चरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आचार्य चरकांचा पतंजली योगपीठ हरिद्वार.भारत येथे असलेला पुतळा.

चरक (जन्म इ.स.पू. ३००) हे एक आयुर्वेदावरील प्रमुख योगदानकर्ते होते. भारतात पूर्वी त्यांचे नाव गाजत होते. त्यांचा उल्लेख कधी कधी शरीरशास्त्राचे पितामह म्हणून होतो.

आचार्य चरक व आयुर्वेद[संपादन]

'चरक' हे अभिधान 'फिरस्ते विद्यार्थी' किंवा 'फिरस्ते वैद्य' यांना लागू होते. चरकाच्या मते आरोग्यरोग हे पूर्वनिर्धारित नसतात व आयुष्य हे मानवी प्रयत्‍नांनी, विशिष्ट दिनचर्येनेऋतुचर्येने वाढविले जाऊ शकते. भारतीय परंपरेनुसारआयुर्वेद प्रणालीनुसार, 'रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा, तो होऊच न देणे कधीही श्रेयस्कर' असे ठरविण्यात आले आहे.यात दिनचर्या बदलविणे, व निसर्गाशी व चारही ऋतूंशी ती जुळविणे हे महत्त्वाचे मानले आहे. याने आरोग्य राखले जाते.

आचार्य चरकांनी केलेली काही विधाने खाली दिलेली आहेत.

जो वैद्य रुग्णाच्या शरीरात ज्ञानाचा दिवा व ठोस आणि योग्य समजुती घेऊन जाऊ शकत नाही तो रोगांवर कधीच उपचार करू शकत नाही. त्याने रोगांवर परिणाम करणाऱ्या वातावरणादी सर्व बाबींचा अभ्यास केला पाहिजे व मगच त्याच्यावर उपचार केले पाहिजेत. (झालेल्या) रोगास दुरुस्त करण्यापेक्षा त्याच्या निर्माणावर प्रतिबंध लावणे जास्त महत्त्वाचे आहे.

चरकमुनींनी चरक संहितेत दिलेले व दुर्लक्षित होत गेलेली ही विधाने आज अनिवार्य म्हणून समोर येत आहेत. .या संहितेत अशी अनेक विधाने की जी आजही आदरास पात्र आहेत. त्यांतील काही विधाने शरीरशास्त्र, अर्भकशास्त्र इत्यादी क्षेत्रातील आहेत.

चरक हा पचन पचनसंस्थाप्रतिकारशक्ति हे विचार प्रस्तुत करणारा प्रथम वैद्य होता. शरीराची क्रिया ही मुख्यत्वेकरून तीन दोषांवर अवलंबून असते. वात, पित्तकफ. खाल्लेल्या अन्नावर धातूंची क्रिया झाल्याने (रक्त चामडीअस्थिमज्जाउत्पन्न होतात.

सारख्याच प्रमाणात सारख्याच प्रकारचे अन्न खाल्ले तरी, इतर शरीराचे मानाने, एखाद्या विशिष्ट शरीरात, दोष उत्पन्न होतात. म्हणूनच प्रत्येक शरीर हे दुसऱ्या शरीरापेक्षा वेगळे असते. ते कमीअधिक वजनी, सुदृढ वा ऊर्जामय असू शकते.

या त्रिदोषांचे संतुलन बिघडले असता रोग उत्पन्न होतात. हे दोष साम्यावस्थेत आणण्यासाठी त्याने आचार्य चरकांई औषधी सांगितल्या. त्यांना शरीरातील जंतूंचे ज्ञान होते तरीही त्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले नाही.

चरकमुनींना अनुवांशिकी लिंगनिदानाबाबत???? ज्ञान होते. उदाहरणार्थ, त्यास अर्भकाचे लिंग ठरविणाऱ्या बाबी माहीत होत्या. पंगुत्व वा अंधत्व हे अर्भकात उद्भवणारे दोष हे माता वा पित्यातील दोष नसून ते मातापित्यांच्या रज वा वीर्य यामुळे उद्भवणारे दोष आहेत असे त्याचे म्हणणे होते (ही आज सर्वमान्य बाब आहे).

चरकाने संपूर्ण शरीरशास्त्राचा व मानवी अवयवांचा अभास केला. त्याने शरीरात दातांसह हाडांची संख्या ही ३६० सांगितली. हृदय म्हणजे एक पोकळी असते असे त्याचे चुकीचे अनुमान होते पण त्याने हृदयास नियंत्रण केंद्र मानले ते सर्वथा बरोबर होते. त्याने प्रतिपादन केले की, हृदय हे १३ मुख्य वाहिन्यांद्वारे संपूर्ण शरीराशी जोडले आहे. याव्यतिरिक्त, तेथे न मोजता येण्याजोग्या वेगवेगळ्या आकाराच्या नसा आहेत. त्या उतीला अन्नरस पुरवितात व टाकाऊ पदार्थ बाहेर जाण्यास जागा करून देतात. त्याने असेही नमूद केले की या प्रमुख वाहिन्यांस (नसांना) कोणताही अडथळा आल्यास तो शरीरात रोगोत्पत्ती वा व्यंग निर्माण करतो.

भारतातील प्राचीन वैद्य अत्रेयअग्निवेश यांच्या मार्गदर्शनाखाली इ.स.पू. ८व्या शतकात लिहिल्या गेलेल्या विश्वकोषीय पद्धतीच्या लेखनात चरकाने सुधारणा करून 'चरक संहिता' म्हणून पुनर्लेखन केले. या संहितेला पुष्कळ प्रसिद्धी मिळाली. गेली दोन शतके आयुर्वेद या विषयावर त्याचे हे लेखन प्रमाण मानले जाते. अरबीलॅटिन यांसह अन्य विदेशी भाषांमध्ये चरकसंहितेचे भाषांतर झाले आहे.

योगदान[संपादन]

चरक परंपरेप्रमाणे, पुनर्वसु अत्रेय या ऋषींच्या शिष्यांनी औषधीशास्त्राच्या सहा शाखा निर्माण केल्या. अग्निवेश, भेल, जातुकर्ण, पाराशर, हरित, क्षरपाणि या त्यांच्या एकेका शिष्याने आयुर्वेदावर संहिता लिहिल्या. या सर्वांत अग्निवेश याने लिहिलेली संहिता ही सर्वात चांगली होती. हीच अग्निवेश संहिता नंतर चरकाने सुधारणा केल्यावर, चरक संहिता म्हणून प्रसिद्ध झाली. या चरक संहितेत नंतर दृढबल ऋषींनी सुधारणा केल्या.

परंपरेप्रमाणे व चरकानुसार, आयुर्वेद हा सहा शाखांमध्ये विभागण्यात आला आहे:

चरक संहितेचे ८ विभाग असून तिच्यात एकूण १२० अध्याय आहेत.

आठ विभाग असे :-

  1. सूत्र स्थान
  2. निदान स्थान
  3. विमान स्थान
  4. शरीर स्थान
  5. इंद्रिय स्थान
  6. चिकित्सा स्थान
  7. कल्प स्थान
  8. सिद्धी स्थान


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.