Jump to content

मगध (महाजनपद)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मगध साम्राज्य हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य राज्य व सोळा महाजनपदांपैकी एक राज्य होते. याच्या सीमा आधुनिक भारतातील बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशनेपाळच्या काही भागापर्यंत होत्या. सम्राट बिंबिसार या साम्राज्याचा संस्थापक होता.

हर्यक वंश (इ.स.पू. ५४५ ते इ.स.पू. ४१२) या वंशाचा सर्वात प्रराक्रमी राजा बिंबिसार होता. बिंबिसारचे उपनाव श्रेनिक होते. या राजाने गिरिव्रजला आपली राजधानी बनवले. याने कोसलवैशाली या राजघराण्यासोबत/राजपरिवारासोबत वैवाहिक संबध कायम ठेवले. त्याची पहिली पत्नी कोशल देवी कोसलचा राजा प्रसेनजीतची बहिण होती. ज्यामुळे त्याला काशी नगराचे राजस्व मिळाले. त्याची दुसरी पत्नी चेल्लना ही चेटकची बहीण होती. त्या नंतर त्याने मद्र देशाची राजकुमारी क्षेमा सोबत विवाह केल्यांमुळे त्याला मद्र देशाचे सहयोग व समर्थन मिळाले. माहबग जातक मध्ये बिंबिसाराच्या ५०० पत्नींचा उल्लेख आढळतो.

प्रशासन

[संपादन]

कुशल प्रशासनावर सर्वप्रथम बिंबिसारने जोर दिला. बिंबिसार स्वतः शासनाच्या समस्यांमध्ये रूची घेत होता. त्याच्या राजसभेमधे ८० हजार गावाचे प्रतिनिधी भाग घेत असत असे माहबग जातक मध्ये सांगितले आढळले. पुराणांनुसार बिंबिसाराने जवळपास २८ वर्षे मगधावर राज्य केलेले आहे.