माणिक सरकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माणिक सरकार

कार्यकाळ
११ मार्च १९९८ – ८ मार्च २०१८
मागील दसरथ देब
पुढील बिपलब कुमार देब
मतदारसंघ धानपुर, त्रिपुरा

जन्म २२ जानेवारी, १९४९ (1949-01-22) (वय: ७५)
राधाकिशोरपूर, त्रिपुरा
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
धर्म नास्तिकता

माणिक सरकार ( २२ जानेवारी १९४९) हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राजकारणी व त्रिपुरा राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट बूरो सदस्य ही आहेत. इ.स. २०१३ झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीनंतर ते सहाव्यांदा आमदार व चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.

चरित्र[संपादन]

माणिक सरकार हे भारत देशातील सर्वात स्वच्छ प्रतिमेचे आणि गरीब मुख्यमंत्री असल्याचं म्हणता येईल. त्यांना मुख्यमंत्री पदासाठी मिळणारा रु. ९२००चा भत्ता व इतर मानधन ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला दान करतात. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडुन मिळणारे रुपये ५००० चे मानधन फक्त स्विकारतात.

त्यांनी १९७१ साली अगरतला मधील महाराजा बिर बिक्रम महाविद्यालयातुन वाणिज्य शाखेची पदवी घेतली. धानपुर विधानसभा मतदार संघात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरतांना प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्ती जाहीर केली त्यात बँक खात्यात रु. ९७२० व रोख हात शिल्लक रु. १०८० असल्याचे सांगीतले. त्यांचा कडे त्यांची आई अंजली सरकार यांच्याकडून मिळालेले ४८० चौरस फुटाचे पत्र्याचे घर आहे ज्याचे इ.स. २०१३ साली बाजारभावाने मुल्य रु. २,२०,००० होइल. त्यांची पत्नी पांचाली भट्टाचार्या ह्या केंद्र सरकारी नोकरीतुन निव्रुत्त झाल्या आहेत. त्यांना मिळालेले निव्रुत्तवेतन व त्यांनी साठवलेली पुंजी पैकी रु. २३,५८,३८० त्यांनी बँकेत ठेव ठेवली आहे व त्यांच्याकडे २० ग्रेम ( २ तोळे ) सोने आहे ज्याची इ.स. २०१३ साली बाजारभावाने कींमत रु. ७२००० हजार होइल. सौ. पांचाली यांचा कडे रोख हात शिल्लक रु. २२,०१५ आहे. माणिक सरकार ह्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही. ते सरकामासाठी सरकारी वाहनाचा वापर करतात तर त्यांच्या पत्नी पांचाली रिक्षाचा वापर करतात. ते ई-मेलचा वापर करत नाहीत वा मोबाईल फोन ही वापरत नाहीत. ते मुख्यमंत्री कार्यालयात व घरात दूरध्वनीचा वापर करतात. त्यांना वैयक्तिक संपत्ती वाढवण्यात कोणताही रस नाही व त्यांनी आपलं जीवन पक्ष आणि लोकांना वाहिलं आहे. त्यांचे कट्टर विरोधकही कधीही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत नाहीत.[१][२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Manik Sarkar ‘cleanest and poorest’ CM
  2. ^ "Manik Sarkar: Poorest CM in the country". Archived from the original on 2013-01-27. 2013-04-06 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]