Jump to content

"येसूबाई भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:

येसूबाईंची मान्यता मोठी होती या थोर स्त्रीबद्दल मराठमंडळात मोठा पूज्यभाव होता.
येसूबाईंची मान्यता मोठी होती या थोर स्त्रीबद्दल मराठमंडळात मोठा पूज्यभाव होता.

इ.स.४ जुलै १७१९ला राजमाता येसूबाई मोगलांच्या कैदेतून दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या. या घटनेला येत्या ४ जुलै २०१९ रोजी ३०० वर्षे पूर्ण झाली.

==चरित्रे==
==चरित्रे==

१९:२१, ८ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

महाराणी येसूबाई या छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा (सून) होत्या. त्यांचे माहेर शृंगारपूर येथे होते. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते. छत्रपती महाराणी येसूबाई या मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहू महाराजांच्या मातोश्री होत.

छत्रपती शिवाजी महाराजांची ज्येष्ठ सून, संभाजी महाराजांची महाराणी आणि प्रजाजनांचे आदरस्थान, अशा महाराणी येसूबाईंच्या जीवनात जेवढी संकटे आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर आली नसावीत. एवढे सर्व राजवैभव असूनही आयुष्यात दुर्दैव त्यांच्या पाठीशी लागले आणि सुमारे तीस वर्षे मराठयांच्या या महाराणीला शत्रूच्या बंदिवासात जीवन कंठावे लागले.

पण येसूबाईंनी ज्या धैर्याने आणि कणखर वृत्तीने त्या खडतर जीवनाला तोंड दिले, त्याला इतिहासात तोड नाही. भोसले घराण्यात सून शोभेल असेच त्या शेवटपर्यंत वागल्या.

येसूबाईंची मान्यता मोठी होती या थोर स्त्रीबद्दल मराठमंडळात मोठा पूज्यभाव होता.

इ.स.४ जुलै १७१९ला राजमाता येसूबाई मोगलांच्या कैदेतून दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या. या घटनेला येत्या ४ जुलै २०१९ रोजी ३०० वर्षे पूर्ण झाली.

चरित्रे

  • महाराणी येसूबाई (डॉ. मीना मिराशी)

चित्रपट