सायबेरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुणक: 60°0′N 105°0′E / 60°N 105°E / 60; 105


       सायबेरियन केंद्रीय जिल्हा        भौगोलिक रशियन सायबेरिया        ऐतिहासिक सायबेरिया

सायबेरिया (रशियन: Сибирь) हा रशिया देशामधील एक अवाढव्य प्रदेश आहे. उत्तर आशिया हा शब्दप्रयोग जवळजवळ संपूर्णपणे सायबेरियाचा उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. सायबेरियाने रशियाच्या एकुण क्षेत्रफळापैकी ७७% भाग व्यापला आहे पण रशियाच्या एकुण लोकसंख्येच्या फक्त २५% लोकसंख्या सायबेरियामध्ये वसलेली आहे.

सायबेरियाच्या पश्चिमेला उरल पर्वत, उत्तरेला आर्क्टिक महासागर, पूर्वेला प्रशांत महासागर व दक्षिणेला कझाकस्तान, चीनमंगोलिया हे देश आहेत. नोव्होसिबिर्स्क हे सायबेरियामधील सर्वात मोठे शहर तर ओम्स्क, ईर्कुट्स्कक्रास्नोयार्स्क ही इतर शहरे आहेत.

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: