Jump to content

राष्ट्रीय लोकशाही आघाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राष्ट्रीय लोकतांत्रिक गठबंधन या पानावरून पुनर्निर्देशित)

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (National Democratic Alliance) ही भारतामधील समवैचारिक राजकीय पक्षांची एक आघाडी आहे. १९९८ साली भारतीय जनता पक्ष व इतर १२ पक्षांनी एकत्र येऊन रालोआची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे इत्यादी वरिष्ठ नेते रालोआचे संस्थापक होते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रालोआने लोकसभेमधील ५४३ पैकी ३३६ जागा जिंकून व २०१९ लोकसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळवले. २६ मे २०१४ रोजी भाजप नेते नरेंद्र मोदी ह्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधले सदस्य पक्ष

[संपादन]
क्रम पक्ष लोकसभेमधील विद्यमान सदस्य राज्यसभेमधील विद्यमान सदस्य प्रमुख राज्य
1 भारतीय जनता पक्ष 280 42 राष्ट्रीय पक्ष
2 शिवसेना २०१९ पर्यंत! २०१९ पासून UPA 18 4 महाराष्ट्र
3 तेलुगू देशम पक्ष 16 6 आंध्र प्रदेश, तेलंगण
4 लोक जनशक्ती पार्टी 6 0 बिहार
5 शिरोमणी अकाली दल 4 3 पंजाब
6 राष्ट्रीय लोक समता पार्टी 3 0 बिहार
7 अपना दल 2 0 उत्तर प्रदेश
8 नागा पीपल्स फ्रंट 1 1 नागालॅंड
9 नॅशनल पीपल्स पार्टी 1 0 मेघालय
10 स्वाभिमानी पक्ष 1 0 महाराष्ट्र
11 पी.एम.के. 1 0 तामिळनाडू
12 अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस 1 0 पुडुचेरी
13 मिझो नॅशनल फ्रंट 0 0 मिझोरम
14 भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) 0 1 महाराष्ट्र
15 राष्ट्रीय समाज पक्ष 0 0 महाराष्ट्र
16 डी.एम.डी.के. 0 0 तामिळनाडू
17 मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम 0 0 तामिळनाडू
18 कोंगुनाडू मक्कल देसिया कच्ची 0 0 तामिळनाडू
19 इंडिया जननायक कच्ची 0 0 तामिळनाडू
20 न्यू जस्टिस पार्टी 0 0 तामिळनाडू
21 जन सेना 0 0 आंध्र प्रदेश, तेलंगण
22 गोरखा जनमुक्ती मोर्चा 0 0 पश्चिम बंगाल
23 केरळ काँग्रेस (राष्ट्रवादी) 0 0 केरळ
24 केरळ रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी (बोल्शेविक) 0 0 केरळ
25 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 0 0 गोवा
26 गोवा विकास पार्टी 0 0 गोवा
27 ईशान्य प्रादेशिक राजकीय आघाडी 0 0 ईशान्य भारत
28 मणिपूर पीपल्स पक्ष 0 0 मणिपूर
29 कामतापूर पीपल्स पार्टी 0 0 पश्चिम बंगाल
एकूण 293 121 भारत

रालोआ पक्ष सत्तेवर असलेली राज्ये

[संपादन]
क्रम राज्य/प्रदेश मुख्यमंत्री पक्ष कार्यकाळ आरंभ विधानसभेमधील जागा
1 छत्तीसगड रमण सिंग भारतीय जनता पक्ष 7 डिसेंबर2003 49/90
2 गोवा मनोहर पर्रीकर भारतीय जनता पक्ष 9 मार्च 2012 24/40
3 गुजरात आनंदीबेन पटेल भारतीय जनता पक्ष 22 May 2014 115/182
4 मध्य प्रदेश शिवराजसिंग चौहान भारतीय जनता पक्ष 29 नोव्हेंबर 2005 185/230
5 राजस्थान वसुंधरा राजे भारतीय जनता पक्ष 13 डिसेंबर2013 163/200
6 आंध्र प्रदेश एन. चंद्रबाबू नायडू तेलुगू देशम पक्ष 2 जून 2014 106/175
7 नागालॅंड टी.आर. झेलियांग नागा पीपल्स फ्रंट 24 मे 2014 38/60
8 पुडुचेरी एन. रंगास्वामी अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस 16 मे 2011 15/30
9 पंजाब प्रकाशसिंग बादल शिरोमणी अकाली दल 1 मार्च 2007 68/117