श्रमिक विद्यापीठ (नागपूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दारिद्यरेषेखालील कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारे नागपूरमधील श्रमिक विद्यापीठ इ.स. १९६८ साली स्थापन झाले. त्याचे आधीचे नाव कामगार समाज शिक्षण संस्था. २००१ सालापर्यंत या संस्थेचे काम व्यवस्थित सुरू होते. त्यानंतर संस्था बिगरसरकारी संघटनेने चालवावी असे केंदीय श्रम मंत्रालयाने ठरवले. पण तसे होऊ शकले नाही. यामुळे संस्था चालविण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्याच्या कामगार मंत्रालयाला घ्यावी लागली.

१९८४साली ही संस्था शालेय शिक्षण खात्याकडे सुपूर्द करण्यात आली व तिचे नामकरण श्रमिक विद्यापीठ असे झाले. अभ्यासक्रमासाठी निधीच नसल्याने संस्था २००१ मध्येच बंद करणे आवश्यक होते. तसे झाले नाही, उलट प्रशासन तसेच वेतनावर खूप पैसे खर्च होत राहिले. पाचवा वेतन आयोग लागू झाल्याने कर्मचाऱ्यांना थकबाकीपोटी लाखो रुपये द्यावे लागणार होते. शिवाय संस्थेत काहीच काम होत नव्हते. शेवटी हे श्रमिक विद्यापीठ २००९ सालच्या नोव्हेंबर महिन्यात बंद करण्यात आले.


पहा : महाराष्ट्रातील विद्यापीठे