* [[पंचगंगा नदी]] कृष्णा नदीस नरसोबाची वाडी ([[सांगली जिल्हा]]) येथे मिळते.
* [[पंचगंगा नदी]] कृष्णा नदीस नरसोबाची वाडी ([[सांगली जिल्हा]]) येथे मिळते.
* [[भीमा नदी]] कृष्णा नदीस कर्नाटकात मिळते.
* [[भीमा नदी]] कृष्णा नदीस कर्नाटकात मिळते.
* [[वारणा नदी]] कृष्णा नदीस हरिपूर ([[सांगली जिल्हा]]) येथे मिळते.
* [[वारणा नदी]] कृष्णा नदीस हरिपूर ([[सांगली जिल्हा]]) येथे पश्चिमेकडून वारणा व पूर्वेकडून येरळा ह्या नद्या मिळतात.
* [[वेण्णा नदी]] कृष्णा नदीस संगम माहुली येथे मिळते.
* [[वेण्णा नदी]] कृष्णा नदीस संगम माहुली येथे मिळते.
* [[दूधगंगा नदी]] कृष्णा नदीस
==जलव्यवस्थापन==
==जलव्यवस्थापन==
१४:४१, ३ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
कृष्णा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
कृष्णा नदी (मराठी: कृष्णा; कन्नड: ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ; तेलुगू: కృష్ణా నది ;) ही दक्षिणी भारतातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ही नदी महाराष्ट्रातीलमहाबळेश्वरजवळ उगम पावून सुमारे १,३०० कि.मी. अंतर पार करत बंगालच्या उपसागरालाआंध्र प्रदेशातीलराजमहेंद्री येथे मिळते. वाटेमध्ये ती कर्हाड, औदुंबर, सांगली, नरसोबाच्या वाडीवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करते. महाराष्ट्र राज्यातील कृष्णा नदीचा प्रवास २८१ कि.मी. आहे. महाराष्ट्रातूनकर्नाटकात गेलेली कृष्णा नदी पुढे पूर्वेकडे आंध्र प्रदेशात जाते. कर्नाटकात कृष्णेला दक्षिणेकडून येणारी घटप्रभा नदी मिळते. आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्रातून येणारी भीमा नदी व कृष्णा यांचा संगम होतो. कृष्णा आंध्र प्रदेशात मच्छलीपट्टणमच्या दक्षिणेस बंगालच्या उपसागराला मिळते. मुखाजवळ तिचा प्रवाह ३ शाखांत विभागला जातो व त्रिभुजप्रदेश निर्माण होतात. कृष्णा नदीच्या खोर्याचा आंध्र प्रदेशांतील भाग अधिक विस्तृत व सुपीक आहे. तिच्या उगमाकडील भागात पावसाचा पाणीपुरवठा कमी असल्याने उगमाकडे उन्हाळ्यात पाणी खूप कमी असते. आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवरील मोठे धरण आहे. तुंगभद्रा नदीवरील तुंगभद्रा धरण व कोयना धरण ही तिच्या उपनद्यांवरील मुख्य धरणे आहेत. कृष्णा व गोदावरी यांचे त्रिभुजप्रदेश कालव्यांनी जोडले आहेत.
ऐतिहासिक, धार्मिक, आख्यायिका
स्कंदपुराणामध्ये कृष्णानदीचे माहात्म्य ६० अध्यायांत वर्णन केलेले आहे. त्यामध्ये वाई (वैराजक्षेत्र), लिंब-गोवे, माहुली, कराड, नरसोबाची वाडी (अमरेश्वर), औदुंबर (भुवनेश्वरी) इत्यादी तीर्थक्षेत्रांचे महत्त्व वर्णन केले आहे.[१]
इ.स. सन १२१५ मध्ये यादव राजांनी बांधलेल्या महाबळेश्वराच्या हेमांडपंथी शिवमंदिराजवळ चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधले. त्या देवळाच्या जवळपास कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या पाच नद्यांचा उगम आहे, असा सर्वसामान्य भाविकांचा समज असतो.[२]
दक्षिणी भारतातील इतर काही ठिकाणांप्रमाणेच कृष्णेच्या खोर्यातही अश्मयुगीन अवशेष आढळून आले आहेत.[३]
कृष्णा खोर्याचे एकूण क्षेत्रफळ ३६८०४८ चौरस. कि.मी. आहे. या एकूण क्षेत्रफळापैकी ६९४२५ चौ. कि.मी. म्हणजे २७ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात, ११३२७१ चौ. कि.मी. म्हणजे ४४ टक्के क्षेत्र कर्नाटकात तर ७६२५२ चौ. कि.मी. म्हणजे २९ टक्के क्षेत्र आंध्र प्रदेशात आहे.