संजय गांधी

संजय फिरोज गांधी (१९४७ - १९८०) हे फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी यांचे दुसरे चिरंजीव होते. इ.स. १९७७ मध्ये भारतात लादलेल्या आणीबाणीच्या काळात त्यांनी जबरदस्तीने गलिच्छ वस्त्या उखडून किंवा जाळून टाकणे यांसारखी कामे हाती घेतली होती. संततिनियमन न करणाऱ्या लोकांच्या शस्त्रक्रिया करण्यावर संजय गांधी यांनी जोर दिला होता. त्यामुळे ते जुन्या सनातनी विचारांच्या लोकांमध्ये आणि मूलतत्त्ववादींमध्ये अप्रिय झाले होते. ते भारताच्या सातव्या लोकसभेत अमेठी मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार होते.
स्वतःच चालवत असलेले त्यांचे विमान जमिनीवर कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात संजीय गांधी यांचे निधन झाले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |