Jump to content

"श्रावण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ११: ओळ ११:

या दिवशी नागांची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे. <br>
या दिवशी नागांची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे. <br>

* श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या षष्ठीच्या दिवशी कल्की जयंती असते.

* श्रावण पौर्णिमा- रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा.
* श्रावण पौर्णिमा- रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा.
ओळ १६: ओळ १८:
''नारळी पौर्णिमा''' हा सण हिंदू महिन्यांपैकी [[श्रावण पौर्णिमा|श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी]] साजरा केला जातो. या दिवशी [[समुद्र]]किनारी राहणारे लोक [[वरुण]]देवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला [[नारळ]] अर्पण करतात. या दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातले [[कोळी]] व समुद्राशी निगडित असलेल्या व्यवसायांतील इतर लोक [[समुद्र|समुद्राची]] [[पूजा]] करून त्यास [[नारळ]] अर्पण करतात. पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरू होते. ज्या मराठी घरांत रोजच्या खाण्यात नारळ नसतो, त्याही मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनलेले खाद्य पदार्थ बनवतात.

याच दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला [[रक्षाबंधन|राखी]] पौर्णिमा असे म्हणतात.ही [[पौर्णिमा]] पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते, कारण या दिवशी सुताची पोवती करून ती [[विष्णू]], [[शिव]], [[सूर्य]] इत्यादी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री पुरुष ती पोवती हातात बांधतात. याच दिवशी श्रवण नक्षत्र असल्याने ब्राह्मण पुरुष उपाकर्म करून नवीन यज्ञोपवीत धारण करतात. या विधीला श्रावणी असे नाव आहे.<br>
याच दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला [[रक्षाबंधन|राखी]] पौर्णिमा असे म्हणतात.ही [[पौर्णिमा]] पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते, कारण या दिवशी सुताची पोवती करून ती [[विष्णू]], [[शिव]], [[सूर्य]] इत्यादी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री पुरुष ती पोवती हातात बांधतात.
याच दिवशी श्रवण नक्षत्र असल्याने ब्राह्मण पुरुष उपाकर्म करून नवीन यज्ञोपवीत धारण करतात. या विधीला श्रावणी असे नाव आहे.<br>
श्रावणी ही श्रावण पौर्णिमेलाच करतात असे नाही, श्रावणी हस्त नक्षत्रात चंद्र असताना 'श्रावण शुक्ल पंचमी'लाही असू शकते. पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यास श्रावण पौर्णिमेला श्रावणी करत नाहीत. ऋग्वेद्यांची श्रावणी, यजुर्वेद्यांची श्रावणी, तैत्तिरीय शाखा व तिच्या अंतर्गत येणाऱ्या हिरण्यकेशी उपशाखेच्या ब्राह्मणांची श्रावणी या वेगवेगळ्या दिवशी असू शकतात.

श्रावण महिन्यात लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असेल, तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते.
श्रावण महिन्यात लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असेल, तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते.

२१:३३, ३० जुलै २०१८ ची आवृत्ती

श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.[]सूर्य जेव्हा सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा सौर श्रावण सुरू होतो. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हीदू आणि जैन परंपरा आहे.

साहित्यात

" श्रावण मासी , हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे " या बालकवी यांच्या कवितेत श्रावण मासाचे वर्णन आले आहे.

श्रावण महिन्यातील सण

  • श्रावण शुद्ध पंचमी-

मुख्य पान : नाग पंचमी

या दिवशी नागांची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे.

  • श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या षष्ठीच्या दिवशी कल्की जयंती असते.
  • श्रावण पौर्णिमा- रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा.

नारळी पौर्णिमा' हा सण हिंदू महिन्यांपैकी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी समुद्रकिनारी राहणारे लोक वरुणदेवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातले कोळी व समुद्राशी निगडित असलेल्या व्यवसायांतील इतर लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात. पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरू होते. ज्या मराठी घरांत रोजच्या खाण्यात नारळ नसतो, त्याही मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनलेले खाद्य पदार्थ बनवतात.

याच दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात.ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते, कारण या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इत्यादी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री पुरुष ती पोवती हातात बांधतात.

याच दिवशी श्रवण नक्षत्र असल्याने ब्राह्मण पुरुष उपाकर्म करून नवीन यज्ञोपवीत धारण करतात. या विधीला श्रावणी असे नाव आहे.
श्रावणी ही श्रावण पौर्णिमेलाच करतात असे नाही, श्रावणी हस्त नक्षत्रात चंद्र असताना 'श्रावण शुक्ल पंचमी'लाही असू शकते. पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यास श्रावण पौर्णिमेला श्रावणी करत नाहीत. ऋग्वेद्यांची श्रावणी, यजुर्वेद्यांची श्रावणी, तैत्तिरीय शाखा व तिच्या अंतर्गत येणाऱ्या हिरण्यकेशी उपशाखेच्या ब्राह्मणांची श्रावणी या वेगवेगळ्या दिवशी असू शकतात.

श्रावण महिन्यात लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असेल, तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते.

श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात, कारण या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला. या दिवशी भाविक स्त्रीपुरुष उपवास करतात व कृष्ण जन्माचा सोहळा करतात. श्रावण वद्य नवमी या दिवशी बालगोपाल गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात.

  • पिठोरी अमावास्या/ पोळा

या महिन्यातील अमावास्येला पिठोरी अमावास्या असे नाव आहे. संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात. याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी पोळा नावाचा सण साजरा करतात. हा सण बैलांसंबंधी असून, या दिवशी बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढतात.[]

व्रते

व्रत म्हणजे व्रतवैकल्ये! वैकल्यांचा अर्थ विकलता ! म्हणजे बारीक होणे. स्वार्थ व परमार्थ साधणारे हे व्रत आहे . []

  • शिवामूठ-

नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. श्रावणातल्या शुक्रवारी देवीची पूजा आणि हळदी-कुंकू करण्याचीही प्रथा आहे. []

श्रावणी सोमवार- श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. श्रावणी सोमवारी मराठी माध्यमाच्या शाळांना दुपारनंतर अर्धी सुट्टी असते.

मंगळवार- मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. श्रावणी शुक्रवारी देवीचे पूजन आणि हळदी-कुंकू करण्याचीही प्रथा आहे.

दान- श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ मास मानला जात असल्याने कित्येक धनिक लोक प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत ब्राह्मणांना व गोर गरिबांना भोजन देतात.देवस्थानातही या महिन्यात कथापुराणादी कार्यक्रम ठेवतात.[]

भारतात अन्य ठिकाणी

उत्तर भारतात या महिन्यात झुलन यात्रा,रक्षाबंधन, जन्माष्टमी व नंदोत्सव हे उत्सव विशेष महत्त्वाचे मानतात. झुलन जत्रा हा दोलोत्सव आहे. पौर्णिमेच्या दिवशी राधाकृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात व स्त्रिया त्यांच्यासंबंधी गीते गातात. हा उत्सव एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत चालतो. कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव करतात. नंदाला पुत्र झाला असे समजून या दिवशी हळदी-कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने उडवतात.[]

चित्रदालन

हिंदू पंचांगानुसार बारा महिने
  श्रावण महिना  
शुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा
कृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या

  1. ^ जोशी, महादेवशास्त्री (मार्च २०१०). भारतीय संस्कृती कोश खंड नववा. पुणे: भारतीय संस्कृतिकोश मंडळ. pp. ४५६.
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा
  3. ^ लेखक- य .शं. लेले (लेखक हे धर्मशास्राचे अभ्यासक असून त्यांच्या अभ्यासातून त्यांनी त्यांचे विचार मांडले आहेत.) विवेक २६ ऑगस्ट २००७
  4. ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा
  5. ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा
  6. ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा