सुरेश प्रभू
{{माहितीचौकट पदाधिकारी | नाव = सुरेश प्रभू | लघुचित्र= | पद = [[भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री | कार्यकाळ_आरंभ = ३ सप्टेंबर २०१७ | कार्यकाळ_समाप्ती = | मागील = निर्मला सीतारामन | पुढील = | पंतप्रधान = नरेंद्र मोदी | मतदारसंघ_एमपी1 = राजापूर सध्याचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग | संसद1 = लोकसभा | कार्यकाळ_आरंभ1 = इ.स. २००४ | कार्यकाळ_समाप्ती1 = इ.स. २००९ | मागील1 = | पुढील1 = निलेश राणे | कार्यकाळ_आरंभ2 =इ.स. १९९९ | कार्यकाळ_समाप्ती2 = इ.स. २००४ | कार्यकाळ_आरंभ3 =इ.स. १९९८ | कार्यकाळ_समाप्ती3 = इ.स. १९९९ | कार्यकाळ_आरंभ4 =इ.स. १९९६ | कार्यकाळ_समाप्ती4 = इ.स. १९९८ | मागील4 = सुधीर सावंत | जन्मदिनांक = ११ जुलै, १९५३
| जन्मस्थान = मुंबई, महाराष्ट्र
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| पक्ष = शिवसेना (१९९६ - २०१४)
भारतीय जनता पक्ष (२०१४ - चालू)
| पत्नी = उमा प्रभू
| अपत्ये = अमेय प्रभू
| निवास = मुंबई
| व्यवसाय = चार्टेड अकाउंटंट
| धर्म = हिंदू
| सही =
| संकेतस्थळ = www
मुंबई विद्यापीठामधून चार्टर्ड अकाउंटंटची पदवी मिळवणारे प्रभू राजकारणामध्ये शिरण्यापूर्वी सारस्वत बँकेच्या चेअरमनपदावर होते. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी प्रभूंना शिवसेनेत आणले व राजापूर मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट दिले. राजापूरमधून प्रभू सलग ४ वेळा लोकसभेवर निवडून आले. खासदार असताना १९९८ ते २००२ या काळात प्रभू ह्यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची मंत्रिपदे सांभाळली. परंतु २००२ साली अंतर्गत बेबनावामुळे ठाकरे ह्यांनी प्रभूंना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. परंतु तरी सुद्धा ते केंद्रात रेल्वेमंत्री होते हे विशेष.
९ नोव्हेंबर २०१४ रोजी मोदींच्या मंत्रिमंडळात नियुक्ती होण्यापूर्वी प्रभूंनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
सुरेश प्रभु हे निष्कलंक राजकारण्यांपैकी एक आहेत त्यांच वैयक्तिक आयुष्य एकदम साधं आहे राहणीमान व एकंदर स्टाईल साधीच आहे.[ दुजोरा हवा]
ते सध्याच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे माजी खासदार आहेत.
त्यांच्या खासदारकीच्या काळात अनेक गावांत रस्ते पोहचवण्याचं काम केले. आजही त्यांच्या मतदारसंघात त्यांना मानाचं स्थान आहे.[ दुजोरा हवा]
शिक्षण[संपादन]
सुरेश प्रभू यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या दादर भागातील शारदाश्रम विद्यामंदिर येथे झाले.पुढील काळात त्यांनी महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. तदनंतर त्यांनी रूपारेल कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. प्रभू हे सनदी लेखापाल आहेत. या परीक्षेत त्यांचा अखिल भारतात ११ वा क्रमांक आला होता. सध्या ते दोन विषयांत पीएच.डी. करीत आहेत.