कासारी नदी
कासारी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|
कासारी नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
ह्या नदीस मिळते | पंचगंगा नदी |
कासारी नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. हिचा उगम कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड परिसरातील गजापूरच्या धरणापाशी होतो. ही पंचगंगेची उपनदी आहे.
प्रवाह
[संपादन]उगमानंतर कासारीचा प्रवाह पुढे आग्नेयेकडे १० मैलांवरील धनगरवाडीपर्यंत जाऊन पुढे पूर्वेकडे अदमासे २५ मैलावर कोलोली ते पाडळी येथील कुंभी आणि तुळशी यांच्या एकत्र प्रवाहाला मिळतो. या प्रवासात कासारी नदीला अनेक छोटे प्रवाह येऊन मिळतात त्यात जांभळी नदी आणि गडवली नदी हे महत्त्वाचे प्रवाह आहेत.
कासारी नदीचे पाणलोट क्षेत्र उत्तरेकडील विशाळगड आणि दक्षिणेतील वाघजाई या रांगांमधील त्रिकोणी भाग आहे. कासारीला बाजारभोगाव व देसाईवाडी ता. पन्हाळा या गावांजवळ सोनुर्ले, परळी , नांदगाव, निवडे आदी गावांजवळून आलेली मनगरी नावाची उपनदी येऊन मिळते. मनगरी हे स्थानिक बोलीभाषेतील नाव असून मनकर्णिका असे या नदीचे मूळ आहे. मनकर्णिका या मूळ नावाचा अपभ्रंश होवून मनगरी हे नाव रुढ झाले आहे. भोगावच्या पूर्वेला वाहत जाताना कासारी नदी गाळाचे पठार बनवते.
सांस्कृतिक संदर्भ
[संपादन]आख्यायिका
[संपादन]करवीर माहात्म्य या ग्रंथाप्रमाणे कासारी नदी विष्णूस्वरूपिणी असून गालव या ऋषीनी येथे आणली. ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केल्यानंतर आवश्यक त्या अवभृत स्नानासाठी या क्षेत्रात नदीची निर्मिती करण्याचे काम पाच ऋषींवर सोपवले. कश्यप, गर्ग, गालव, वसिष्ठ व विश्वामित्र या पाच ऋषींनी पाच जलप्रवाहांची निर्मिती केली. कासारीला करवीरची कालिंदी म्हणून ओळखले जाते. कालिंदी म्हणजे यमुनेचे नांव, कासारीचा प्रवाह आणि यमुनेचा प्रवाह यात विलक्षण साम्य आढळते [१].
हे सुद्धा पहा
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]भारतातील नद्या | |
---|---|
प्रमुख नद्या | |
मध्यम नद्या | |
छोट्या नद्या |