राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राष्ट्रवादी कॉँग्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
NCP-flag.svg
पक्षाध्यक्ष शरद पवार
सचिव तारिक अन्वर
टी.पी. पितांबरन मास्तर
देविप्रसाद त्रिपाठी
अख्तर हसन रीझवी
व्ही. राजेशवरन
स्थापना १९९९
मुख्यालय १०, बिशंबर दास मार्ग,
नवी दिल्ली - ११०००१
युती संयुक्त पुरोगामी आघाडी
लोकसभेमधील जागा ६/५४५
राज्यसभेमधील जागा ६/२४५
संकेतस्थळ एनसीपी डॉट ओआरजी डॉट आयएन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (इंग्रजी : Indian National Congress) हा मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभाव असणारा भारतातील राष्ट्रीय पक्ष आहे.१९९९ मध्ये पक्षाची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या साथीने १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.

पार्श्वभूमी[संपादन]

इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झालेल्या शरद पवार, पी.ए. संगमातारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.[१] स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले.

२० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला. [२]

पक्षाचे चिन्ह[संपादन]

१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) घड्याळ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते व्यक्ती[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. Sangma meets Sonia, first time in a decade The Times of India, 2 June 2009.
  2. "I have quit NCP, will contest presidential polls: PA Sangma", टाइम्स ऑफ इंडिया, २०१२-०६-२०. (इंग्लिश मजकूर) 

बाह्य दुवे[संपादन]