मातृका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मातृका

मातृका (इंग्रजी: Matrikas, संस्कृत : मातृका, IAST: mātṝkā.)हिंदू धर्मात देवींचा एक समूह आहे. आदिशक्तीचे भिन्न रुपे आहेत. प्रमुख पुरुष देवतांच्या शक्ती आहेत. ब्रह्मापासून ब्रह्माणी, विष्णुपासून वैष्णवी, शिवापासून माहेश्वरी, कार्तिकेय।स्कंदा पासून कौमारी, इंद्रापासून इंद्राणी/ऐन्द्री .वराह अवतारापासून वाराही, देवीपासून चामुंडा अशी शक्ती उत्पन्न झाली.आणि काही चौसष्ट योगिनीपैकी नारसिंही (प्रत्यंगिरा देवी) , विनायकी देवीचाही अन्य मातृकामध्ये उल्लेख आढळतात .[१][२]

शाक्त पंथामध्ये ,सामान्यत: सप्तमातृका पूजल्या जातात. तरीही, आठ मातृकांचा (अष्टमातृका) समुह देखील असू शकतात. दक्षिण भारतात सप्तमातृकाची उपासना प्रचलित आहे, तर अष्टमातृका नेपाळमध्ये पूजल्या जातात. काही विद्वानांच्या मते ह्या शैव देवी आहेत.[२]

देवीमाहात्म्य किंवा दुर्गा सप्तशतीतील अष्टमातृकांचे वर्णन[२][संपादन]
 1. ब्रह्माणी (Sanskrit: ब्रह्माणी, Brahmâṇī) or Brahmi (Sanskrit: ब्राह्मि, Brāhmī )
 2. वैष्णवी (Sanskrit: वैष्णवी, Vaiṣṇavī)
 3. इंद्राणी (Sanskrit: इन्द्राणी, Indrāṇī)
 4. माहेश्वरी (Sanskrit: महेश्वरि, Māheśvarī)
 5. कौमारी (Sanskrit: कौमारी, Kaumarī)
 6. वाराही (Sanskrit: वाराही, Vārāhī)
 7. चामुंडा (Sanskrit: चामुण्डा, Cāṃuṇḍā)
 8. प्रत्यंगिरा देवी (Sanskrit: नारसिंहीं, Nārasiṃhī),

पुराणे[संपादन]

मार्कंडेय पुराण (देवीमाहात्म्य किंवा दुर्गा सप्तशती), अग्नि पुराण, मत्स्य पुराण, वामन पुराण, वराह पुराण, कूर्म पुराण, सुप्रभेदागम व इतर आगम,वराहमिहिरलिखितबृहत्संहिता[२] ,विष्णुधर्मोत्तर पुराण,महाभारत इ.अशा अनेक धार्मिक ग्रंथात मातृकांचा उल्लेख येतो.[३]

वराहपुराणानुसार मातृकांची संख्या आठ आहे. [४]

पूजा[संपादन]

हिंदू धर्मामध्ये मंगलकार्याच्या वेळी गणपतीपूजन सहित मातृका पूजन केले जाते. मातृकापूजन हा विधी नांदीश्राद्धाचा एक भाग मानला जातो म्हणून नांदीश्राद्धाच्या वेळेस मातृकापूजन केले जाते. मातृकांमध्ये एकूण २७ देवी आहेत (काही ठिकाणी ७ किंवा सोळा मानल्या जातात). त्या पुढील प्रमाणे - पहिल्या सोळा १. गौरी २. पद्मा ३. शची ४. मेधा ५. सावित्री ६. विजया ७. जया ८. देवसेना ९. स्वधा १०. स्वाहा ११. माता १२. लोकमाता १३. धृती १४. पुष्टी १५. तुष्टी १६. कुलदेवता पुढील ७ मातृका १७. ब्राह्मी १८. माहेश्वरी १९. कौमारी २०. वैष्णवी २१. वाराही २२. इंद्राणी २३. चामुण्डा आणि उर्वरित ४ २४. गणपती २५. दुर्गा २६. क्षेत्रपाल २७. वास्तोष्पति

मंदिरे[संपादन]

सप्तमातृका मंदिर,पुरी ओडिशा.[५]संदर्भ यादी[संपादन]

 1. ^ LLP, Adarsh Mobile Applications. "Sapta Matrika | 7 Matara - Seven Forms of Goddess Shakti". Drikpanchang (इंग्रजी भाषेत). 2020-01-16 रोजी पाहिले.
 2. a b c d "Matrikas". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-07.
 3. ^ "Matrikas". www.aghori.it. 2020-01-18 रोजी पाहिले.
 4. ^ "देवी विशेष : सप्तमातृका". Loksatta. 2020-01-18 रोजी पाहिले.
 5. ^ Sarangi, Ashish. "Matrikas". Medium (इंग्रजी भाषेत). 2020-01-18 रोजी पाहिले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हे सुद्धा पहा[संपादन]