Jump to content

हिरण्यकेशी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिरण्यकेशी नदी
उगम आंबोली
पाणलोट क्षेत्रामधील देश भारतकोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते हिरण्यकेशी नदी
उपनद्या घटप्रभा नदी

हिरण्यकेशी नदी ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक नदी आहे.

या नदीचा उगम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावाजवळ होतो. ही नदी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरागडहिंग्लज तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे घटप्रभा नदीला मिळते.हिरण्यकेशी नदीलाच पुढे जाऊन घटप्रभा नाव पडले आहे.हिरण्यकेशी नदीवर आजरा येथे रामतीर्थ धबधबा आहे. तेथे एक प्राचीन राममंदिर आहे. आंबोलीतील हिरण्यकेशी नदीपात्रातून गोड्या पाण्यातील या (Schistura hiranyakeshi) स्चीस्टुरा हिरण्यकेशी माशाची नवीन प्रजात डॉ. प्रविनराज जयसिम्हन, शंकर बालसु ब्रमनिअन, तेजस ठाकरे या संशोधकांनी संशोधनाअंती जगाच्या समोर आणली आहे.

आंबोली हे गाव पश्चिम घाटामध्ये जैवविविधता दृष्ट्या अतिशय संपन्न व संवेदनशील समजल जात. या ठिकाणी नेहमीच विविध क्षेत्रातील संशोधकांकडून संशोधन करण्यात आली आहे.

यामध्ये विविध प्रकारचे बेडूक, साप, पक्षी, फुलपाखरे, वनस्पती यांच्या नवनवीन प्रजाती संशोधनाअंती जगाच्या समोर आली आहे. यातल्या काही प्रजाती तर जगाच्या पाठीवर केवळ आंबोलीमध्ये सापडतात, त्यामध्येच आणखी एक म्हणजे या गोड्या पाण्यातील माशाची भर पडली आहे.

हा मासा सध्यातरी हिरण्यकेशी येथील उगमापाशी असलेल्या कुंडामध्ये आढळून आलेला आहे. अद्याप या माशाची नोंद इतरत्र कुठेही आढळून आलेली नाही. हा मासा हिरण्यकेशी नदी पात्रात सापडल्याने या माशाला या नदीच्याच नावावरून हे स्चीस्टुरा हिरण्यकेशी (Schistura hiranyakeshi) असे नामकरण करण्यात आले आहे.

आंबोलीच्या नावांमध्ये या संशोधनामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हेही या संशोधनात सहभागी असल्याने महाराष्ट्रातील विविध संशोधकांकडून आनंद व्यक्त होत आहे.हिरण्यकेशी नदी ही महाराष्ट्राची दक्षिणेकडील नैसर्गिक सिमा निर्माण करते.

हे सुद्धा पहा

[संपादन]