Jump to content

ताळेबंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द्वि-नोंदी पद्धतीने पुस्तपालन केले असता सर्व खात्यांच्या शिल्लक रकमेचा आढावा घेऊन एका विशिष्ट दिवशी, व्यवसायाची आर्थिक परिस्थिती दर्शवणाऱ्या कागदपत्रास ताळेबंद असे म्हणले जाते. (इंग्लिश : Balance sheet )

व्यवसायाच्या ताळेबंदामध्ये येणे असलेली रक्कम, देय रक्कम, मालमत्ता, कर्ज, उत्पन्न, खर्च आणि नफा किंवा नुकसान या सर्व बाबींचा समावेश असतो. साधारणतः ताळेबंद हा ठराविक दिवशी उदा. तिमाही, सहामाही यांचा शेवटचा दिवस आणि वर्षाअखेरीस काढला जातो.

ताळेबंदाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे द्वि-नोंदी पद्धतीची अचूकता पाहणे, व्यवसायाचा आर्थिक आढावा घेणे हा होय.