"वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
||
ओळ १: | ओळ १: | ||
''' |
'''वीर जिजाबाई भोसले उद्यान''' तथा '''राणीचा बाग''' ही [[मुंबई]]तील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव ’क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स’. ही बाग भायखळा येथे असून ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या बागेत आहे. या बागेचे उद्घाटन १९ नोव्हेंबर १८६२ रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी केले आणि लगेच ती बाग जनतेसाठी खुलीझाली. २०१२साली या बागेच्या निर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण झाली. |
||
राणीच्या बागेत झाडे, झुडपे, लता आणि शंभरी ओलांडलेले अनेक वृक्ष यांचा संचय असलेला अनमोल खजिना आहे. ही बाग म्हणजे २८६ प्रजातींच्या ३,२१३ वृक्षांचे आणि ८५३ वनस्पती जातींचे आश्रयस्थान आहे. याशिवाय अनेक सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक यांचे वास्तव्य या उद्यानात आहे. |
|||
⚫ | |||
तपशीलवार आणि निसंदिग्ध अभिलेख आणि दस्तऐवज यांवरून हे लक्षात येते की तत्कालीन ' हॉर्टकिल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया'ने १८४० मध्ये शिवडी येथे स्थापन केलेले 'बोटॅनिकल गार्डन्स ऑफ बॉम्बे' ही नंतर आकाराला आलेल्या राणीच्या बागेतील (पूर्वाश्रमीचे 'व्हिक्टोरिया गार्डन्स') वनस्पती उद्यानाची नांदी होती. १८६०च्या दशकाच्या पूर्वार्धात, सोसायटीने आजच्या भायखळा येथील जागेवर शिवडीमधील वनस्पती उद्यानाचे स्थलांतर केले. त्यानंतर १८७३ मध्ये सोसायटी दिवाळखोरीत गेल्यामुळे काळाच्या पडद्याआड गेली. सरकारने तत्कालीन मुंबई महापालिकेकडे या उद्यानाचे हस्तांतरण केले आणि तेव्हापासून महापालिकाच या सार्वजनिक उद्यानाची देखभाल करते आहे. दरम्यान १८९० मध्ये उद्यानालगतची १५ एकर जमीन खरेदी करून या उद्यानाच्या आकर्षणात भर घालण्याच्या दृष्टीने काही प्राणी येथे आणले गेले आणि या सार्वजनिक बागेत 'प्राणिसंग्रहालया'चा जन्म झाला. प्राणिसंग्रहालय जरी नंतर अस्तित्वात आले असले तरी आजपावेतो राणीच्या बागेमध्ये वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय एकत्रच नांदत आहेत. इथल्या दोनतृतीयांश जागेत वनस्पती उद्यान तर उरलेल्या जागेत प्राणिसंग्रहालय आहे. साहजिकच राणीच्या बागेमध्ये प्राणिसंग्रहालयापेक्षा वनस्पती उद्यानाचा वरचष्मा आहे, |
|||
==राणीच्या बागेवरील पुस्तके== |
|||
* 'राणी बाग - १५० वर्षे' या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन २९ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईत होत आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी रूपांतराचे संपादन शुभदा निखार्गे व हुतोक्षी रुस्तमफ्राम यांनी केले असून मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त द.म. सुकथनकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. |
|||
⚫ | |||
{{मुंबई}} |
{{मुंबई}} |
०१:५७, २७ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती
वीर जिजाबाई भोसले उद्यान तथा राणीचा बाग ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव ’क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स’. ही बाग भायखळा येथे असून ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या बागेत आहे. या बागेचे उद्घाटन १९ नोव्हेंबर १८६२ रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी केले आणि लगेच ती बाग जनतेसाठी खुलीझाली. २०१२साली या बागेच्या निर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण झाली.
राणीच्या बागेत झाडे, झुडपे, लता आणि शंभरी ओलांडलेले अनेक वृक्ष यांचा संचय असलेला अनमोल खजिना आहे. ही बाग म्हणजे २८६ प्रजातींच्या ३,२१३ वृक्षांचे आणि ८५३ वनस्पती जातींचे आश्रयस्थान आहे. याशिवाय अनेक सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक यांचे वास्तव्य या उद्यानात आहे.
तपशीलवार आणि निसंदिग्ध अभिलेख आणि दस्तऐवज यांवरून हे लक्षात येते की तत्कालीन ' हॉर्टकिल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया'ने १८४० मध्ये शिवडी येथे स्थापन केलेले 'बोटॅनिकल गार्डन्स ऑफ बॉम्बे' ही नंतर आकाराला आलेल्या राणीच्या बागेतील (पूर्वाश्रमीचे 'व्हिक्टोरिया गार्डन्स') वनस्पती उद्यानाची नांदी होती. १८६०च्या दशकाच्या पूर्वार्धात, सोसायटीने आजच्या भायखळा येथील जागेवर शिवडीमधील वनस्पती उद्यानाचे स्थलांतर केले. त्यानंतर १८७३ मध्ये सोसायटी दिवाळखोरीत गेल्यामुळे काळाच्या पडद्याआड गेली. सरकारने तत्कालीन मुंबई महापालिकेकडे या उद्यानाचे हस्तांतरण केले आणि तेव्हापासून महापालिकाच या सार्वजनिक उद्यानाची देखभाल करते आहे. दरम्यान १८९० मध्ये उद्यानालगतची १५ एकर जमीन खरेदी करून या उद्यानाच्या आकर्षणात भर घालण्याच्या दृष्टीने काही प्राणी येथे आणले गेले आणि या सार्वजनिक बागेत 'प्राणिसंग्रहालया'चा जन्म झाला. प्राणिसंग्रहालय जरी नंतर अस्तित्वात आले असले तरी आजपावेतो राणीच्या बागेमध्ये वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय एकत्रच नांदत आहेत. इथल्या दोनतृतीयांश जागेत वनस्पती उद्यान तर उरलेल्या जागेत प्राणिसंग्रहालय आहे. साहजिकच राणीच्या बागेमध्ये प्राणिसंग्रहालयापेक्षा वनस्पती उद्यानाचा वरचष्मा आहे,
राणीच्या बागेवरील पुस्तके
- 'राणी बाग - १५० वर्षे' या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन २९ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईत होत आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी रूपांतराचे संपादन शुभदा निखार्गे व हुतोक्षी रुस्तमफ्राम यांनी केले असून मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त द.म. सुकथनकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
{{विस्तार}