तिल्लारी नदी
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
तिल्लारी नदी महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाहणारी नदी आहे. ही नदी कोल्हापूर जिल्ह्यातील तुडये गावाजवळ उगम पावते, ही नदी पश्चिम वाहिनी असून गोवा-महाराष्ट्र सीमेवरील तेरेखोल या गावी अरबी समुद्राला मिळते. या नदीवर तिल्लारी धरण असून मुख्यत्वे वीजनिर्मितीसाठी या धरणाचा वापर केला जातो. धरणाची बहुतेक वीज गोवा राज्याला पुरवली जाते.