मिझोरम
मिझोरम | |
भारताच्या नकाशावर मिझोरमचे स्थान | |
देश | भारत |
स्थापना | २० फेब्रुवारी १९८७ |
राजधानी | ऐझॉल23°22′N 92°48′E / 23.36°N 92.8°E |
सर्वात मोठे शहर | ऐझॉल |
जिल्हे | ८ |
लोकसभा मतदारसंघ | १ |
क्षेत्रफळ | २१,०८१ चौ. किमी (८,१३९ चौ. मैल) (२४ वा) |
लोकसंख्या (२०११) - घनता |
१०,९१,०१४ (२७वा) - ५२ /चौ. किमी (१३० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०) |
प्रशासन - राज्यपाल - मुख्यमंत्री - विधीमंडळ (जागा) - उच्च न्यायालय |
कंभमपती हरी बाबू लालदुहोमा विधानसभा (४०) गुवाहाटी उच्च न्यायालय |
राज्यभाषा | मिझो |
आय.एस.ओ. कोड | IN-MZ |
संकेतस्थळ: mizoram.gov.in |
मिझोरम हे भारत देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. मिझोरमच्या उत्तरेस आसाम, ईशान्येस मणिपूर, पश्चिमेस त्रिपुरा ही राज्ये तर पूर्वेस व दक्षिणेस म्यानमार व पश्चिमेस बांगलादेश हे देश आहेत. ऐझॉल ही मिझोरमची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
मिझोरम राज्याची स्थापना १९८७ साली आसाम राज्याला विभागून केली गेली. त्याचे एकूण क्षेत्रफळ २१,०८१ चौ.किमी एवढे आहे तर लोकसंख्या १०,९१,०१४ एवढी आहे. मिझो व इंग्रजी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. मिझोरम मध्ये मिझो जमातीचे लोक बहुसंख्येने राहतात. मिझोरममधील बहुतेक भू-भाग डोंगराळ स्वरूपाचा असून शेती हा येथील प्रमुख उद्योग आहे. त्यासोबतच पशुपालन व रेशीम हे येथील जोड व्यवसाय आहेत. मका, चहा व कडधान्ये ही येथील मधील प्रमुख पिके आहेत. या राज्याची साक्षरता जास्त म्हणजे ९१.५८ टक्के एवढी आहे. साक्षरतेच्या बाबतीत मिझोरमचा भारतात दुसरा (पहिला केरळ) क्रमांक लागतो.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन संकेतस्थळ Archived 2010-07-29 at the Wayback Machine.