सत्यमेव जयते
Appearance
सत्यमेव जयते हा मुंडकोपनिषदातील एक घोषवाक्य आहे. भारत देश स्वतंत्र झाल्यावर भारत शासनाने या वाक्याला राष्ट्रीय ब्रीदवाक्य म्हणून स्वीकारले. भारतीय राजमुद्रेच्या पायथ्याशी हे वाक्य देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले आहे. सत्यमेव जयते हे वाक्य भारतीय चलनी नोटांवर आढळते तसेच सर्व शासकीय कागदपत्रांवर वापरले जाते.
सत्यमेव जयते या मंत्राचे मूळ मुंडकोपनिषदातील ३.१.६ या श्लोकामध्ये आहे. तो मंत्र खालीलप्रमाणे:-
सत्यमेव जयते नानृतं
सत्येन पन्था विततो देवयानः ।
येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा
यत्र तत् सत्यस्य परमं निधानम् ॥६॥
सत्यमेव जयते या वाक्याचा अर्थ होतो - सत्याचाच (शेवटी) जय होतो.
या वाक्याला राष्ट्रीय दर्जा देण्याचे काम पंडित मदन मोहन मालवीय यांनी इ.स. १९१८ मध्ये केले.