"इंदिरा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ११३: | ओळ ११३: | ||
[[चित्र:1984 CPA 5588.jpg|thumb|right|रशियाने सन १९८४ मध्ये काढलेले इंदिरा गांधी याचे पोस्टाचे तिकिट]] |
[[चित्र:1984 CPA 5588.jpg|thumb|right|रशियाने सन १९८४ मध्ये काढलेले इंदिरा गांधी याचे पोस्टाचे तिकिट]] |
||
इंदिरा गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५पासून त्याची छपाई बंद करण्यात आली. |
इंदिरा गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५पासून त्याची छपाई बंद करण्यात आली. |
||
===सर्वात महान भारतीय=== |
|||
२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘[[द ग्रेटेस्ट इंडियन]]’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधी सातव्या क्रमांकावर होत्या.<ref>https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949</ref> |
|||
== हे ही पहा == |
== हे ही पहा == |
१०:५१, ६ जून २०२० ची आवृत्ती
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
इंदिरा गांधी | |
५ वी व ८ वी भारतीय पंतप्रधान
| |
कार्यकाळ जानेवारी १५ इ.स. १९८० – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४l | |
राष्ट्रपती | नीलम संजीव रेड्डी झैलसिंग |
---|---|
मागील | चौधरी चरण सिंग |
पुढील | राजीव गांधी |
कार्यकाळ जानेवारी १९ इ.स. १९६६ – मार्च २४ इ.स. १९७७ | |
राष्ट्रपती | सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायतुल्ला, वराहगिरी वेंकटगिरी आणि फक्रुद्दीन अली अहमद |
मागील | गुलझारीलाल नंदा |
पुढील | मोरारजी देसाई |
कार्यकाळ मार्च ९ इ.स. १९८४ – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४ | |
मागील | पी.व्ही. नरसिंहराव |
पुढील | राजीव गांधी |
कार्यकाळ ऑगस्ट २१ इ.स. १९६७ – मार्च १४ इ.स. १९६९ | |
मागील | एम.सी. छागला |
पुढील | दिनेश सिंह |
कार्यकाळ जून २६ इ.स. १९७० – एप्रिल २९ इ.स. १९७१ | |
मागील | मोरारजी देसाई |
पुढील | यशवंतराव चव्हाण |
जन्म | नोव्हेंबर १९, इ.स. १९१७ मोगलसराई |
मृत्यू | ऑक्टोबर ३१, इ.स. १९८४ नवी दिल्ली, भारत |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पती | फिरोज गांधी |
अपत्ये | राजीव गांधी आणि संजय गांधी |
निवास | १ सफदरजंग रोड, नवी दिल्ली |
इंदिरा गांधी(जन्म : १९ नोव्हेंबर १९१७; मृत्यू : ३१ ऑक्टोबर १९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.
लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.
इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वांतंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्रसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या कॉंग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्या माहिती व नभोवाणी मंत्री होत्या. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी पंतप्रधान म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.
१९७५ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८०पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८०च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा असे होते.
बालपण
जवाहरलाल आणि कमला या नेहरू दांपत्याचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते. १९ नोव्हेंबर १९१७ ला इंदिराचा जन्म झाला. मुळात नेहरू हे काश्मिरी पण्डित होते. इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरू व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे.
१९३६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले. यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ १८ होते. त्यांचे शिक्षण सोमरविले महाविद्यालय, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले.[१] याच दरम्यान त्या लण्डनमधील इण्डिया लीगच्या सदस्या झाल्या. १९४० च्या दशकात इंदिरा गांधींनी फुफ्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंडमध्ये व्यतीत केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख फिरोज गांधी या तरुणाशी झाली. ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला.
फिरोज गांधींसोबत विवाह
इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरू यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरारा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गांधीसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधी हे भारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघांत दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदयविकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला.
राजकारणातला प्रवास
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष पद :
१९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.
माहिती व नभोवाणी मंत्री : जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यनंतरर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. शासकीय अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्न केला. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगर च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.
पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयूबखान आणि लालबहादुर शास्त्री यात शांतिसमझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.
पंतप्रधान
इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच कॉंग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात कॉंग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्रिपद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी कॉंग्रेसची दोन शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी शासन वाचवले.
जुलै १९६९ मध्येच त्यांनी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण केले.
१९७१ चे भारत-पाक युद्ध
१९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेेेेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत.
इंदिरा गांधी यांच्याबद्दल व्यक्त झालेली मते
- स्वतःवर पराकोटीचे प्रेम करणारी आत्मरती, वास्तवाचे भान सुटणे, खूशमस्कऱ्यांना किंवा होयबांनाच प्रोत्साहन देणे, सत्य सांगणाऱ्यांवर मात्र अविश्वास, स्वत:ची प्रतिमा कशी रंगवली जाते आहे यावर असू नये इतके लक्ष, पत्रकारांबद्दल तिरस्कार आणि नियंत्रण सुटलेल्या बुलडोझरसारखे निर्णय घेणे ही इंदिरा गांधी यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत. ... सलमान रश्दी
- सलमान रश्दी यांनी आणीबाणी घोषित करणाऱ्या इंदिरा गांधींबद्दल ‘मिडनाइटस् चिल्ड्रेन’ या पुस्तकात लिहिले आहे.
इंदिरा गांधी यांचे चरित्रलेखक
- इंदर मल्होत्रा
- उषा भगत (इंदिराजी थ्रू माय आईज)
- कॅथेरीन फ्रॅंक (मराठी अनुवाद - लीना सोहोनी)
- डॉम मोराईस (मिसेस गांधी)
- पी.सी. ॲलेक्झॅण्डर (My years with Indira Gandhi; इंदिरा गांधी अंतिम पर्व)
- पुपुल जयकर (Indira Gandhi - Biography, मराठी अनुवाद अशोक जैन)
- प्रणय गुप्ते (मूळ इंग्रजीत, मदर इंडिया. मराठी अनुवाद : पंढरीनाथ सावंत, रमेश दिघे)
- सागरिका घोष (इंग्रजीत, India's Most Powerful Prime Minister)
इंदिरा गांधी यांच्यावरील अन्य पुस्तके
- अनोखे मैत्र (अनुवादित, अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंदिरा गांधीलिखित Letters to an American Friend)
- इंदिरा गांधी : एक वादळी पर्व (माधव गोडबोले)
- दृष्टिआडच्या इंदिरा गांधी (अनुवादित; अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंग्रजी The Unseen Indira Gandhi; लेखक - डॉ. के.पी. माथुर)
इंदिरा गांधी यांच्या नावाच्या संस्था
- पहा : गांधी नावाच्या संस्था
सन्मान
टपालाचे तिकीट
इंदिरा गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५पासून त्याची छपाई बंद करण्यात आली.
सर्वात महान भारतीय
२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधी सातव्या क्रमांकावर होत्या.[२]
हे ही पहा
संदर्भ
- ^ "Oxford University's famous south Asian graduates" (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर, २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949
बाह्य दुवे
- रेहान फजल. इंदिरा गांधी- ‘आयरन लेडी’ या ‘दॅट वूमन’. बीबीसी हिंदी.
- इंदिरा गांधी संक्षिप्त मराठी चरित्र [१]
मागील: चरणसिंग चौधरी |
भारतीय पंतप्रधान जानेवारी १४, इ.स. १९८० – ऑक्टोबर ३१, इ.स. १९८४ |
पुढील: राजीव गांधी |
- CS1 errors: dates
- एक ही संदर्भ नसलेले लेख
- भारतरत्न पुरस्कार
- भारतीय अर्थमंत्री
- भारताचे पंतप्रधान
- भारतीय परराष्ट्रमंत्री
- भारतीय माहिती आणि प्रसारणमंत्री
- भारतरत्न पुरस्कारविजेते
- इ.स. १९१७ मधील जन्म
- इ.स. १९८४ मधील मृत्यू
- ४ थी लोकसभा सदस्य
- ५ वी लोकसभा सदस्य
- ६ वी लोकसभा सदस्य
- ७ वी लोकसभा सदस्य
- रायबरेलीचे खासदार
- मेडकचे खासदार
- चिकमंगळूरचे खासदार
- राज्यसभा सदस्य
- नेहरू-गांधी परिवार
- भारतीय राजकारणी
- हत्या झालेले भारतीय राजकारणी
- पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती