्यात गांधर्व विवाह होतो. 'सैन्य घेऊन मी तुला न्यायला येईन' असे सांगून आपल्या राज्यात निघून जातो. यानंतर दुर्वास मुनींच्या शापाने दुष्यंताला झालेले विवाहाचे विस्मरण आणि त्यामुळे शकुंतलेच्या दुःखाचे वर्णन पाचव्या आणि सहाव्या अंकात आहे. शेवटच्या अंकात सर्वदमन या दुष्यंत शकुंतलेच्या पुत्राच्या मदतीने त्यांचे पुनर्मिलन झालेले दिसून येते. अशाप्रकारे या नाटकाची कथा सांगता येईल.

अंगठीच्या मदतीने दुष्यंताला शकुंतलेचे झालेले स्मरण नाटकाच्या शीर्षकातून दिसून येत असल्याने शीर्षक यथार्थ आहे.