Jump to content

उत्तराखंड विधानसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उत्तराखंड विधानसभा हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ७१ आमदारसंख्या असलेल्या उत्तराखंड विधानसभेचे कामकाज डेहराडूनमधून चालते. काँग्रेसचे गोविंद सिंह कुंजवाल विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री हरीश रावत हे विधानसभेचे नेते आहेत.

भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे उत्तराखंड विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे २१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान विधानसभा २०१२ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. आगामी विधानसभा निवडणूक ४ फेब्रुवारी २०१७ रोजी घेतली जाईल.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]