भर्तृहरि

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


भर्तृहरी (मराठी नामभेद: भर्तृहरी, भर्तरी, भर्तरीनाथ) (जीवनकाळ: अंदाजे इ.स.चे ५ वे शतक) हा उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य याचा थोरला सावत्र भाऊ होता. नीतिशतक, शृङ्गारशतकवैराग्यशतक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शतकत्रय या संस्कृत भाषेतील ग्रंथसंग्रहाचा रचनाकार म्हणून हा प्रसिद्ध आहे. याला पिंगला नामक पत्नी होती. नाथपंथीय आख्यायिकांनुसार गृहस्थाश्रम त्यजून याने संन्यासाश्रम स्वीकारला, अशी समजूत आहे[ संदर्भ हवा ]. नाथपंथीय सिद्धांच्या नामावलीतील भर्तरीनाथ म्हणजे हाच असल्याची सांप्रदायिक मान्यता आहे.

लिहिलेले संस्कृत ग्रंथ[संपादन]

शतकत्रयांखेरीज, भर्तृहरीने वाक्पदीयम्‌ नावाचा व्याकरणावरील संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे.

भर्तृहरीची सात शल्ये[संपादन]

या जगातील प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री असो वा पुरुष, त्या व्यक्तीच्या मनात कुठले ना कुठले तरी शल्य असते. अशा सात शल्यांविषयीचा भर्तृहरीचा एक श्लोक आहे.

शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी

सरो विगतवारिजं मुखमनक्षरंस्वाकृते:

प्रभुर्धनपरायण: सततदुर्गत: सज्जन:

नृपाड्गणगत: खलो, मनसि सप्तशल्यानि मे ।

चंद्राला दिवसा प्रकाश नसणे हे पहिले शल्य. सुंदर स्त्रीला वृद्धत्व येणे हे दुसरे शल्य, एखाद्या स्वच्छ पाण्याचे सरोवर कमळाच्या फुलाशिवाय असणे हे तिसरे शल्य, एखादा मनुष्य चांगला असावा पण तो निरक्षर किंवा मूर्ख असावा हे चौथे शल्य, एखादा मनुष्य दानशूर असावा पण तो धनलोभी असावा हे पाचवे शल्य, विद्वान माणसे दरिद्री असावीत हे सहावे शल्य आणि, देशाच्या राज्यकारभारावर दुष्ट, नीच लोकांचा पगडा असावा हे भर्तृहरीचे सातवे शल्य आहे.

`


नवनाथ Om symbol.svg
मच्छिंद्रनाथगोरक्षनाथगहिनीनाथजालिंदरनाथकानिफनाथभर्तरीनाथरेवणनाथनागनाथचरपटीनाथ