यशवंत विष्णू चंद्रचूड
यशवंत विष्णू चंद्रचूड (जुलै १२, इ.स. १९२०; पुणे, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत - जुलै १४, इ.स. २००८; मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. त्यांचे मूळगाव कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे.यांनी सर्वाधिक काळ - म्हणजे फेब्रुवारी २२, इ.स. १९७८ पासून जुलै ११, इ.स. १९८५ रोजी निवृत्त होईपर्यंत ७ वर्षे व ४ महिने - सरन्यायाधीशपद भूषविले. ऑगस्ट २८, इ.स. १९७२ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी यांची नेमणूक झाली.
जीवन
[संपादन]यशवंत विष्णू चंद्रचूड यांचा जन्म जुलै १२, इ.स. १९२० रोजी तत्कालीन ब्रिटिश भारताच्या मुंबई प्रांतात पुणे येथे झाला. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर इ.स. १९४० साली मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून त्यांनी पदवी अभ्यासक्रम पुरा केला. इ.स. १९४२ साली पुण्याच्या विधी महाविद्यालयातून एलएल.बी. ही कायद्याची परीक्षा ते उत्तीर्ण झाले [१].
मार्च १९, इ.स. १९६१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदावर त्यांची नियुक्ती झाली [१].
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ a b "भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरील यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे लघुचरित्र" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
[संपादन]- "भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरील यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे लघुचरित्र" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
मागील: मिर्झा हमीदुल्ला बेग |
भारताचे सरन्यायाधीश फेब्रुवारी २२, १९७८ – जुलै ११, १९८५ |
पुढील: पी.एन. भगवती |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |