विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा
(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) |
||||||
---|---|---|---|---|---|---|
चर्चा (विपी इतर चर्चा) इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा वादनिवारण वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा |
साहाय्य | मदतकेंद्र नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा |
दूतावास (Embassy) नवी चर्चा जोडा (Start new discussion) |
प्रचालकांना निवेदन प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा
|
तांत्रिक तांत्रिक मुद्दयांवर चर्चा. विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा |
ध्येय आणि धोरणे सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा |
प्रगती मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा नवीचर्चा जोडा | वाचा सोशल मीडिया मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा |
चावडी (सुचालन) | |
---|---|
स्थापना | |
स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा | |
इतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
विदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)
| |
मराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)
| |
जुनी चर्चा |
---|
|
उत्पात
@अभय नातू, Tiven2240, Usernamekiran, संतोष गोरे, Sandesh9822, Rahuldeshmukh101, Abhijitsathe, सुभाष राऊत, आणि V.narsikar:, कृपया हे पहा
- सिध्दांत घेगडमल
- सिध्दांत घेगडमल (भारतीय मॉडल)
- सिद्धांत घेगडमल (भारतीय मॉडल)
- सिद्धांत घेगडमल(Model)
- सिद्धांत घेगडमल
वरील पान Siddhant Ghegadmal आणि SBG Ghegadmal नावाची व्यक्ती परत परत बनवत आहे. कृपया इतिहास तपासावा, सदस्य जास्तच उत्पात माजवत आहे. - संतोष गोरे ( 💬 ) १३:४५, १९ ऑक्टोबर २०२१ (IST)
- @संतोष गोरे:
- नोंद घेतली. या सदस्याने पुन्हा उत्पात केल्यास पानावर साद द्यावी. धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०९:५७, २१ ऑक्टोबर २०२१ (IST)
- @अभय नातू: पुन्हा एकदा निर्मिती झालीय. सदरील व्यक्तीचे दोन अकाउंट मराठी, हिंदी आणि इंग्रजी विकिपीडियावर प्रतिबंधित आहेत. आता हे तिसरे अकाउंट आहे.- संतोष गोरे ( 💬 ) १८:५१, ३० ऑक्टोबर २०२१ (IST)
राज शून्य एक शून्य दोन
Raj0102 हा सदस्य संतोष गोरे या सदस्याला त्याच्या पोस्ट एडिट न करण्याविषयी धमकीयुक्त भाषा वापरत आहे. पण दुर्दैवाने विकिची पायाभरणीच एकमेकांच्या पोस्ट एडिट करण्याच्या कल्पनेतून झालेली असल्यामुळे अशा धमक्यांचा काहीही फायदा होणारा नाही. ह्या युजरला तात्पुरते ब्लॉक करणे माझ्या मते गरजेचे आहे. Shantanuo (चर्चा) १३:४७, ४ डिसेंबर २०२१ (IST)
- Shantanuo आपल्या सावध भूमिकेबद्दल धन्यवाद. विकिपीडियावर असेच सर्वांनी सावध असायला हवे, जेणेकरून कोणत्याही सदस्यास जर कुणी चुकीच्या पद्धतीने त्रास देत असेल तर इतरांनी यात लक्ष घातल्यास सक्रिय सदस्यांची निश्चितच संख्या वाढेल. असो.
- मी मुद्दामच त्या सदस्याकडे दुर्लक्ष केले.. आणि त्याचा परिणाम चांगला झाला, तो सदस्य काहीवेळात गप्प बसला. दुर्लक्ष करण्याचे मुख्य कारण म्हणजे, तो निष्क्रिय सदस्य आहे. तो कुठेही संपादने करत नाही. जर सक्रिय असता तर त्याचा उपद्व्याप वाढण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आपण सक्रिय सदस्यांना पहिले सूचना देतो, नाही ऐकले की अजून एक दोन सूचना किंवा ताकीद देणे आवश्यक असते, आणि यानंतर ही जर उपद्व्याप थांबले नाहीत तर मग कारवाईची विनंती करतो. बरोबर ना... - संतोष गोरे ( 💬 ) १६:३०, ४ डिसेंबर २०२१ (IST)
- @Shantanuo:, ही बाब लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. संबंधित सदस्याला संदेश दिलेला आहे. पुन्हा अशी संपादने आढळल्यास येथे किंवा थेट मला संदेश द्यावा.
- @संतोष गोरे:, या खोडसाळपणाकडे दुर्लक्ष करणे हा आपला मोठेपणा आहे परंतु याची नोंद द्यावी म्हणजे सतत असा व्यत्यय आणणाऱ्या कृतींची दखल घेता येईल.
- अभय नातू (चर्चा) २३:२७, ४ डिसेंबर २०२१ (IST)
अलीकडील बदल
@अभय नातू आणि Tiven2240: नमस्कार, सध्या सदस्य:Usernamekiran आणि सदस्य:KiranBOT द्वारे मोठ्या प्रमाणावर संपादने होत आहेत. यामुळे 'अलीकडील बदल' या विभागात मोठ्या प्रमाणावर संपादनाची यादी येत आहे. यातून उत्पात आणि चुकीची संपादने करणाऱ्या इतर सदस्यांना शोधणे अवघड होत आहे. यावर काही उपाय करता येईल का कृपया मार्गदर्शन करावे- संतोष गोरे ( 💬 ) ०९:२९, ७ डिसेंबर २०२१ (IST)
- @संतोष गोरे:
- KiranBOT हे सांगकाम्या (Bot) खाते आहे. त्याला बॉटफ्लॅग दिल्यावर त्याचे बदल अलीकडील बदल मध्ये दिसणार नाहीत. परंतु सध्याच तयार झाल्यामुळे हा फ्लॅग अजून देण्यात आलेला नाही. आपण सहसा १४ दिवस थांबतो परंतु या खात्यासाठी अपवाद करता येईल. त्यासाठी सूचना देत येथे आहे.
- अभय नातू (चर्चा) ०९:३९, ७ डिसेंबर २०२१ (IST)
- धन्यवाद - संतोष गोरे ( 💬 ) ११:४७, ७ डिसेंबर २०२१ (IST)
- माझ्या मते असा अपवाद न करता १४ दिवस थांबण्याचा नियमच रद्द करावा. बॉट फ्लॅग देण्याचा किंवा काढून घेण्याचा निर्णय प्रचालकांकडून लगेच अमलात यायला हवा. निवडणुका / मतदान वगैरे गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण कधी? जेव्हा सदस्यसंख्या मोठी असेल तेव्हा. लहान विकींनी त्वरित निर्णय घेणे आवश्यक असते. ज्यांना निर्णय पटणार नाही त्यांना इथे म्हणजे चावडीवर अपील करण्याची सोय आहेच. Shantanuo (चर्चा) १३:३८, ७ डिसेंबर २०२१ (IST)
- लवकरात लवकर botflag मिळावा अशी मीपण विनंती करतो. botflag मिळेपर्यंत मी bot account मधून काम थांबवतो. तोपर्यंत मी माझ्या खात्यातून bot साठी असणारी काही edits करतो.
- इंग्रजी विकिपीडियावर botflag साठी वेगळी प्रक्रिया आहे. त्यामध्ये bot ची सर्वसाधारण कार्यप्रणाली विचारल्या जाते, व bot चालकाला तांत्रिक ज्ञान किती आहे ते बघितल्या जाते. ह्या नंतर ५० ते २०० एडिट्स ची चाचणी होते. ह्या दरम्यान कोणाला काही आक्षेप असेल तर त्यावर चर्चा केल्या जाते. सर्वकाही व्यवस्थित असेल तर ताबडतोब botflag मिळतो. तरीसुद्धा पूर्ण प्रक्रियेस कमीतकमी २ ते ३ दिवसांचा कालावधी लागतो. पण तिथे "waiting period"/थांबण्याचा कालावधी नाही. Shantanuoनी म्हटल्याप्रमाणे नंतर काही अडचण आल्यास चावडीवर आक्षेप/चर्चा करता येतेच. —usernamekiran (talk) २०:१६, ७ डिसेंबर २०२१ (IST)
- अलीकडील बदल या विभागात मोठ्या प्रमाणावर यादी येत आहे ती चेक करणे संपादकांना झेपत नाही म्हणून एखाद्याने आपले काम स्थगित ठेवावे हा विरोधाभास झाला. इंग्रजी विकीवर तर एखाद्या मिनटात शेकडो पाने बदलत असतात. मोठ्या विकीशी तुलना होऊ शकत नाही याची मला कल्पना आहे. पण मोठे व्हायचेच नाही याची कल्पना नव्हती. Shantanuo (चर्चा) ०९:५४, ८ डिसेंबर २०२१ (IST)
- होय, तुमचं म्हणणं काही अंशी बरोबर आहे. पण इंग्रजी विकिपीडियावर १२०+ प्रचालक, २०० च्या जवळपास द्रुत्मघारकार तसेच इतर काही अकाउंट आहेत जे सतत सक्रिय असतात.
- आणि काल मराठी विकिपीडियावर बहुतेक कुणीतरी कुठेतरी कार्यशाळा आयोजित केली असावी, त्यामुळे संपदनांची रांग लागली होती. याकरिता मराठी विकिपीडियावरील सक्रिय सदस्य गाफील राहिले होते. याच बरोबर मराठी विकिपीडियावर कडक नियम नसून सुद्धा उत्पात मानावेत अशी संपादने वाढली होती. त्यामुळे काहीकाळ तरी येथील संपादने काटेकोरपणे तपासणे आवश्यक आहे असे मला वाटते. बाकी १४ दिवसांचा waiting period नसावा हेही तितकेच खरे आहे - संतोष गोरे ( 💬 ) १४:५९, ८ डिसेंबर २०२१ (IST)
- @Shantanuo:
- मोठे व्हायचेच नाही याची कल्पना नव्हती.
- ?? असे का वाटले? आपले बरेच नियम, संकेत अनेक महिन्या, वर्षांपूर्वी केलेले होते. तेव्हा मराठी विकिपीडिया उदयोन्मुख होता. जरी तो आजही उदयोन्मुख असला तरीही आकार नक्कीच वाढला आहे (४-५ पट!). आपले नियम बदलता येत नाहीत असे मुळीच नाही परंतु त्यावर साधकबाधक चर्चा व्हावी ही अपेक्षा.
- तुमच्या वरील संदेशाशी मी सहमत आहे आणि त्यानुसार मी बॉट विनंती पानावर संदेश दिला आहे. तेथे १-२ दिवस थांबण्याचे कारण "'प्रचालक मनमानी करतात अशी निरर्थक आवई उठू नये हे. असे पूर्वी अनेकदा झाल्याने ताकही फुंकुन पीत आहे :-)
- असो. सध्या KiranBOT खात्यास बॉटफ्लॅग द्यावा व थांबण्याचा नियम काढण्याबद्दल चावडीवर प्रस्ताव घालावा असे सुचवतो.
- अभय नातू (चर्चा) ०१:५८, ९ डिसेंबर २०२१ (IST)
साचा:माहितीचौकट चित्रपट
नमस्कार. प्रचालकांना साचा:माहितीचौकट चित्रपट मधील
{{ #if:{{{निर्मिती वर्ष|}}} |{{#ifexist: वर्ग:इ.स. {{{निर्मिती वर्ष}}} मधील {{{भाषा}}} चित्रपट|[[वर्ग:इ.स. {{{निर्मिती वर्ष}}} मधील चित्रपट]]}} }}
वरील मथळ्याच्या जागी खालील मथळा टाकण्याची विनंती.
{{ #if:{{{निर्मिती वर्ष|}}} |{{#ifexist: वर्ग:इ.स. {{{निर्मिती वर्ष}}} मधील {{{भाषा}}} चित्रपट|[[वर्ग:इ.स. {{{निर्मिती वर्ष}}} मधील {{{भाषा}}} चित्रपट]]}} }}
—usernamekiran (talk) ०९:३१, १२ डिसेंबर २०२१ (IST)
- झाले. -- अभय नातू (चर्चा) १०:०९, १३ डिसेंबर २०२१ (IST)
- dhanyavaad. —usernamekiran (talk) १०:११, १३ डिसेंबर २०२१ (IST)
एक शंका: न्यूझीलंड की न्यू झीलॅंड?
(खालील चर्चा सदस्य चर्चा:Usernamekiran येथून हलवली) —usernamekiran (talk) ०२:१२, १२ फेब्रुवारी २०२२ (IST)
नमस्कार, एक शंका होती, ती तुम्हाला विचारतो आहे. न्यूझीलंड की न्यू झीलॅंड या पैकी कोणता शब्द योग्य आहे? म्हणजे समजा न्यू झीलॅंड असा वापरला तर मग इंग्लंडचे पण इंग्लॅंड व्हायला पाहिजे. आयर्लंडचे आर्यलॅंड असायला पाहिजे. माझ्यामते न्यूझीलंड हा शब्द ठिक वाटतो. उच्चार करताना देखील आपण न्यूझीलंड म्हणतो, न्यू झीलॅंड नाही. आपला अभिप्राय कळवा. Aditya tamhankar (चर्चा) ७ फेब्रुवारी २०२२, ११:३४
- @Aditya tamhankar: नमस्कार. New Zealand चे योग्य नाव "न्यू झीलंड" असे आहे. हे मला आधीच माहीत होते, पण त्यादिवशी गडबडीत मला लक्षात नाही आले. न्यू झीलंड चे इंग्रजी भाषेतील अधिकृत नाव "New Zealand" (मध्ये space) असे आहे. इतर उदाहरणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. मी आत्ता लेख योग्य नावावर हलवतो, व इतर लेखातील नाव उद्या बरोबर करतो. —usernamekiran (talk) २२:२८, ७ फेब्रुवारी २०२२ (IST)
कृपया, न्यू झीलॅंड चे न्यू झीलंड हा बदल करण्या अगोदर प्रचालक तसेच चावडीवर बोलून घ्यावे. कारण १०० हून अधिक लेखांचे नाव न्यू झीलॅंड येथे स्थलांतरित केले गेले आहेत. Khirid Harshad (चर्चा) ००:१२, ८ फेब्रुवारी २०२२ (IST)
- @Khirid Harshad: प्रतिसाद देण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्या पानावर १०० पेक्षा अधिक दुवे जोडलेले होते. पण ते दुवे मी AWB वापरून दुरुस्त केले :-) —usernamekiran (talk) २३:३२, १० फेब्रुवारी २०२२ (IST)
- @Usernamekiran: एक विनंती आहे, क्रिकेटविषयक जे लेख आहेत त्या लेखांच्या हेडिंग मध्ये पण जिथे न्यू झीलंड असा बदल असेल तो लेख पण न्यू झीलंड असा स्थानांतरित कराल का? उदा. न्यूझीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३ हा लेख न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३ वर स्थानांतरित करणे आणि इतर असे अनेक लेख जे न्यूझीलंड हा शब्द वापरून बनवले गेलेत. धन्यवाद. Aditya tamhankar (चर्चा) ११ फेब्रुवारी २०२२, १३:१९
@Khirid Harshad आणि Aditya tamhankar: तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्थानांतर व बदल करता येतील. पण त्याआधी क्रिकेट व देश संदर्भातील लेखांची वर्गवारी करायला हवी. त्यानंतर लेखांचे स्थानांतर करणे सोपे जाईल. देशांचे वर्ग मी हाताळू शकतो, पण क्रिकेट च्या वर्गांसाठी मला थोडीफार मदत/मार्गदर्शन लागेल. संदर्भासाठी तुम्ही इंग्रजी विकिपीडियावर हि category व वर्ग:क्रिकेट बघू शकता. आपण सध्या फक्त महत्वाच्या वर्गांपासून सुरुवात करू. जर काही दिवस इथे कोणी आक्षेप/विरोध नाही दर्शवला तर आपण काम सुरु करू. जर कोणाला काही सल्ला द्यायचा असेल, तर द्यावा हि विनंती. —usernamekiran (talk) ०२:१३, १२ फेब्रुवारी २०२२ (IST)
Sandbox link
Apologies for writing in English. Please feel free to translate my text.
I'm holding a global RFC regarding Sandbox link (example) at Meta: m:Requests for comment/Enable sandbox for all Wikipedias. I was told by User:Lucas Werkmeister that Marathi Wikipedia as a large project does not have Sandbox link enabled.
- Does Marathi Wikipedia want the Sandbox link enabled?
If there is consensus for enabling that on Marathi Wikipedia, I will do that as part of the global settings. But if Marathi Wikipedia does not want that, I can simply omit the Marathi Wikipedia from my proposal. No hard feelings at all :) I have personally not found Sandbox links harmful in any way, shape, or form. Thanks 4nn1l2 (चर्चा) ०८:३७, १९ फेब्रुवारी २०२२ (IST)
- @4nn1:
- Thanks for reaching out.
- As a general guideline, w:mr strives to stay in sync with other wikimedia projects and to that end, I would expect that the w:mr community would want this enabled. I will let individual members express their opinions as well but unless there's any opposition, you may plan on enabling sandbox link for w:mr
- Thanks again.
- अभय नातू (चर्चा) १०:२४, १९ फेब्रुवारी २०२२ (IST)
- पाठिंबा - Tiven2240
@4nn1l2 this will surely help new users to write and improve articles before they are in mainnamespace. Looks good for me Tiven2240 (चर्चा) १८:४७, १९ फेब्रुवारी २०२२ (IST)
अर्ध्या ल चे योग्य लिखाण
जोडाक्षरात ल पूर्वपदावर असल्यास त्याचे 'ल्य' असे लिखाण न होता 'ल्य' असे होत आहे. विंडोज – क्रोम, फायफॉक्स दोन्हीत ही समस्या आली तर लिनक्स प्रणालीत ते जोडाक्षर योग्य दिसते. उदाहरण म्हणून हे चित्र पहा. हा टंकाचा विषय आहे हे उघड आहे, पण मला जर विंडोजमध्ये योग्य 'ल्य' हवा असेल तर काय करावे लागेल? Shantanuo (चर्चा) १०:५१, १३ मार्च २०२२ (IST)
ही समस्या खाली दिलेल्या विंडोज प्रणालीत दिसून आली.
- Windows 10 Home Single Language
- Windows server 2019
ही समस्या खाली दिलेल्या विंडोज प्रणालीत दिसून आली नाही.
- windows 7 ultimate
विंडोज ७ अल्टिमेट किंवा लिनक्स वापरणे हा पर्याय आहे पण मला विचारायचे आहे की कल्याण हा शब्द फक्त मलाच कल्याण असा दिसतो आहे की असे बरेच लोक आहेत?
Shantanuo (चर्चा) ०९:०२, २० मार्च २०२२ (IST)
बँकेच्या पानांवर उत्पात
@अभय नातू आणि Tiven2240: काही विशिष्ट आय पी ॲड्रेस वरून एच.डी.एफ.सी. बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक, भारतीय स्टेट बँक आणि भारतीय रिझर्व्ह बँक या पानांवर कस्टमर केअर म्हणून एक मोबाईल नंबर टाकण्यात आला होता. यामुळे एखाद्या वाचकाला आर्थिक धोका होण्याची शक्यता आहे. टायविन यांनी काही पानांवरील संपादने साफ केलेली दिसलीत. विनंती आहे की वरील इतर पानांवरील आजची संपादने उडवावीत आणि पाने अर्ध सुरक्षित करावीत.- संतोष गोरे ( 💬 ) १६:१५, १९ मार्च २०२२ (IST)
- झाले. --२०:०४, १९ मार्च २०२२ (IST) Tiven2240 (चर्चा) २०:०४, १९ मार्च २०२२ (IST)
- @अभय नातू आणि Tiven2240: नमस्कार, मला वाटते की सर्व बँकेच्या पानांना कायम अर्धसुरक्षित करावे.- संतोष गोरे ( 💬 ) १०:२३, ९ जून २०२२ (IST)
- @अभय नातू आणि Tiven2240: सौम्य स्मरण- संतोष गोरे ( 💬 ) १०:४४, १२ जून २०२२ (IST)
- पाने (अर्ध / पूर्ण) सुरक्षित करणे विकीच्या मूळ तत्त्वात बसणारे नाही. या सूचनेला माझा विरोध आहे. Shantanuo (चर्चा) १०:५९, १२ जून २०२२ (IST)
- @संतोष गोरे यादीतील काही लेखांना संरक्षित केले आहे, @Shantanuo उत्पात असल्यास संरक्षित करणे विकी धोरणात बसते. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ११:४६, १२ जून २०२२ (IST)
- पाने (अर्ध / पूर्ण) सुरक्षित करणे विकीच्या मूळ तत्त्वात बसणारे नाही. या सूचनेला माझा विरोध आहे. Shantanuo (चर्चा) १०:५९, १२ जून २०२२ (IST)
- पानांवर अंकपत्यांवरुन उत्पात होत असेल तर अशी पाने अर्धसुरक्षित करणे हेच बरोबर. असे करण्याने लॉग्ड-इन सदस्यांना संपादने करण्यास मज्जाव होत नाही.
- तुम्ही म्हणल्याप्रमाणे येथे संपादकांची वानवा आहे. अशात इतरांनी टाकलेली घाण काढण्यात या संपादकांचा वेळ गेल्यास त्यांच्याकडून होणारे योगदान रोडावेल.
- ही पान अर्धसुरक्षित करताना त्यांना ५-७-१५ दिवसांची मुदत घालणे हा एक पर्याय आहे.
- अभय नातू (चर्चा) २१:१३, १२ जून २०२२ (IST)
वर्गवारीचे धोरण
रुपी_कौर या लेखाला सुमारे २५ वर्ग जोडले गेले आहेत. “पंजाबी वंशाचे कॅनेडियन लोक”, “ब्रॅम्प्टनमधील लोक”, “वॉटरलू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी” अशा वर्गात आणखी किती लेख येणे अपेक्षित आहे? "चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला" अशी स्थिती आहे. वर्गांची संख्या अगदी मोजकी हवी आणि ते एकमेकांशी आतून जोडले गेलेले असावेत. Shantanuo (चर्चा) ०९:५३, ३१ मार्च २०२२ (IST)
- वर्गांची योग्य वर्गवारी करून केवळ एकच योग्य वर्ग ठेवण्यात आला तर हे टळू शकते. उदा: "भारतीय कवयित्री > पंजाबी भाषेतील कवयित्री" व "भारतीय स्त्रीवादी > भारतीय स्त्रीवादी लेखिका" अशाप्रकारे वर्गांची रचना असल्यास वर्ग आपोआप कमी होतील. ह्या लेखाव्यतिरिक्त उदाहरण द्यायचे झाल्यास, "भारत > महाराष्ट्र > विदर्भ > यवतमाळ > वणी > वणीमधील कोळश्याच्या खाणी" अशी वर्गवारी असल्यास "कोळशाची खाण, वणी" ह्या लेखामध्ये केवळ "वणीमधील कोळश्याच्या खाणी" ह्या एका वर्गाची गरज असते, फार तर "वणी" हा वर्ग टाकता येऊ शकतो. भारत/महाराष्ट्र/विदर्भ ह्या वर्गांची गरज नाही. इंग्रजी विकिपीडियावर "over categorised", आणि "under categorised" अशे सुद्धा वर्ग आहेत. —usernamekiran (talk) १३:०१, ३१ मार्च २०२२ (IST)
- बऱ्याच बाबतीत मार्गदर्शक तत्वे असण्याची गरज आहे, पण लेखांची एकूण संख्या, आणि ऍक्टिव्ह एडिटर्स कमी असल्यामुळे कधी कधी त्याची गरज नाही वाटत. मला वाटते जर जास्तच मार्गदर्शक तत्वे असतील, तर नवीन संपादक येण्याची शक्यता कमी होते. सध्या तरी मला फक्त विकिपीडिया:उल्लेखनीयता चे पालन व्हावे असे वाटते. PR कंपन्यांनी मराठी विकिपीडिया वर नुसता धुमाकूळ घातलाय. नवीन चित्रपट/मालिका येताच त्यावर लेख लिहितात. —usernamekiran (talk) १३:०१, ३१ मार्च २०२२ (IST)
इतर भाषिक शीर्षक
Irawati_Karve या पानाचे पुनर्निर्देशन इरावती कर्वे या पानाकडे केले होते. ते काढू नये. कारण विकीसोर्सवरील tinyurl.com/irawatikarve या पानावरील नेव्हिगेशन बार वरून मराठी विकीवर येण्यासाठी हे बनविले होते. नेव्हिगेशन बारच्या लिंक्स आपोआप बनतात. त्या मराठीत लिहिता येत नाहीत. Shantanuo (चर्चा) १०:४८, १२ एप्रिल २०२२ (IST)
- @Shantanuo:
- लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. Tinyurl वरील शीर्षके कशी बदलता येतील याची पुन्हा एकदा चौकशी केल्यास त्यानुसार बदल करता येतील
- अभय नातू (चर्चा) ०८:५२, १३ एप्रिल २०२२ (IST)
- विकीसोर्सवरील साहित्यिक:इरावती_कर्वे या पानावरील "sister projects” विभागातील दुवा जर कोणी मराठी करू शकला तर मग विकीवर इंग्रजी पानाची आवश्यकता राहणार नाही. Shantanuo (चर्चा) ०९:११, १३ एप्रिल २०२२ (IST)
- @Shantanuo तिकडले प्रचालकानी कॅस्कॅडींग संरक्षण लावल्यामुळे तपासणी करणे अवगद आहे. कृपया संरक्षण कमी केल्यास काही बदल करता येऊ शकेल असे वाटते. --Tiven2240 (चर्चा) ०९:३५, १६ एप्रिल २०२२ (IST)
- विकीसोर्सवरील साहित्यिक:इरावती_कर्वे या पानावरील "sister projects” विभागातील दुवा जर कोणी मराठी करू शकला तर मग विकीवर इंग्रजी पानाची आवश्यकता राहणार नाही. Shantanuo (चर्चा) ०९:११, १३ एप्रिल २०२२ (IST)
जवळपासची गावे
"जवळपासची गावे" या विभागात काही नावे दोनदा आलेली दिसतात. प्रत्येक नाव एकदाच (unique) ठेवून अकारविल्हे (sort) मांडणी करण्यासाठी खाली दिलेली जावा-स्क्रिप्ट सुविधा वापरली.
https://codepen.io/shantanuo/pen/bGLboom
उदाहरण म्हणून बेल्हे गावाच्या लेखातील हा फरक पहा. special:permalink/2107015 विकीच्या संपादकांनी अशा बुकमार्कचा उपयोग केल्यास त्यांचा बराच वेळ वाचू शकेल. Shantanuo (चर्चा) १४:२८, २९ एप्रिल २०२२ (IST)
- याचा वापर नक्की कसा करायचा?
- मोबाईल वरून सुद्धा वापर करता येतो का?- संतोष गोरे ( 💬 ) १५:४०, २९ एप्रिल २०२२ (IST)
- मोबाईलचे माहीत नाही. मी डेस्कटॉपवरून वापरतो. ती लिंक क्लिक-ड्रॅग करून ब्राऊजरच्या लिंक्स टूलबारवर आणून ठेवायची. मग पान संपादन करताना त्यावर क्लिक केली की त्यातील जावा-स्क्रिप्ट कोडमुळे दोन बाण दिसू लागतात. या चित्रात दाखविल्याप्रमाणे. अकारविल्हे (ascending) किंवा उलट (descending) सॉर्ट करता येतात गावांची नावे. Shantanuo (चर्चा) १६:०९, २९ एप्रिल २०२२ (IST)
मराठी स्पेलचेक
मजकुरातील चुकीचे शब्द वेगळे काढून त्यांना पर्यायी शब्द देणारे ऍडऑन लिब्रेऑफिससाठी बनविले आहे.
https://extensions.libreoffice.org/en/extensions/show/20640
कोणाला आवडले तर अवश्य वापर करावा. Shantanuo (चर्चा) १६:१९, ११ मे २०२२ (IST)
प्रमाणलेखनासाठी एकच बॉट
माझ्यामते प्रमाण लेखनात सुधारणा करण्यासाठी फक्त एकच बॉट वापरावा. उदा. सांगकाम्या या बॉटने केलेले दोन बदल (उदा. "सर्वोतम → सर्वोत्तम" किंवा "स्त्रोत → स्रोत") KiranBOT_II द्वारे करून घ्यावेत. तो बॉट चालवणाऱ्या किरण यांना यासाठी वेळ नसेल तर दुसऱ्या कुणीतरी ती स्क्रिप्ट कशी चालवायची ते शिकून घेणे आवश्यक आहे. जर त्यासाठी कुणी तयार नसेल तर विकिपीडियाचा आणखी प्रचार आणि प्रसार होईपर्यंत थांबावे लागेल! Shantanuo (चर्चा) ०९:५५, ३ जून २०२२ (IST)
- असे का? जर शुद्धलेखन प्रमाणलेखनाप्रमाणे होत असेल तर कोणासही ते करण्यास हरकत नसावी परंतु आपली कारणे जाणून घेण्यास उत्सुक आहे.
- अभय नातू (चर्चा)
बरीच कारणे आहेत…
- किरण बॉटची स्क्रिप्ट रोज चालते. इतर बॉट चार सहा महिन्यातून एकदा चालतात. तोपर्यंत त्या चुका तशाच राहतात.
- किरण बॉटमध्ये शब्दांचे विभाग पाडले आहेत. उदा. "योग्य रकार" "नियम x.x" ते समजायला सोपे पडते.
- प्रोग्रॅम लिहून किरण बॉटच्या बदलांचा मागोवा घेता येतो. तसा इतर बॉटचा घेता येत नाही. उदाहरणार्थ खालील कमेंटमधील "म्युचुअल फंड" आणि (१२) याला काहीतरी विशेष अर्थ असेल जो फक्त त्या बॉटच्या कर्त्यालाच माहीत आहे. /* म्युचुअल फंड */शुद्धलेखन, replaced: स्त्रोत → स्रोत (12) using AWB पण त्यामुळे पायथॉन किंवा इतर भाषेत कोड लिहता येत नाही.
- ज्यांना विकीपीडियातील बदल पहायचे आहेत पण शुद्धलेखनात इंटरेस्ट नाही, ते KiranBOT_II वगळून इतर सर्व बदल पाहू शकतात. तर ज्यांना फक्त शुद्धलेखन हा एकच विषय अभ्यासायचा असेल ते फक्त त्याच बॉटवर नजर ठेवू शकतात.
- अनपेक्षित बदल तपासणे, बदलांच्या संख्येची नोंद ठेवणे, कोणते शब्द बदलले त्याचा बॅकअप ठेवणे वगैरे कारकुनी स्वरूपाची कामे एक दोन सदस्यांवर सोपविता येतात.
Shantanuo (चर्चा) ११:४९, ३ जून २०२२ (IST)
- उत्तराबद्दल धन्यवाद. तुमची काही कारणे पटत असली तरी सगळी कारणे पटत नाहीत.
- १, २ -- किरणबॉट रोज चालत असल्यास त्याद्वारे बदल करुन घेणे चांगलेच परंतु त्यासाठी इतरांना मज्जाव का करावे हे नाही कळले. जेव्हा चुका लक्षात येतात तेव्हा ते सुधारण्यास दोन-तीन मार्ग आहेत -- स्वतः हाताने बदल करणे, किरणबॉट, स्वतःचा बॉट. यांपैकी कोणताही मार्ग निवडल्यास निकाल एकच आहे -- सुधारलेले शुद्धलेखन. असे असता एकाच प्रकारे हे बदल व्हावेत असा आग्रह करू नये.
- ३ -- असा मागोवा घेतल्याने काय निष्पन्न होईल? तसेच हाच मागोवा इतरांनी केलेल्या बदलांवरही थोड्या प्रयत्नाने करता येईल. यात हाताने केलेले बदलही असावेत.
- ४ -- इतर बॉटद्वारे झालेले बदल किरणबॉटप्रमाणेच अलीकडील बदलमध्ये दिसत नाहीत. दोन बॉटमध्ये या बाबतील फरक काय असेल हे नाही कळले.
- ५ -- हे बरोबर असले तरी इतरांनी केलेले बदल पूर्णपणे कधीच रेग्युलेट करता येणार नाहीत कारण कोणीही येथे लेखन करावे असा आपला संकेत आहे.
- तरी शुद्धलेखनाचे बदल शक्यतो किरणबॉटकडून करुन घ्यावे पण इतरांना मज्जाव करू नये असा संकेत असावा. यासाठी हे बदल करुन घेण्यासाठीची प्रक्रिया काय आहे हे लिहून ठेवल्यास त्याला अधिक प्रसिद्धी देउयात म्हणजे अधिकाधिक लोक किरणबॉट वापरण्यास प्रवृत्त होतील.
- अभय नातू (चर्चा) ०८:३७, ४ जून २०२२ (IST)
- मला वरील एकूण चर्चा पूर्णपणे समजली नाही, पण जेवढी समजली त्यावर/त्यासंदर्भात मी काही विचार मांडू शकतो:
- एखादेवेळेस माझी सक्रियता कमी-जास्त होऊ शकते, पण काही दिवसानंतर मी विकिपीडियावर रोजच सक्रिय असेल.
- मी bot ह्या हेतूने बनवलाय कि यदा कदाचित भविष्यात जर माझी येथील सक्रियता कमी झाली किंवा पूर्णपणे थांबली तरी ह्या bot ची संपादने व शुद्धलेखन अवितरतपणे चालतील.
- KiranBOT II पूर्णपणे स्वयंचलित आहे, व तो toolforge server वरून चालतो. समजा मी काही कारणांमुळे दोन महिने ऑनलाईन येऊ शकलो नाही तरी bot रोज ठरलेल्या वेळेवर त्याचं काम करेल.
- AWB मधून संपादने करताना लेखांची यादी बनवणे थोडं त्रासदायक आहे, व एकावेळेस जास्तीत जास्त २५,००० पानांची यादी तयार होऊ शकते. यादी तयार झाल्यावर सुद्धा शुद्धलेखनाचे काम AWB पेक्षा KiranBOT द्वारे सोयीस्कर राहील. (AWB आपल्या संगणकावरून चालते, तर KiranBOT server वरून चालतो). आणि KiranBOT एकदा सुरु झाल्यास लेख नामविश्वातील जेवढी पाने आहेत तेवढी सगळी (आपोआप) वाचतो/संपादित करतो.
- AWB मार्फत शुद्धलेखन करायचे असल्यास संपादकाचा वेळ व ताकद वाया जाते, आणि ते संपादन एकदाच व काही ठराविक पानांवरच होते. त्यापेक्षा बदल करायचे शब्द मला सांगितल्यास ते kiranbot च्या यादीत नेहेमीसाठीच राहतील व रोज त्याप्रमाणे बदल होत राहतील.
- मराठी नसणाऱ्या एखाद्या शब्दाचे प्रमाण लेखन काय असावे हा थोडा अवघड विषय आहे (उदा: सोविएत/सोव्हिएत, एरलाईन/एअरलाईन). अशा साशंक शदांबद्दल चर्चा होऊन एकमत होणे गरजेचं आहे, नाहीतर एक bot एक शब्द, तर दुसरा bot वेगळा शब्द टाकेल.
- सध्या KiranBOT च्या प्रत्येक edit summary मध्ये सदस्य:KiranBOT II/typos ला दुआ देण्यात आलेला आहे. मी तिथे लिहिलंय कि "जर तुम्हाला काही शब्द बदलायचे असतील तर त्याबद्दल सदस्य चर्चा:KiranBOT II/typos वर चर्चा करणे योग्य राहील." bot ची संपादने "अलीकडील बदल" मध्ये दिसत नाहीत, पण निरीक्षण सूचीमध्ये दिसतात. जर मला कोणी काही बदल सुचवले तर ते स्वागतार्हच आहे. —usernamekiran (talk) ०१:१३, ५ जून २०२२ (IST)
- एखादेवेळेस माझी सक्रियता कमी-जास्त होऊ शकते, पण काही दिवसानंतर मी विकिपीडियावर रोजच सक्रिय असेल.
Khirid_Harshad या सदस्याचे योगदान
Khirid_Harshad या सदस्याचे विशेष:योगदान पाहिले तर त्यावर This account is globally locked. अशी पाटी येत आहे. त्यांच्या चर्चापानावर त्यांनी नक्की काय उत्पात केला याचा उल्लेख नाही. माझा त्या सदस्याशी काही संबंध नाही पण नेमक्या कोणत्या कारणाने हद्दपारी झाली हे जाणून घ्यायचे आहे. Shantanuo (चर्चा) १२:१४, १२ जून २०२२ (IST)
- @Shantanuo: कृपया हे पहा yeu aga maj, tejas parte आणि khirid harshad ह्या एकच व्यक्ती असल्याचे मागेच समजले होते. तसेच yeu aga maj हे खाते वैश्विक पातळीवर प्रतिबंधित असल्याचे देखील पूर्वीच दिसून आले होते. परंतु मराठी विकिपीडियावर khirid harshad या खात्याचे योगदान चांगले होते. त्यामुळे आपण त्यांना कधी प्रश्न केला नव्हता. परंतु आज हे खाते देखील वैश्विक पातळीवर प्रतिबंधित झाल्याचे समजले.- संतोष गोरे ( 💬 ) १३:४३, १२ जून २०२२ (IST)
- तुम्ही दिलेला दुवा मी पाहिला. मला त्यांच्या स्वतःच्या किंवा त्यांच्या इतर अकाउंटमधून इंग्रजी विकीवर केलेला एकही उत्पात दिसला नाही. इंग्रजी विकीवर हजारो एडिटर्स आहेत. मराठी विकीवर गेल्या ३० दिवसात १० पेक्षा जास्त संपादनं करणारे (बॉट आणि संपादकांशिवाय) किती सदस्य आहेत? कोणत्याही चर्चेशिवाय, कसलीही पूर्वकल्पना न देता, लहान सहान कारणावरून सदस्यांना काढून टाकण्याची इंग्रजीसारखी चैन मराठीला परवडणार आहे का? ते जाऊ द्या. मी दुसरे उदाहरण देतो PradipsBhosale या सदस्याला फक्त दोन एडिटनंतर ग्लोबली बॅन केले गेले. "स्वातंत्र्य दिन (भारत)" आणि "रक्षाबंधन" या दोन लेखाखाली त्याच्या स्वतःच्या ब्लॉगची लिंक दिली हे खरे, पण ती पोस्ट रक्षाबंधन याच विषयावर होती हे लक्षात घेतले पाहिजे. लहान मूल एका दिवसात चालायला/ धावायला सुरुवात करत नाही. तसे नवीन सदस्य एका दिवसात तुमच्या विकीची नियमावली शिकत नाहीत. मी ९ डिसेंबरच्या पोस्टमध्ये याच चावडीवर "मोठे व्हायचेच नाही याची कल्पना नव्हती." असे म्हटले तर कोणीतरी "असे का वाटले?" असे विचारले. मराठी विकीला मोठे व्हायचे असेल तर सदस्यांना सांभाळून घेणे गरजेचे आहे. क्रियाशील सदस्य हीच विकीची खरी ताकद आहे. Shantanuo (चर्चा) १५:०८, १२ जून २०२२ (IST)
- @Shantanuo:,
- हा ब्लॉक मराठी विकिपीडियाच्या प्रचालकांनी घातलेला नाही असे दिसते, तरी तुमची (योग्य) अशी प्रतिक्रिया मेटावर घालावी.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) २१:१०, १२ जून २०२२ (IST)
- मेटावर काहीही प्रतिक्रिया दिली तरी ते प्रथम लोकल विकीवर याची चर्चा झाली आहे का? असे विचारतात. “हा ब्लॉक मराठी विकिपीडियाच्या प्रचालकांनी घातलेला नाही” या स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. हा ब्लॉक प्रचालकांच्या (किंवा त्यांच्या प्रतिनिधीच्या अथवा मराठी विकीवरील सदस्याच्या) विनंतीवरून घालण्यात आला आहे का? की AmandaNP यांनी आपल्या फावल्या वेळेचा सदुपयोग करून अचानक निर्णय घेतला? Shantanuo (चर्चा) ०९:२८, १३ जून २०२२ (IST)
- cc: @संतोष गोरे आणि Khirid Harshad:
- बरोबर आहे. हा ब्लॉक मराठी विकिपीडियावरील नसून, "ग्लोबल" आहे. म्हणजे ते खाते एकाच फटक्यात विकिमीडियाच्या १५०-२०० विकिपीडिया व इतर वेबसाइट्स वर ब्लॉक झाले आहे. AmandaNP ह्यांनी checkuser टूल वापरून user:Yeu aga maj व user:Khirid Harshad हे दोन्ही एकाच व्यक्तींचे खाते असल्याची खातरजमा केली आहे. खात्री असलेले इतर खाते en:Category:Wikipedia sockpuppets of Yeu aga maj तर संशयित en:Category:Suspected Wikipedia sockpuppets of Yeu aga maj इथे आहेत. इंग्रजी विकीपेडियावर TV मालिका, व त्यातील अभिनेत्यांचे लेख लिहण्यासाठी पैसे घेऊन संपादन करणाऱ्यांची संख्या खूप आहे. Khirid Harshad त्यातील एक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचे येथील बहुतांश संपादने चांगली असली, तरी काही संशयास्पद बाबी होत्या. त्या मला काही दिवसांपूर्वी लक्षात आल्या होत्या, पण मी माझा गैरसमज समजून दुर्लक्ष केले होते. —usernamekiran (talk) २१:३५, १२ जून २०२२ (IST)
- एखाद्या धर्मादाय संस्थेने (किंवा कंपनीने/ व्यक्तीने) पैसे देऊन विकीवर काम करून घेतले तर अशा व्यक्तीला (पैसे घेणाऱ्या - देणाऱ्या नव्हे) १५०/ २०० विकीवरून कायमचे हद्दपार करावे असा संकेत मला विकीवर कुठे वाचायला मिळेल? समजा "झी मराठी” या कंपनीत काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने त्याला माहीत असलेल्या विषयावर कंपनीच्या वेळेत किंवा संध्याकाळी / रात्री विकीचे सर्व नियम सांभाळून लिखाण केले तर त्याला तुमची हरकत आहे का? एखाद्या सदस्याबद्दल काही संशय असेल तर तो सदस्य ॲक्टीव्ह असतानाच चर्चा करायला हवी. तो सदस्य बॅन झाल्यावर तो आपली बाजू इथे मांडू शकणार नाही हे नक्की झाल्यावर संशय व्यक्त करणे नैतिकतेला धरून होत नाही. Shantanuo (चर्चा) १०:०२, १३ जून २०२२ (IST)
- @Shantanuo:, कृपया आपण मेटा वर चर्चा सुरू करून आम्हाला देखील साद घालावी. आपण तेथे हे नोंदवू शकतो की Khirid Harshad चा मराठी विकिपीडियावर कोणत्याही प्रकारचा उत्पात झालेला नाहीये, त्यामुळे त्यांच्या प्रतिबंधाची पातळी वैश्विक वरून केवळ इंग्रजी विकिपीडियासाठीची करावी. Khirid Harshad चे मराठी आणि इंग्रजी व्यतिरिक्त इतर विकिपीडियावर योगदान जवळपास नाहीये.- संतोष गोरे ( 💬 ) १२:१३, १३ जून २०२२ (IST)
- अभय नातू, Tiven2240 आणि किरण या तिघांपैकी दोघांना हा सदस्य परत हवा असेल तर या सूचनेचा विचार करता येईल. Shantanuo (चर्चा) १२:२९, १३ जून २०२२ (IST)
- संपादने कोणीही केली तरी त्यात आक्षेपार्ह्य काहीच नाही. माझे म्हणणे फक्त एवढेच आहे कि संपादने विकिपीडियाच्या धोरणास अनुसरून असावी, ती एकतर्फी किंवा छुप्या पद्धतीने प्रचारात्मक/जाहिरातबाजीची नसावीत. सध्या Khirid_Harshad चे मराठी विकिपीडियावरील प्रतिबंध उठवण्यासाठी Shantanu, व संतोष ह्यांचा होकार दिसतोय, माझासुद्धा आहे. मी आत्ता meta वर निर्बंध उठवण्याची विनंती करतो, व त्यानंतर आपल्याला Khirid_Harshad सोबत चर्चा करता येईल. —usernamekiran (talk) १५:००, १३ जून २०२२ (IST)
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम
नमस्कार. काही दिवसांपूर्वी मी साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम मधून "आधी", "नंतर" काढले, व "हंगाम संख्या" टाकले special:diff/2075839. त्यानंतर माझ्या सदस्य चर्चा पानावर त्याबद्दल चर्चा झाली होती: सदस्य_चर्चा:Usernamekiran/Archive_2#माहितीचौकट_दूरचित्रवाणी_कार्यक्रम. पण नंतर "आधी", "नंतर" पुन्हा टाकण्यात आले. मी माझ्या चर्चा पानावर नमूद केलेले परत इथे नकल-डकव करतो:
- मराठी विकिपीडिया हा एक ज्ञानकोश आहे. सध्या मालिकेचे लेख निव्वळ टाइम-टेबल आणि जाहिराती झालेले आहेत. en:Template:Infobox_television#Parameters मध्ये "preceded_by" (आपल्या साच्यातील "आधी") ची माहिती दिली आहे: This parameter should not be used to indicate a program that preceded another in a television lineup (i.e. the 8pm show vs the 8:30pm show), or to indicate what show replaced another in a specific time slot (ex: Temperatures Rising held the 8pm time slot before being replaced by Happy Days).
- थोडक्यात सांगायचे झाले तर ८ नंतर ८:३० चा कार्यक्रम असं टाकू नये, आणि ८ वाजताचा "अ" कार्यक्रम संपल्यानंतर त्याच्या जागेवर ८ वाजता "ब" कार्यक्रम सुरु झाला असंही टाकू नये. देवमाणूस संपल्यानंतर देवमाणूस २ हा कार्यक्रम सुरु झाला, केवळ हे योग्य आहे.
- इंग्रजी विकिपीडियाची नक्कल म्हणून नाही, "मालिकांचा प्रसारणाचा वेळ" हा मुद्दा मुळातच ज्ञानकोशीय नाही. एखादी मालिका बंद झाल्यावर १० वर्षानंतर त्याच्या वेळेचा कोणाला काही फरक पडत नाही. voot, netflix, zee5 असे वेग-वेगळे app असल्यामुळे प्रसारण वेळेची आत्ताच कोणाला जास्त किंमत नाहीये. आणि टीव्ही चॅनल्स सुद्धा त्यांची वेळ सारखी बदलत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वेळा आपण अद्ययावत करणेपण बरोबर नाही. एखादी मालिका सुरु झाली तेव्हा तिची पहिली वेळ टाकली तरी पुरे असावं. उदाहरण द्यायच झालं, तर वादळवाट ह्या मालिकेची वेळ बदलली होती, आणि वादळवाट या लेखावर दोन साचे सोडले तर जास्त माहिती नाहीये. {{झी मराठी रात्री ९च्या मालिका}} व {{झी मराठी रात्री ८.३०च्या मालिका}} हे साचे सुद्धा निव्वळ जाहिरातबाजीचा प्रकार आहेत.
वरील मुद्द्यांना अनुसरून, व TV माध्यमांकडून मराठी विकिपीडियाचा जाहिरातबाजी साठीचा होणारा उपयोग टाळण्यासाठी "माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम" साच्यातून "आधी" व "नंतर" काढण्याची मी विनंती करतो. ह्यावर आपले समर्थन/विरोध नमूद करून, किंवा नवीन काही कल्पना/सल्ला असेल तर त्याप्रमाणे चर्चा करून साच्यात काय ठेवावे व काय ठेवू नये हे औपचारिकरीत्या ठरवावे हि विनंती. —usernamekiran (talk) २२:३६, १२ जून २०२२ (IST)
- आधी आणि नंतर हे चूक पद्धतीने वापरले जात आहे असे यावरून समजते. हरकत नाही, काढून टाकावे.- संतोष गोरे ( 💬 ) १२:०६, १३ जून २०२२ (IST)