भारतीय सर्वेक्षण विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय सर्वेक्षण विभाग हा भारताचा मध्यवर्ती अभियांत्रिकी विभाग आहे जो भारताचे अधिकृत सर्वेक्षक करून नकाशे तयार करतो. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १७६७ साली भारतातील विविध प्रांतांचे सर्वेक्षक व नकाशे तयार करण्यासाठी हा विभाग स्थापित केला. हा भारत सरकारचा सर्वात जुन्या अभियांत्रिकी विभागांपैकी एक आहे. प्रथम विल्यम लॅम्बटन यांच्या व नंतर जॉर्ज एव्हरेस्टच्या नेत्रुव्त्वाखाली अखंड भारताचा त्रिकोणमितीय पद्घ्तीने सर्वेक्षण करण्याचे प्रचंड मोठे काम या भारतीय सर्वेक्षण विभागाने केले आहे. भारताचे सर्व्हेयर जनरल‎ हे या विभागाचे प्रमुख असतात. कॉलिन मॅकेन्झी हे भारताचे पहिले सर्व्हेयर जनरल होते.

भारतीय सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय देहरादून येथे आहे. सिविल इंजिनीअरिंगचे एकूण् १८ उपविभागात विविघ विषयांवर सर्वेक्षण होते. याची भारतामध्ये २३ भौगोलिक माहिती केंद्रे आहेत.