व्हियेतनाम एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हिएतनाम एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
VN
आय.सी.ए.ओ.
HVN
कॉलसाईन
VIET NAM AIRLINES
स्थापना १९५६
हब नोई बई आंतरराष्ट्रीय विमानतळ
तान सोन न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे दा नांग, सिएम रीप, पनॉम पेन
फ्रिक्वेंट फ्लायर गोल्डन लोटस प्लस
अलायन्स स्कायटीम
उपकंपन्या कंबोडिया अंगकोर एर
विमान संख्या ८८
मुख्यालय हनोई, व्हिएतनाम
संकेतस्थळ http://www.vietnamairlines.com/
नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारे व्हियेतनाम एरलाइन्सचे एरबस ३३० विमान

व्हिएतनाम एरलाइन्स ही व्हिएतनाम देशाची ध्वजधारी विमान कंपनी आहे. व्हिएतनाम सिविल एव्हियशनचा १९५६ मध्ये विचार झाला आणि सन १९८९ मध्ये व्हिएतनाम देशाची मालकीची विमान सेवा देणारी कंपनी म्हणून स्थापन झाली.[१] लोंग बीन जिल्ह्यातील हनोई येथे यांचे मुख्य कार्यालय आहे आणि नोई बार आंतरराष्ट्रीय विमानतळ व टन सान न्हाट आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे हब आहेत. कायदेशीर सहकारी करारातील ठिकाणाशिवाय इतर १७ देशात ५२ ठिकाणी ही विमान कंपनी प्रवासी विमान सेवा पुरवते.

इतिहास[संपादन]

सुरुवात[संपादन]

व्हिएतनाम एर लाइन्स ही कंपनी ”व्हिएतनाम सिविल एव्हीयशन” या नावाने उत्तर व्हिएतनामचे सरकारने डीक्री क्रं. 666/TTg वर सही केल्यानंतर सन १९५६ मध्ये राष्ट्रीयीकरण झालेल्या गिया लाम विमानतळाला अनुसरून स्थापीली होती. ही विमान कंपनी सरकारी सुरक्षा धोरणाचे अनुशंघाने सोविएत रशिया आणि चायनाचे सहकार्याने एर फोर्सचे मदतीसाठी स्थापीली होती. सुरुवातीला लीसुनोव Li - 2s प्रकारची दोन विमाने सेवेत होती. अमेरिकन भाडेतत्त्वावर घेतल्या जाणाऱ्या विमानावर तसेच तंत्रज्ञान व साधनसामुग्रीवर बंधन होते. त्यामुळे त्यांची जागा दोन ट्ल्युशिन TL-14 आणि तीन एरो A-45s प्रकारच्या विमानांनी घेतली. सन १९५४ ते १९७५ या काळात झालेल्या व्हिएतनाम मधील युद्धाचा अडथळा होऊन या विमान कंपनीचे विकासावर आणि वाढीवर गंभीर परीणाम झाला. या युद्धानंतर सन १९७६ मध्ये यांचे पहिले आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बीजिंग पर्यन्त झाले. त्यावर्षी ही एर लाइन जनरल डिपार्टमेंट ऑफ सिविल एविएशन व्हिएतनाम या नावाने ओळखली जात होती.[२] आणि त्यांची १००% विमान सेवा चालू होती. त्यांनी २१००० प्रवाशांना विंमान सेवा दिली तसेच ३००० टन (६६००००० lb ) मालवाहतुक केली ती आंतरराष्ट्रीय विमान सेवेतील तिसरा हिस्सा विमान सेवा होती. सन १९७८ मध्ये बँकॉक साठी विमान सेवा देऊन विमान सेवेत भर केली. सन १९८० चे शेवटी आणि १९९० चे सुरुवातीस हाँग काँग, कौलालूंपूर, मनीला आणि सिंगापूर यासाठी विमान सेवा देऊन कंपनीने संपर्क (नेटवर्क) वाढविला.

विमान सेवा ठिकाण[संपादन]

व्हिएतनाम एर लाइनचे विमानसेवा जाळे पसरलेले देश म्हणजे पूर्व एशिया,दक्षिण एशिया,यूरोप,आणि ओसीयांना येथे दर दिवशी ३०० विमान उड्डाण होते. ही विमान कंपनी देशांतर्गत २१ ठिकाणी आणि २८ आंतरराष्ट्रीय सेवा देते.[३] याशिवाय या कंपनीची भागीदारी (कोडशेअर) करारानुसार इतर अनेक ठिकाणी विमान सेवा चालू आहे त्यातील कांही थोड्या अंतरावरील उत्तर अमेरिकेतील आहेत.

टेट फ्लाइट्स[संपादन]

व्हिएतनाम जनतेचा जानेवारीचे शेवटी शेवटी ते फेब्रुवारीचे पूर्वार्धात अतिशय धुमधडाक्याने टेट उच्छव साजरा होतो. त्यावेळी अंतदेशीय विमान सेवेची सर्व देशभर मागणी वाढते. या काळात टेट उच्छव साजरा करण्यासाठी जनतेची आपल्या कुटुंबात परतण्यासाठी विमान सेवेच्या वेळापत्रकात अतिरिक्त १०० पेक्षा जादा विमान सेवेची भर पडते.[४] सन २०१० मध्ये कांही ठराविक मार्गावर प्रवाशी संख्या ४०% वरुण १२०% पर्यन्त वाढलेली होती. सन २०११ मध्ये आणखी १० मार्गावर विमान सेवा वाढली. त्यात १००००० प्रवाशी वाढले त्यापैकि ६३००० प्रवाशी हे देशयाचे राजधांनीतून होची मिनह सिटी कडे जाणारे होते. नियमित विमान सेवेतील ही ४१ वाढ लक्षणीय असते. सन २०१३ मध्ये या काळात अतिरिक्त १७४००० प्रवाश्यांची भर पडली त्यात ८२००० प्रवाशी मूळं केंद्र स्थानापासून अगदी सेवताच्या टोकापर्यंत जाणारे होते.

संयुक्त करार[संपादन]

१० जून २०१० रोजी या विमान कंपनीने स्काय टीम मध्ये प्रवेश केला.[५]

कायदेशीर भागीदारी करार[संपादन]

सप्टेंबर २०१५ मध्ये या विमान कंपनी ने खालील विमान कंपनीशी कायदेशीर भागीदारी करार केलेले आहेत.[६]

 • एर फ्रांस
 • अलितलीय
 • ऑल निप्पॉन एरवेझ (३० ऑक्टोबर २०१६ पासून चालू)
 • कंबोडिया अंगकोर एर
 • काथे पॅसिफिक
 • चायना एरलाइन्स
 • चायना ईस्टर्न एरलाइन्स
 • चायना सावुथर्न एरलाइन्स
 • झेक एरलाइन्स
 • डेल्टा एरलाइन्स
 • एल अल इस्राइल एरलाइन्स
 • इतिहाड एरवेझ
 • गरुडा इंडोनेशिया
 • जपान एरलाइन्स
 • जेट एरवेझ
 • जेट स्टार पॅसिफिक
 • केएलएम रायल डच एरलाइन्स
 • कोरियन एर
 • लओ एरलाइन्स
 • फिलिपीन एरलाइन्स
 • वास्को

सेवा[संपादन]

मनोरंजन कांही ठराविक विमानात मागणीनुसार, वैयक्तिक दूरदर्शन ऑडिओ विडियो, सेवा आहे. सिनेमा, खेळ, दूरदर्शन सुविधा संगीत, आहे. वाचनासाठी दैनिक, साप्ताहिक, इतर वाचनीय संग्रह,

केबिन[संपादन]

व्यवसाय वर्ग (बिझिनेस क्लास)[संपादन]

या विमानात व्यवसाय वर्ग तीन केबिन वर्गात विभागलेला आहे. सर्वसाधारण किफायतशीर वर्गापेक्षा जादा सुविधा व्यवसाय वर्गात उपलब्ध आहेत. 777s बोइंगचे व्यवसाय वर्गामध्ये १६० सेंटीमीटर (६२ इंच)च्या बैठका आहेत. ज्या विमानांचा प्रवास दोन तासांपेक्षा जादा आहे त्यात गरम गरम जेवण दिले जाते. टच स्क्रीन २६ सीएम एव्हीओडी व्यवस्था आहे.

उत्तम दर्जाचा किफायतशीर वर्ग (डिलक्स इकॉनॉमी क्लास)[संपादन]

या वर्गात उत्तम प्रकारच्या ९१ ते ९७ सेन्टी मीटर आकाराच्या पसरट बैठका आहेत. हा वर्ग कांही ठराविक 777 बोइंग मध्येच उपलब्ध आहे. ९० मिनिटपेक्षा जादा प्रवास असणाऱ्या विमातात अल्पोपहार दिला जातो.

किफायतशीर वर्ग (इकॉनॉमी क्लास)[संपादन]

या वर्गात साधारण ५१ शेंटी मीटर आकाराच्या बैठका आहेत. खान पान व्यवस्था डिलक्स इकॉनॉमी वर्गा प्रमाणे आहे.

विमानांचा ताफा[संपादन]

विमान वापरात ऑर्डर प्रवासी क्षमता
C Y+ Y एकूण
एरबस ए-३२० ५३ साचा:Fact १६ १६८ १८४
एरबस ए-३३० १० २४ २४२ २६६
एरबस ए-३५० १० ठरायचे आहे
ए.टी.आर. ७२-५०० १६ ६६ ६६
बोईंग ७७७ २५ ५४ २२८ ३०७
२७ ३०९
३५ २९० ३२५
बोईंग ७८७ ठरायचे आहे
एकूण ८८ २३

अपघात आणि घटना[संपादन]

सन १९५१ पासून या विमानानचे ६ अपघात झालेले आहेत.[७] १४ नोवेंबर १९९२ रोजी झालेल्या अपघातात ३१ पैकी ३० लोक ठार झाले आणि ३ सप्टेंबर १९९७ रोजी झालेल्या अपघातात ६५ प्रवाशी मृत्यूमुखी पडलेले आहेत.[८] या विमान कंपनीची विमान अपहरण घटना ही १९९२ साली झालेली आहे.

संदर्भ[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "व्हिएतनाम एयरलाइन्सचा इतिहास". Archived from the original on 2002-03-24. 2016-09-14 रोजी पाहिले.
 2. ^ "व्हिएतनाम एयरलाइन्सच्या सेवेबद्दल". Archived from the original on 2015-07-11. 2016-09-14 रोजी पाहिले.
 3. ^ "व्हिएतनाम एयरलाइन्सचे उड्डाण ठिकाणे". Archived from the original on 2016-05-20. 2016-09-14 रोजी पाहिले.
 4. ^ "व्हिएतनाम एयरलाइन्सने टेट (नवीन वर्ष) सणासाठी जास्त विमान सेवा दिली". Archived from the original on 2014-05-13. 2016-09-14 रोजी पाहिले.
 5. ^ "स्कायटीम सदस्य एयरलाइन्स यादी". Archived from the original on 2014-04-19. 2016-09-14 रोजी पाहिले.
 6. ^ "कायदेशीर भागीदारी करार विमान कंपनी". Archived from the original on 2002-03-24. 2016-09-14 रोजी पाहिले.
 7. ^ "व्हिएतनाम एयरलाइन्स - अपघात आणि घटना". Archived from the original on 2014-02-03. 2016-09-14 रोजी पाहिले.
 8. ^ "२०१५ मधील जगातील सर्वात मोठी विमान कंपनी".