Jump to content

खरोसा लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खरोसा लेणी

खरोसा लेणी, ही लेणी लातूर जिल्ह्याऔसा तालुक्यातील खरोसा या गावात आहे. लातूर-निलंगा रस्त्यावर लातूरपासून ४५ किमी अंतरावर व धाराशिव लेण्यांपासून सु. ८२ किमी. अंतरावर ही लेणी आहेत. लेण्यांच्या पायथ्याशी असणाऱ्या खरोसा या गावामुळे ही लेणी ‘खरोसा लेणी’ म्हणून प्रसिद्ध आहे. एका जांभा (लॅटेराइट) खडकाच्या डोंगराच्या मध्यावर ही लेणी कोरण्यात आलेली आहेत. यामध्ये एकूण १२ लेणींचा समूह आहे. डोंगराच्या दुसऱ्या बाजूस रेणुकादेवीचे मंदिर आहे .[१][२][३]

इतिहास

[संपादन]

सर्वप्रथम जेम्स बर्जेस या स्कॉटिश अधिकाऱ्याने या लेण्यांकडे विद्वानांचे लक्ष वेधले. कल्पसमूह या मराठी ग्रंथात रसविद्येला उपकारक ठरणाऱ्या स्थानांमध्ये ‘खरोसा’ या स्थानाचा एक संदर्भ सापडतो. लकोला लेण्याचा तलविन्यास व सामान्य वैशिष्ट्ये पाहता हे लेणे बदामी येथील तीन हिंदू लेण्यांसारखेच आहे. त्यामुळे जेम्स फर्गसन व बर्जेस यांनी या लेण्याचा कालखंड सहाव्या शतकाचा उत्तरार्ध मानला आहे. त्यांच्या मतानुसार एकंदरीत खरोसा येथील लेणी सुमारे इ. स. ५०० ते ७०० दरम्यान खोदण्यात आली. या दरम्यान या भागावर बदामी चालुक्य घराणे राज्य करीत होते. विराज शाह यांच्या मते, खरोसा येथील जैन लेणे सुमारे ८-९ व्या शतकात खोदण्यात आले असावे. खरोसा येथील लेणीसंभार पाहून पूर्वमध्ययुगात असलेले खरोसा लेण्यांचे महत्त्व अधोरेखित होते.[१]

सद्य स्थिती

[संपादन]

लेण्यांच्या डोंगरमाथ्यावर नंतरच्या काळातील रेणुका मातेचे मंदिर, तसेच एक दर्गा आहे. या लेणी समूहात ‘महादेव’ आणि ‘लकोला’ नावाची लेणी वैशिष्ट्यपूर्ण असून इतर लेणी दुय्यम प्रकारची आहेत.

दोन मजली लेणी

पहिली लेणी एक बौद्ध लेणी आहे, ज्यामध्ये भगवान बुद्ध यांच्या बसलेल्या स्थितीत मूर्ती आहे. बुद्धाची मूर्ती नवीन आहे, मूर्तीला रंग दिलेला आहे. दुसऱ्या लेणींमध्ये शिवलिंग आहे आणि तिथे बरेच लोक श्रद्धेने भेट देतात. बऱ्यात लेण्यांमध्ये मोठी मोठी शिवलिंग दिसतात. लेण्यांमध्ये पौराणिक कलाकृती कोरलेल्या दिसतात. काही लेण्या या अपूर्ण अवस्थेत दिसतात. खडक फार मजबुत नसल्यामुळे काळाच्या ओघाने लेण्यांची बरीच झीज झालेली आहे. सध्या काहीच कलाकृती या व्यवस्थित दिसतात.[१][४]

लेण्यातील कलाकृती

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b c "खरोसा लेणी (Kharosa Rock-cut Caves)". मराठी विश्वकोश. 2020-08-10. 2022-08-08 रोजी पाहिले.
  2. ^ "खरोसा लेणी | लातूर जिल्हा | India". 2022-08-08 रोजी पाहिले.
  3. ^ "सायकल स्वारी - खरोसा लेणी | मिसळपाव". www.misalpav.com. 2022-08-08 रोजी पाहिले.
  4. ^ author/lokmat-news-network (2021-07-26). "खरोसा लेणीतील छताच्या खांबांना तडे !". Lokmat. 2022-08-08 रोजी पाहिले.