गोपालकाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गोपाळकाला या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

कृष्ण जयंतीचा उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात.दहीहंडी आणि कृष्णजन्माष्टमी यांच्या निमित्ताने हा प्रसाद तयार केला जातो. श्रीकृष्णजयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हाजेव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा तेव्हा त्या कीर्तनानंतर गोपालकाला होतो. म्हणूनच त्या कीर्तनाला "काल्याचे" कीर्तन म्हणतात. ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधाचे पारायण, किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथवाचनानंतर, अथवा कीर्तन महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपाळकाला करूनच होते.[१]


दहीहंडी[संपादन]

Dahihandi function being performed in a temple

कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दहीकाला होतो. श्रीकृष्ण त्याच्या बालपणी आपल्या मित्रांसह गोकुळातील घरांमध्ये जाऊन टांगलेल्या शिंकाळ्याच्या मडक्यातील दही खात असे.[२] त्यासाठी मुले मानवी मनोरा करून मडके फोडीत असत.ही परंपरा आजही भारतात दहीहंडीच्या रूपाने साजरी केली जाते. 'गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला' असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. [३]कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे.[४]

==गोपाळकाला/दहीकाला==फृनृठ दहचफो

गोपालकाला व त्यामध्ये ठेवलेली बाळकृष्णाची मूर्ती

गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे.
पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबाचे वा आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो. हा कृष्णास फार प्रिय होता, असे सांगितले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्वजण वाटून खात असत असे मानले जाते.

इतर[संपादन]

विकिवरील लेख व गोपालकाला याचे साधर्म्य आहे. दोन्ही पण परस्पर सहयोगाने सर्वांगसुंदर बनतात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Kulkarni, Dattatray Digambar (1975). Dvādaśa jyotirliṅga varṇana (mr मजकूर). Pravāsī Prakāśana. 
  2. ^ Chanchreek, Jain; Chanchreek, K. L.; Jain, M. K. (2007-01-01). Encyclopaedia of Great Festivals (en मजकूर). Shree Publishers & Distributors. आय.एस.बी.एन. 9788183291910. 
  3. ^ Das, Ajay (2007). Faiths, fairs & festivals of India (en मजकूर). Better Books. आय.एस.बी.एन. 9788190317771. 
  4. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा