वेदगंगा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेदगंगा ही कोल्हापूर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही पंचगंगा नदीची उपनदी असून पुढे कृष्णा नदीला जाऊन मिळते. वेदगंगा नदी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील कित्येक गावांना पाणी पुरवठा करते. या नदीचे पाणी जास्तीत जास्त शेतीसाठी तसेच गावांमध्ये पिण्यासाठी वापरले जाते. ही नदी अदमापुर पासून पुढे कर्नाटक मध्ये यमगर्णी, जत्राट, सिदनाळ, हूनरगी, ममदापूर, भोज मधून पुढे बारवाड मध्ये दूधगंगा नदीला मिळते आणि तसच पुढे ती कृष्णा नदीमध्ये समावते.

वेदगंगा नदीचा उगम भटवाडी (तांब्याचीवाडी ) येथे गोमुखातून होतो. या नदीच्या काठी वेद म्हटले जात असत, म्हणून या नदीचे नाव वेदगंगा असे पडले आहे.