गतिमान एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गतिमान एक्सप्रेस
माहिती
सेवा प्रकार अतिजलद प्रवासी सेवा
प्रदेश उत्तर प्रदेश, दिल्ली
चालक कंपनी उत्तर रेल्वे
मार्ग
सुरुवात हजरत निजामुद्दीन
थांबे विनाथांबा
शेवट आग्रा छावणी
अप क्रमांक १२०४९
डाउन क्रमांक १२०५०
अंतर १८८ किमी
साधारण प्रवासवेळ १०० मिनिटे
प्रवासीसेवा
बसण्याची सोय होय
झोपण्याची सोय नाही
खानपान समाविष्ट
निरीक्षण सोय मोठ्या खिडक्या
मनोरंजन वायफाय इंटरनेट
तांत्रिक माहिती
गेज ब्रॉड गेज
वेग कमाल १६० किमी/तास
सरासरी ११२ किमी/तास

गतिमान एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अतिजलद प्रवासी सेवा आहे. अर्ध-द्रुतगती प्रकारची ही रेल्वेगाडी सध्याच्या घडीला भारतामधील सर्वात वेगवान सेवा असून ती दिल्लीच्या हजरत निजामुद्दीनआग्र्याच्या आग्रा छावणी ह्या दोन स्थानकांदरम्यानचे १८८ किमी अंतर १०० मिनिटांमध्ये पार करते. ह्या गाडीचा कमाल वेग १६० किमी/तास तर सरासरी वेग ११२ किमी/तास इतका आहे व ती दिल्ली व आग्र्यादरम्यान विनाथांबा धावते.

५ एप्रिल २०१६ रोजी गतिमान एक्सप्रेसचे भारताचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू ह्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. वाय-फाय इंटरनेट, जीपीएस माहिती, स्वयंचलित दरवाजे इत्यादी अद्ययावत सोयी सुविधा असणाऱ्या गतिमान एक्सप्रेसच्या एक्झेक्युटीव्ह क्लासचे भाडे ₹१,५०० तर एसी चेअर कारचे भाडे ₹७५० इतके आहे. प्रवासभाड्यात शाकाहारी व मांसाहारी अल्पोपहार समाविष्ट आहे.

तपशील[संपादन]

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२०५० हजरत निजामुद्दीन – आग्रा छावणी ०८:१०५ ०९:५० शुक्रवारखेरीज रोज
१२०४९ आग्रा छावणी – हजरत निजामुद्दीन १७:५० १९:३० शुक्रवारखेरीज रोज

बाह्य दुवे[संपादन]