साखा प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साखा प्रजासत्ताक
Республика Саха (Якутия)
Саха Өрөспүүбүлүкэтэ
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

साखा प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
साखा प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा अतिपूर्व
स्थापना २७ एप्रिल १९२२
राजधानी याकुत्स्क
क्षेत्रफळ ३१,०३,२०० चौ. किमी (११,९८,२०० चौ. मैल)
लोकसंख्या ९,५८,५२८
घनता ०.३१ /चौ. किमी (०.८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-SA
संकेतस्थळ http://www.sakha.gov.ru

साखा प्रजासत्ताक (रशियन: Респу́блика Саха́ (Яку́тия); साखा: Саха Өрөспүүбүлүкэтэ) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. रशियाच्या पूर्व भागात सायबेरियामध्ये ३०,८३,५२३ चौरस किमी क्षेत्रफळाच्या जमिनीवर वसलेला साखा हा जगातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. जर वेगळा देश असता तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने साखाचा क्रमांक भारताच्या खाली व आर्जेन्टिनाच्या वर लागला असता. साखा प्रजासत्ताकाची लोकसंख्या केवळ ९.५ लाख असून ह्यांपैकी १/३ लोक राजधानी व प्रमुख शहर याकुत्स्क येथे वास्तव्य करतात.

लेना ही येथील प्रमुख नदी असून बव्हंशी वाहतूक नदीद्वारे केली जाते. साखाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागराचे लापतेवपूर्व सायबेरियन हे दोन समुद्र आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: