बल्गेरिया एर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बल्गेरिया एयर ही बल्गेरिया देशाची ध्वज-धारक विमान कंपनी आहे.[१] या कंपनीचे मुख्य कार्यालय सोफिया येथील सोफिया विमानतळावर आहे.[२] या विमान कंपनीचे मालक चिमिंपोर्ट इंक आहेत की जे तेथील स्थानिक शेअर बाजाराचे अधिपति आहेत. या विमान कंपनीची विमाने यूरोप,आफ्रिका,मध्य पूर्व,आणि रशिया खंडात चालतात. बुरगास आणि वरना ही त्यांची लक्ष वेधक शहरे आहेत. सन २००८ चे त्यांचे वार्षिक अहवालानुसार या विमान कंपनीने ११,८५,४३० प्रवाशी वाहतूक केली होती.

इतिहास[संपादन]

या कंपनीची स्थापना सन २००२ मध्ये झाली आणि प्रत्यक्ष कामकाज ४ डिसेंबर २००२ रोजी सुरू झाले.[३] मंत्रिमंडळाचे आदेशाने बल्गेरियाचे वाहतूक आणि जनसंपर्क मंत्री यांनी नोवेंबर २००२ मध्ये या देशाची ध्वज-धारक कंपनी म्हणून घोषणा केली. ही विमान कंपनी बालकण एयर टूर या नावाने काम करू लागली. पन हे नाव कांही काळापुरतेच राहिले. सार्वजनिक मताचे आधारे या कंपनीचे नाव बल्गेरिया एयर आणि मुळचा लोगो हे दोन्ही अस्तीत्वात आले.या एयर लाइनचे सन २००६ मध्ये खाजगीकरण झाले. त्या दरम्यान ही विमान कंपनी सरकारने विकली,दुसऱ्या कंपनीत सामील केली ,खरेदीदाराने खूप मोठी रक्कम दिली अशा अनेक अफवा उठल्या. २० नोवेंबर २००८ रोजी ही कंपनी आंतरराष्ट्रीय एयर ट्रान्सपोर्ट असोसिएशनची पूर्ण सभासद झाली(IATA).[४]सन २०११ चे मध्यंतरी सर्व इछित आगमन ठिकाणांचा अभ्यास करून या विमान कंपनीने ७ एम्ब्रएर E-190 विमाने खरेदी करण्याची घोषणा केली. या कंपनीचे ताब्यात २०१२ मध्ये पहिले विमान आले आणि बांकीची सन २०१३ मध्ये मिळण्याची व्यवस्था झाली. या कंपनीने एयर बस A321s भाडे कराराने घेणेचे सन २०१६ मध्ये ठरविले.

आगमन ठिकाणे[संपादन]

बल्गेरिया एयर त्यांचे सोफिया एयर फोर्ट वरुण २२ ठिकाणी विमान सेवा देते त्यात आंतरदेशीय बौरगास आणि वरना या शहरानचा समावेश आहे. उन्हाळ्यात ही कंपनी बौरगास आणि वरना येथे ये जा सेवा देते. सन २०१२ मध्ये या विमान कंपनीने बेरूत, पालम दे मल्लोरका, प्राग येथे नविन विमान सेवा चालू केल्या. अलीकडे ही विमान कंपनी यूरोप, एशिया, आफ्रिका या खंडात जवळ जवळ ८० ठिकाणी विमान सेवा देते.[५]

कायदेशीर भागीदारी करार[संपादन]

या कंपनीचा खालील विमान कंपनीशी कायदेशीर भागीदारी करार झालेला आहे.[६]

  • एगेयन एयर लाइन्स
  • एयर सेरबिया
  • केएलएम
  • एरोफ्लोत
  • अलितलीय
  • एलओटी पॉलिश एयर लाइन
  • एयर बर्लिन
  • झेक एयरलाइन्स
  • तारोम
  • एयर फ्रांस
  • इरेबिया

इंटर लाइन करार[संपादन]

या एयर लाइनचे खालील एयर लाइनशी इंटर लाइन करार झालेले आहेत.

  • अमेरिकन एयर लाइन्स
  • एमिरेटस
  • लाटम ब्रसील
  • बृसेल्स एयर लाइन
  • फीन एयर लाइन
  • विरगिन अटलांटिक
  • जेट एयर वेज

सेवा व सुविधा[संपादन]

ही कंपनी व्यवसाईकांना तसेच अति महत्त्वाच्या प्रवाश्यांना एव्हीआरओ आरजे ७० या विमानाच्या सहायाने खाजगीत विमान सेवा देते. प्रवाशी विभागात २६ आर्म चेअर्स, कोच, भोजन मेज, विविध एलसीडी डिसप्ले, तसेच वाय फाय व्यवस्था आहे.[७]

नियमित प्रवासी सेवा[संपादन]

फ्लाय मोअर हे या योजनेचे नाव आहे.या योजनेत बेसिक म्हणजे मूळ ठिकाणच्या प्रवाश्यांचे त्या ठिकाणापासुनचे गुण एकत्रित केले जातात. प्रवाश्यांचे ओळखपत्र घेऊन त्यांना तात्पुरते कार्ड दिले जाते.

  • सिल्वर स्टॅंडर्ड कार्ड – प्रवाशाचे ५ विमान प्रवास झाले की त्याला कायमचे सभासदत्व दिले जाते. तो प्रवाशी या कार्डावरील गुण मोफत टीकेट मिळविण्यासाठी किंवा अधिक सेवेसाठी दुसऱ्यास देऊ शकतो.
  • गोल्ड प्रिव्हिलेज कार्ड – या योजनेत सहभाग झाल्यानंतर त्यांचे १८ महिन्यात ३०००० गुण झाले तर त्यांना हे कार्ड मिळते. हे कार्ड धारक प्रवाशी आणखी अधिक गुण मिळवू शकतात शिवाय अधिक सुविधा प्राप्त करू शकतात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "बल्गेरिया एयर स्ट्रेंग्थेनस इट्स यूरोपियन नेटवर्क विथ न्यू इ-जेट्स, बट कॉस्ट रिडक्शन इज़ आल्सो एसेंशियल". Archived from the original on 2014-11-29. 2016-12-12 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "हेड ऑफिस कॉन्टेक्ट्स".
  3. ^ "बल्गेरिया एयर". Archived from the original on 2016-06-11. 2016-12-12 रोजी पाहिले.
  4. ^ "बल्गेरिया एयर जॉइंड सक्सीस्फुल्ली इंटरनेशनल एयर ट्रांसपोर्ट एसोसिएशन". Archived from the original on 2009-02-07. 2016-12-12 रोजी पाहिले.
  5. ^ "बल्गेरिया एयर फ्लाइट शेड्यूल". Archived from the original on 2015-03-11. 2016-12-12 रोजी पाहिले.
  6. ^ "बल्गेरिया एयर पार्टनर्स". Archived from the original on 2017-01-26. 2016-12-12 रोजी पाहिले.
  7. ^ "बल्गेरिया एयर फ्लाइट्स कंडीशन्स". Archived from the original on 2015-03-27. 2016-12-12 रोजी पाहिले.