"गंगा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
→हिंदू धर्मातील गंगेचे स्थान: उपनदी जोडली खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
|||
ओळ ३५: | ओळ ३५: | ||
==काव्यामधील गंगेचे स्थान== |
==काव्यामधील गंगेचे स्थान== |
||
गंगा नदीला पवित्र मानल्यामुळे अनेक कवींनी गंगेची स्तुती किंवा प्रार्थना करणारी काव्ये लिहिली आहेत. त्यांपैकी काही ही :- |
गंगा नदीला पवित्र मानल्यामुळे अनेक कवींनी गंगेची स्तुती किंवा प्रार्थना करणारी काव्ये लिहिली आहेत. त्यांपैकी काही ही :- |
||
* गङ्गालहरी ([[जगन्नाथ पंडित]]) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* गंगाष्टक (श्रीधरवेंकटेश अय्यावाल) |
* गंगाष्टक (श्रीधरवेंकटेश अय्यावाल) |
||
* |
* गङ्गाष्टकम् ([[आद्य शंकराचार्य]] |
||
⚫ | |||
* गङ्गाष्टकम् (सत्यज्ञानानन्दतीर्थ) |
* गङ्गाष्टकम् (सत्यज्ञानानन्दतीर्थ) |
||
⚫ | |||
* गङ्गाष्टोत्तरशतनामावली (एन. बालसुब्रमण्यम) |
* गङ्गाष्टोत्तरशतनामावली (एन. बालसुब्रमण्यम) |
||
* गङ्गालहरी ([[जगन्नाथ पंडित]]). मराठी सार्थ पद्य रूपांतर - गंगालहरी (दि. ना. घारे); गंगालहरी (मराठी समश्लोकी - [[वामन पंडित]]); गंगालहरी (मराठी समश्लोकी - [[ल.गो. विंझे]]) |
|||
* गङ्गासहस्रनामस्तोत्रम् (स्कंदपुराण) |
* गङ्गासहस्रनामस्तोत्रम् (स्कंदपुराण) |
||
* गङ्गास्तवः (कल्की आणि भविष्य पुराणांत आलेले स्तोत्र) |
* गङ्गास्तवः (कल्की आणि भविष्य पुराणांत आलेले स्तोत्र) |
||
* गङ्गास्तुतिः (धर्माब्धी) |
* गङ्गास्तुतिः (धर्माब्धी) |
||
⚫ | |||
१७:३२, २३ जुलै २०१९ ची आवृत्ती
गंगा नदी भारतातून पाच राज्यांमधून वाहत जाते
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
गंगा | |
---|---|
गंगा नदी | |
इतर नावे | भागीरथी. |
उगम | गंगोत्री, उत्तराखंड, भारत |
मुख | सुंदरबन, पश्चिम बंगाल आणि बांगलादेश (बंगालचा उपसागर) |
पाणलोट क्षेत्रामधील देश |
भारत (उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल) बांग्लादेश |
लांबी | २,५२५ किमी (१,५६९ मैल) |
उगम स्थान उंची | ४,२६७ मी (१३,९९९ फूट) |
सरासरी प्रवाह | १,९०० घन मी/से (६७,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | १०,५०,००० |
ह्या नदीस मिळते | गंगा |
उपनद्या | यमुना, घागरा, गोमती,शोण नदी |
धरणे | हरिद्वार, फराक्का |
गंगा नदी ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. ब्रह्मपुत्रा (लांबी २,९०० कि.मी.) नदी खालोखाल ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. गंगेची लांबी २,५२५ कि.मी. आहे. तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातातील गंगॊत्री येथे होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातून वाहत वाहत बांगलादेशात प्रवेश करते. बांगलादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते. तेथे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. सुंदरबनात बऱ्याच दुर्मीळ वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात.
हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र मानले आहे. तिला माता म्हटले गेले आहे. गंगा नदी ही लक्षावधी भारतीयांची जीवनदायिनी आहे. भारतातील पाटलीपुत्र (पाटणा), कनोज, कौशांबी, काशी, प्रयाग, मुर्शिदाबाद, मुंगेर, कांपिल्य, बेहरामपूर, कलकत्ता, इ. प्राचीन, ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहेत.
अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळत होती तर ब्रह्मपुत्रा नदी काही किलोमीटर पूर्वेस स्वतंत्रपणे मिळायची. साधारण अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रह्मपुत्रेने पश्चिमेस वळण घेतले व आता दोन्ही नद्यांचा अरिचा येथे संगम होतो. या बदलास इ.स. १८९७ चा भूकंप काही अंशी कारणीभूत होता.
यमुना ही गंगेची उपनदी स्वतःच एक स्वतंत्र आणि मोठी नदी आहे. ती गंगेला प्रयाग येथे येऊन मिळते.
डॉल्फिनच्या दोन जाती गंगेमध्ये सापडतात. त्यांना गंगा डॉल्फिन आणि इरावती डॉल्फिन या नावाने ओळखले जाते. याशिवाय गंगेमध्ये असलेले शार्कसुद्धा प्रसिद्ध आहेत. गंगा नदीमधील विरघळलेला प्राणवायूची पातळी झपाट्याने खालावत आहो त्यामुळे जलचर धोक्यात आले आहेत. नदीतील पाण्यातील वाढते प्रदूषण त्याचे मुख्य कारण आहे.
हिंदू धर्मातील गंगेचे स्थान
आपल्या मृत पूर्वजांना (सगरांच्या पुत्रांना) जिवंत करण्यासाठी भगीरथाने महत्प्रयासाने गंगेला पृथ्वीवर आणले, असे मानले जाते. त्यामुळे पराकाष्ठेच्या प्रयत्नांना भगीरथ प्रयत्न म्हणतात.
काव्यामधील गंगेचे स्थान
गंगा नदीला पवित्र मानल्यामुळे अनेक कवींनी गंगेची स्तुती किंवा प्रार्थना करणारी काव्ये लिहिली आहेत. त्यांपैकी काही ही :-
- गंगाष्टक (श्रीधरवेंकटेश अय्यावाल)
- गङ्गाष्टकम् (आद्य शंकराचार्य
- गङ्गाष्टकम् (वाल्मीकी)
- गङ्गाष्टकम् (सत्यज्ञानानन्दतीर्थ)
- गङ्गाष्टकम् १ आणि २ (कालिदास)
- गङ्गाष्टोत्तरशतनामावली (एन. बालसुब्रमण्यम)
- गङ्गालहरी (जगन्नाथ पंडित). मराठी सार्थ पद्य रूपांतर - गंगालहरी (दि. ना. घारे); गंगालहरी (मराठी समश्लोकी - वामन पंडित); गंगालहरी (मराठी समश्लोकी - ल.गो. विंझे)
- गङ्गासहस्रनामस्तोत्रम् (स्कंदपुराण)
- गङ्गास्तवः (कल्की आणि भविष्य पुराणांत आलेले स्तोत्र)
- गङ्गास्तुतिः (धर्माब्धी)
- गङ्गास्तोत्रम् (आद्य शंकराचार्य)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
गंगेसंबंधी काही पौराणिक समजुती
गंगा नदी :भूलोकावरील अवतरण
पौराणिक समजुती संपल्या.
विशेष माहिती : रोमन लिपीत अकारान्त किंवा आकारान्त शब्द नाहीत, त्यामुळे 'गंगा' हा शब्द लिहिणे शक्य नाही. Ganga असे स्पेलिंग केले तर उच्चार गँगऽ असा होतो. तस्मात् Ganges हे सुयोग्य स्पेलिंग आहे.
संदर्भ आणि नोंदी
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |