डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एक मोठे कृषी विद्यापीठ आहे. विदर्भातील एकूण ११ जिल्हे ह्या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. देशमुख कृषी विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस अकोला शहरात आहे व नागपूर येथे दुसरा कॅम्पस आहे.

इतिहास:

कृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली. त्यापैकी असलेले हे एक कृषी विद्यापीठ. कृषी विदयापिठ स्थापनेत वसंतराव नाईक यांची फार मोठी दूरदृष्टी होती. शेती आणि शेतकऱ्यांवरील त्यांच्या निर्व्याज प्रेमातून देशात पहिल्यांदाच ही कृषी विद्यापीठ उभारली गेली. महाराष्ट्रातील प्रादेशिक समतोल साधत वसंतराव नाईक सरकारने अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ला कृषी विद्यापीठ स्थापन केले. या विद्यापिठास डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे. विद्यापिठ कायदा १९८३ अन्तर्गत विदर्भातील ११ जिल्ह्यात कृषी शिक्षण, शोध आणि बिज कार्यक्रम आदीचे कार्य विद्यापिठावर सोपवण्यात आले आहे.


साचा:Template for discussion/dated